“ द माइंडगेम ” (अंतिम भाग )

द माइंडगेम ” (अंतिम भाग)


या घटनेनंतर पुढच्या गोष्टी खुपचं पटापट घडत गेल्या. डिटेक्टिव्ह स्कॉट हा परत घरी आलेला पाहून मेरीला आश्चर्य वाटलं. त्याने रुबेलाला चौकशी साठी ताब्यात घेण्यासाठी आल्याचं सांगितलं तसं रुबेलाच्या पायाखालची तर जमीनच सरकली, आपल्याला कोणत्या कारणासाठी ताब्यात घेत आहेत हेच तिला समजेना. बेंजामिन खून प्रकरणात तिला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात येत आहे असं डिटेक्टिव स्कॉटने स्पष्ट केलं, रुबेलाने खूप आकांडतांडव करून आपला या खुनाशी काहीही संबंध नाही असं सांगितलं, पण पोलिसांना त्यांच्या तपासात रुबेलाची गाड़ी घटनास्थळी आढळून आल्याच निदर्शनास आलेल होतं. ग्रीन व्हॅली पार्कच्या परिसरात राहत असलेल्या लोकांनी एक गाड़ी घटनास्थळी पाहिल्याचं सांगितलेल होत अणि त्यांनी गाडीच केलेल वर्णन रुबेलाच्या गाडीशी तंतोतंत जुळत होत. 
पोलिसांनी तिची बऱ्याच वेळ चौकशी केली, घटना घडली असता तिची गाड़ी घटनेच्या जागी कशी काय आली असं पोलीसांनी तिला विचारलं असता, त्यावर रुबेलाने आपल्याला एक निनावी फ़ोन आला होता, ज्यामधे आपल्याला फोनवरील व्यक्तीने घटनास्थळी बोलावलेल होत, बस इतकच तिला माहित होत. पुढे पोलिसांनी रुबेलाच्या झडती मधे एक पिस्तुल सापडल ज्याचा परवाना तिचाकडे न्हावता,आजकालचे त्या भागातील चोरा चिलटांचे भय पाहता स्वसंरक्षण करण्याच्या हेतूने ते तिने जवळ बाळगल्याचा तिचा जबाब पोलिसांना तितकासा रुचला नाही. कहर तर तेव्हा झाला जेव्हा पोलिसांना तपास करताना आढळून आल की सायमनच्या शरीरात घुसलेल्या तिन गोळ्या या रुबेलाच्याच पिस्तुलामधुन झाडल्या गेलेल्या होत्या. या सर्व गोष्टी रुबेलाकडेच गुन्हेगार म्हणून बोट दाखवत होत्या. रूबेला कायद्याचा कचाट्यात पूर्णपणे अडकलेली होती. 

रात्र झाली घरामधे मेरी एकटीच होती, बाहेर काळोख पसरला होता, थंडीसुद्धा बऱ्यापैकी जाणवत होती, मेरी घराच्या मागच्या दरवाजामधुन बाहेर आली, बाजूला लावलेली सायकल तिने बाहेर काढली सायकल चालवत ती बरीच दूर आली. काही वेळाने तिची सायकल एका नदीच्या जवळ दाट झाडांजवळ आणली, आजुबाजुला चिटपाखरू देखिल न्हवत, नदीच्या बाजूला त्या दाट झाड़ीजवळ मेरिने सायकल उभी केली अणि हलकेच सायकलची घंटी वाजवली. शांततेत घंटीचा आवाज स्पष्ट उमटला, त्यासरशी झाडांच्या दाट झाडीतुन एक ऊंचापूरा तरुण बाहेर आला. त्याने काळया रंगाच जॅकेट घातलेल होतं. 

“ हेलो मेरी कशी आहेस.” तो तरुण स्मितहास्य करत म्हणाला. त्याचे घारे डोळे विलक्षण दिसत होते.
“हेलो डॅनियल मी ठीक आहे.” मेरी म्हणाली.
तसा डॅन पुढे आला अणि त्याने मेरीला आलिंगन दिले, 
“ काम व्यवस्थित पार पडल ना?,  मीठीमधून बाहेर पडत डॅनने विचरल.
“ एकदम चोख” मेरिने सायकलला बाजूला लावत सांगीतल, मेरी अणि डॅन नदीच्या जवळ आले. तिथे नदीच्या मधे एक पुलासारखी एक लाकडी जागा होती ती जागा बसण्यासाठी होती, मेरी अणि डॅन तिथे बसले. 
“ पण मेरी तू हे जमवलच कस, मला परत एकदा सांग पाहू.” डॅनने उतावीळ होत विचारणा केली.
मेरी शांतच होती ती नदीच्या पात्रा मधे पाय सोडून बसलेली होती, 

“ ओके सांगते” मेरी शांतपणे म्हणाली. “ काही दिवसातच 9 मिलियन माझ्या नावावर जमा होतील, आणि तुलासुदधा तुझा हिस्सा मिळेलच.
“ ओके आता मला पहिल्यापासून सगळ सांग.” डॅन जोर देत म्हणाला. खूपच उत्साहित आणि आनंद त्याचा चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

मेरिने हातावर हात चोळले अणि बोलू लागली. - माझा पप्पांच्या दुर्दैवी मृत्युपूर्वी त्यांनी एक पत्र मला पाठवलेल होत. त्यामधे त्यांनी जिथे ते काम करत होते तिथल वातावरण अणि त्यांचा मित्र असलेला सायमनबद्दल सुद्धा सांगितलेल होत. त्यांना बराच नफा झालेला होता त्यातला काही भाग ते माझ्या नावावर आणि काही भाग रूबेलाच्या नावावर करणार होते. ते आलेलं पत्र मी व्यवस्थित माझा खोलीत लपवून ठेवलं जेणेकरून रुबेलाच्या हातात ते पडू नये. पण माझे वडील माझा नावावर किती पैसे जमा करणार हे माहित न्हवतं.  पुढे सायमनने सांगितलेल्या ऑफरमधे मला रकमेचा निश्चित आकड़ा कळाला. 
“म्हणजे तुझ्या पप्पांचा कामामध्ये झालेला नफा आणि सायमन चं त्यांचासोबत काम करण यांबद्द्ल तुला आधीच कल्पना होती तर “ डॅनियल तिला मधेच तोडत म्हणाला.

मेरी पुढे बोलू लागली, “सायमन माझ्या घरावर पाळत ठेउन होता, मी याबाबत अनभिज्ञच होते. आणि एका अनपेक्षित वेळी तो माझ्या समोर आला आणि त्याने मला रुबेलाला मारण्याची आणी पैसे शेअर करण्याची ऑफर दिली, माझ्या वडिलांनी मिळविलेला नफा आणि त्याच्याबद्दल मला प्रथमच समजत होते अस त्याला वाटत होते. त्यामुळे तो जास्तच फुशारकी मारत होता. मी त्याचा भ्रम तसाच राहू दिला आणि त्याला थोडासा वेळ मागुन घेतला कारण मला रचायचा होता एक डाव, एक माईंडगेम. त्यानुसार एके रात्री मि तुझ्याकडे आले आणि तुझ्यावर एक काम सोपवलं आणि ते तु अगदी  उत्तमरीत्या पार पाडलेले आहेस.

“मिलियन डॉलरचा प्रश्न असेल तर कामगिरी हि उत्तम राहणारच” डॅनियल दात दाखवत म्हणाला.
“रुबेलाला पप्पांकडून मला आलेल्या पत्राबबत समजलेले असणार कारण ते पत्र मी ज्या कपाटामधे ठेवलेले होतं ते आपल्या मूळ जागेपासुन काहीसं बाजूला सरकलेलं होतं आणि माझ्या कपड्यांची ठेवणीची पद्धतसुद्धा बदललेली होती.

“ वाव मेरी खुपच हुशार आहेस तू “ मधेच डॅनियल हसून म्हणाला.
“ त्यामुळे एक गोष्ट समजली की, रुबेलाला पैशाचा वाटणीबददल समजलेल असणार आणि इतकी कमी रक्कम आपल्याला मिळणार हे समजुन तिच डोक फिरल नसेल तर नवलच. दरम्यानच मला तिच्या जवळ असलेल्या पिस्तुलाबाबत कळालं, आणि तिच गोष्ट आपल्या पथ्थ्यावर पडली. सायमनला होकर कळवुन आपला माईंडगेम सुरु झाला. त्या रात्रि मी सांगितल्याप्रमाणे तू सायमनच्या घराची माहिती मिळवली रात्री सायमन पार्कमधे रपेट मारायचा, तू रुबेलाला निनावी फ़ोन केलास आणि पार्कजवळ बोलावलस. रूबेला तिथे आल्यावर हळूच झाड़ीमधून येउन तू तिची बॅग हिसकावलीस, आणि तिला काही कळायच्या आत पसारही झाला असशील. नंतर तू सायमनच्या रात्रीच्या रपेट मारण्याचा जागेवर आलास लपून सायमनवर गोळ्या झाडल्या पण ते करताना पिस्तुलावर तुझे ठसे सापडणार नाहीत याची काळजी घेऊनच, इकडे रूबेला तुला शोधत झाड़ीमधे फिरत असतानाच तू तिची बॅग आणि त्यामधे पिस्तुल ठेउन बॅग गाड़ीजवळ टाकुन निघून गेलास. रुबेलाला तू काही सापडला नाहीस, ती परत गाड़ी जवळ आली तिला तिथे तिची बॅग पडलेली दिसली असणार तिने ती तशीच उचलून पळ काढला असेल, आपल्या पिस्तुलातुन कोणीतरी गोळ्या झाडल्या आहेत हे तिच्या गावीही नसेल.

“ एकदम जबरदस्त असा हा प्लान तूच तर रचला होतास. मी फक्त तू सांगितल्याप्रमाणे केलं, बऱ पोलिसांना तुझा संशय आला नसेल ना” डॅनियलने गंभीरपणे विचरल.

“ अब्सोलुटली नॉट, कारण ज्यावेळी रुबेलाचा हा सगळा सावळा गोंधळ चाललेला असताना मी माझा घरी पिझा ऑर्डर केलेला होता, पिझावाल्या देणाऱ्या माणसाने त्याचा जबानीत मी त्या वेळी घरीच असल्याच सांगितलेल असणार.” 

“ मला सांग मेरी एवढा जबरदस्त प्लान तुला सुचलाच कसा” डॅनियलने आश्चर्याने विचारल.
“ त्याच का्य आहे डॅनि मी पदवीच्या शेवटच्या वर्षी क्रिमिनल साइकोलॉजी या विषयाचा विशेष अभ्यास केलेला होता. त्या अभ्यासतुनच मला समजल की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गुन्हे कसे करतात कोणत्या चूका करतात. एखाद्याचा मर्डर करताना कोणती दक्षता घेतात. कोणताही कट रचताना आपल्या त्यातील सहभागाशिवाय तो रचला गेला तर तो अधिकच यशस्वी होतो.  पुरावा मागे न सोडता नियोजनबद्धरित्या डाव आखला की झाल.” मेरिने आपलं बोलणं पूर्ण केल.

“ ओहो खुपच छान, बरं मला माझा हिस्सा कधी मिलणार “डॅनियलने अधाशासारख विचारल.

“ हिस्सा ना, मिळेल ना, पण मला आधी सांग की कॉलेज मधे असताना तुला पोहता येत न्हवत ना कारण आपण सगळे मित्र कॅम्पला जायचो तेव्हा नदीत सगळे डुंबायचे तेव्हा काठावर बसून पाहत असायचास फक्त तू, मग अजुन तू शिकलास  की नाहीस पोहायला” मेरिने थंडपणे स्मितहास्य करत डॅनियलला विचारल.

“ नाही शिकलो अजुन, मला पाण्याची भीती वाटते खरंतर” मधेच हे पोहण्याच बिहण्याच का्य काढल मधे हिने अस वाटुन डॅनियल जरा रागात म्हणाला.

"पोहण्यासाठी छान जागा आहे ना हि "मेरी उभी राहिली आणि डॅनियलच्या मागे आली डॅनियल तिचाकडे पाहत होता की हि करतेय काय 
“डॅनि तुला माहितीय एकही पुरावा मागे सोडता कामा नये कारण ते डाव रचणाऱ्याला खुपच घातक असतं. “ मेरी आश्चर्याने आकाशाकडे पाहत म्हणाली. “ ते बघ डॅनि, आकाशामध्ये ते  काय दिसत आहे.”

डॅनियलने कुठे काय अस म्हणत वर पहिलं, तस मेरिने मागुन अचानकपणे डॅनियलला जोरदार धक्का दिला, डॅनियल बेसावध होत किंबहुना त्याला अपेक्षाच न्हवती की मेरी असं काही करेल म्हणून, धक्क्याबरोबर डॅनियल नदीच्या पाण्यात पडला, त्याला अजुनही पोहता येत नसल्याची खात्री मेरिने आधीच केलेलीच होती, तिथल्या भयाण शांततेत डॅनियलला आरडाओरडा करायला देखिल फुरसद मिळाली नाही. नाकातोंडात पाणी जाऊन क्षणार्धातच डॅनियल नदीच्या तळाशी पोचला. आता खऱ्या अर्थाने तिचा माईंडगेम पूर्ण झालेला होता. अणि एकही पुरावा किंवा साक्षीदार मागे सुटलेला न्हवता. रुबेलाला सायमनच्या खुनासाठी शिक्षा तर  होणारच होती, आणि तिचे हक्काचे ९ मिलियन डॉलर विनासायास तिच्या खिशात आलेले होते.

समाप्त 


“ द माइंडगेम ” (भाग 3)


“ द माइंडगेम ” (भाग 3)


पैसा हा माणसाची बुद्धी फिरवतो हे खरंच आहे, त्याच पैशाच्या लोभापायी सायमन इतक्या लांब आला होता, पैशासाठी वाटेल ते करायची त्याची तयारी होती. आणि रुबेला तर पैशाची हपापलेली होतीच. दिवसभर मेरी सायमनच्या ऑफरचाच विचार करत होती. आपला नकार हा आपलं नुकसान करणारा ठरणार होता असं तिला वाटत होतं, इकडे रुबेला पण आपले फासे टाकायला तयार होतीच पण सध्यातरी तीचाकडून काहीच हालचाल दिसत न्हवती, किंवा तसं ती दाखवत होती. सायमनच्या ऑफरला उत्तर द्यायला अजून चोवीस तासांचा अवधी बाकी होता. 
रात्री सगळी निजानीज झाल्यावर मेरीच्या घरामागून एक आकृती हळूच बाहेर पडली, अंधारात आपण दिसणार नाही याची पुरेपूर खात्री त्या आकृतीने घेतली होती. बाजूच्या भिंतीला चिटकून उभी केलेल्या सायकलीवर  ती आकृती बसली पुन्हा इकडे तिकडे पाहून कानोसा घेतला, आणि सायकल चालवत आडरस्त्याने निघून गेली.

काही दिवस खूपच ताण असल्यासारखे गेले, मेरीला ते २ दिवस अक्षरशः युगासारखे वाटले. सायमनला होकार द्यायचा दिवस आला होता, दिवसभर मेरी त्याच तंद्रीत वावरत होती. बागेतल्या रोपांना पाणी घालून झालं, आज मेरीने जेवणात काही नवीन पदार्थ बनवले होते, बागेच्या कामातून वेळ काढून मेरी नवनवीन रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करत असे. रुबेला आल्यानंतर एकत्रच जेवणं उरकली, फारसं बोलण झालंच नाही. जेवणानंतर रुबेला तिच्या खोलीत झोपायला निघून गेली. मेरी काहीवेळ टीव्ही पाहत बसली, तिने घडयाळात पहिला तर घड्याळामध्ये आताशी अकरा वाजले होते, आज मेरीला सायमनला आपला निर्णय कळवायचा होता. आणि मेरीला सायमनला होकार द्यायचं आधीच ठरवलेलं होतं. आपला होकार कळल्यानंतर सायमन रुबेलाची विल्हेवाट लावणार होता. आपला कुठेही प्रत्यक्ष सहभाग येणार नसल्याने मेरी जराशी निश्चिंत वाटत होती. बारा वाजले तशी मेरी उठली टीव्ही बंद केलं आणि आपल्या खोलीकडे चालू लागली. जाण्याआधी तिने रुबेलाच्या खोलीबाहेर उभं राहून कानोसा घेतला आणि ती झोपलेली आहे कि नाही याची खात्री करून घेतली. न जाणो ती जागी असेल नसेल त्यामुळे खात्री करून घ्यावी असं मेरीला वाटून गेलं. रुबेला झोपलेलीच होती कारण तिच्या खोलीत शांतता वाटली निदान बाहेरून मेरीला तसं जाणवलं. नंतर मेरी जिने चढून आपल्या खोलीमध्ये आली. दार लॉक केलं आणि खिडकीजवळ आली, थोडावेळ रस्त्यावरील रात्रीची शांतता न्याहाळत उभी राहिली. उद्याचा दिवस काय नवीन गोष्टी घेऊन उजाडतो माहित न्हावत. घडयाळात बारा वाजून पंचवीस मिनिट झाली होती,
मेरीने कपाटातून टॉर्च घेतला आणि खिडकीजवळ आली, पडदा सरकवला आणि बाहेर पाहिलं काळा गडद अंधार होता, समोरच्या झाडीमध्ये सायमन थांबला असेल असं तिला वाटलं, बरोबर साडेबारा वाजता मेरीने टॉर्चचा प्रकाश झोत खिडकीबाहेर दाखवला सायमनला तो दिसावा म्हणून दोन वेळा चालू बंद पण केला आणि त्याचा प्रतिसादाची वाट पाहत बसली. रस्त्यावर खूपच शांतता होती, मेरीला जरा काळजी वाटत होती कि सायमन आपला इरादा बदलून रुबेलाला मदत तर नाही ना करणार , पण रुबेला पक्की वस्ताद असल्याने त्याने हि ऑफर खरंतर आपल्याला देऊ केली असणार नक्कीच. तेवढ्यात झाडीतून टॉर्चचा प्रकाश झोत दिसला. अंधारात तर तो खूपच उठून दिसला. याचा अर्थ सायमनला आपलं होकार कळला होता. त्या झाडांच्या गर्दीत कोणी उभं असेल असं वाटत देखील न्हवत. मेरीने पडदा लावला, एक मोठं कामं झालेलं असल्याप्रमाणे तिला वाटलं २ दिवस आलेला ताण जरासा हलका झाला होता. थोड्याच वेळात ती शांतपणे झोपी गेली. 
आपला होकार कळवल्यानंतर सायमनची वाट बघण्याखेरीज मेरीला दुसरा पर्यायच न्हवता. रुबेला आजकाल अबोल वाटत होती, दोघींमध्ये जास्त संभाषण तसंपण होत नसायचच. एके दिवशी रुबेला कामानंतर लवकर घरी आली, मेरी टीव्ही पाहत बसली होती, रुबेलाने आतमध्ये येऊन आपली पर्स टेबलावर ठेवली मेरीने तिचाकडे पाहिलं तर ती काहीशी अस्वस्थ वाटली,
“ तू ठीक आहेस ना” मेरीच्या या अचानक प्रश्नाने रुबेला काहीशी दचकलीच कारण रुबेलाच तिचाकडे लक्षच न्हवत.
“ हो मी ठीक आहे” कसबस सावरत रुबेला म्हणाली आणि तिच्या खोलीकडे जाऊ लागली. ती जात असताना मेरीची नजर तिच्या पाठमोऱ्या भागाकडे गेली रुबेलाचा टॉप मागून थोडासा फाटला होता. कोणत्या तरी वस्तूमध्ये अडकल्यासारखा वाटला, कदाचित फाटला असावा.
“तू खरंच ठीक आहेस ना ?” मेरीने फाटक्या भागाकडे पाहत विचारलं
“ होय.. तुला अजून काही विचारायचं..” काहीश्या संतापात रुबेला उद्गारली आणि दाराजवळच थांबली.
“ मी पिझ्झा ऑर्डर केला आहे तुला थोडा ठेवलाय “
“ नकोय मला “ एवढं बोलून आत वळून रुबेलाने धाड्कन दरवाजा लावून घेतला.

दोन दिवस काहीच झालं नाही, सायमन ला होकार दर्शवल्यानंतर ना सायमन कडून काही बातमी कि रुबेलाची काही हालचाल, मेरीला काहीतरी वेगळीच जाणीव होत होती, तिच्या पोटात ढवळून आल्यासारखं वाटत होतं. कारण लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागेल तेवढं मेरीला बरच होतं. तिसऱ्या दिवशी अचानक  दरवाजावरची बेल वाजली. मेरीने दरवाजा उघडला आणि समोर पाहते तर काय समोर एक पोलीस अधिकारी उभा होता,
“ येस कोण हवंय आपल्याला “ मेरीने काहीसं चाचरतच त्याला विचारलं.
“ गुड इविनिंग , मी डिटेक्टिव्ह स्कॉट, ब्रॅडफोर्ड  पोलीस डिपार्टमेंट. “ मोठ्या आदबीन तो बोलला.
“ हो या नं “ मरीनं त्या पोलिसाला घरात घेतलं. तोवर रुबेला तिच्या खोलीमधून बाहेर आलीच होती. पोलिसाला पाहून ती जराशी कावरीबावरी झाली,
“ काय झालं ऑफिसर काय काम आहे तुमचं” रुबेलान काहीश्या संशयाने आणि गडबडीने विचारलं.

ऑफिसर शांतपणे आत आला आणि सोफ्यावर बसला. सभोवार नजर फिरवली आणि मग रुबेलाकडे पाहत म्हणाला “तुमची ओळख “
“ मी या घराची मालकीण रुबेला किडमन “ रुबेला ठसक्यातच म्हणाली, पोलीस अधिकारी असला म्हणून काय झालं त्याचं हे असं विचारण रुबेलाला आवडलं नाही. पण घराची मालकीण म्हणून रुबेलाने केलेला स्वतःचा उल्लेख मेरीला तितकासा रुचला नाही. पण लगेचच
“आणि तुम्ही” आपली नजर मेरीकडे वळवून त्या डिटेक्टिव्हने विचारलं.
“ मी मेरी आणि हि माझी सावत्र आई “ मालकीण म्हणून केलेल्या रुबेलाच्या उल्लेखनाला प्रतुत्तर म्हणून मेरी तसं बोलली.
“ हम्म “ असा आवाज काढून तो डिटेक्टिव्ह घरभर आपली नजर फिरवू लागला. मेरी आणि रुबेला त्याचाकडेच पाहत होत्या.

“ काही दिवसांपूर्वी ग्रीन वॅली पार्क मध्ये एका इसमाचा मृतदेह आम्हाला आढळला होता त्याचा संदर्भात चौकशी करायला आलो आहे.” डिटेक्टिव्ह आपली घारीसारखी नजर घरभर फिरवत म्हणाला.

मेरीने चमकून रुबेलाकडे पहिलं, ती त्या डिटेक्टिव्हकडेच पाहत होती. डिटेक्टिव्ह पुढे म्हणाला “ मृत इसमाच नाव बेन्जामिन असं होतं, या इसमाला गोळ्या घातल्या गेल्या होत्या.” हे ऐकून मेरीने तोंडावर हात ठेवला.
“ पण त्या इसमाचा आणि आमचा काय संबंध.” रुबेलाने विचारणा केली.

“ तो इसम इथे जवळपासच राहत होता, त्यामुळे या भागातील सगळ्या रहिवाश्यांची चौकशी करत आहोत, तुम्हाला याबद्दल काही माहित आहे का? माहित असल्यास पोलिसांना सांगा आणि त्यांना सहकार्य करा.

“ अहो पण तो बेन्जामिन का कोण, काळा का गोरा हे देखील आम्हाला माहित नाही आमचा या घटनेशी काही संबंध नाही “ रुबेला वैतागून बोलली .

डिटेक्टिव्हने रुबेलाकडे निरखून पाहिलं, रुबेलाच्या सतत प्रश्न विचारण्याने तो जरासा चिडलेला दिसला तरीही संयम बाळगून तो पुढे म्हणाला“ संबंध आहे कि नाही ते आम्ही शोधून काढूच, पण तुम्ही दोघींनी हॉस्पिटल मध्ये  शवागारामध्ये येऊन त्या मृत इसमाची डेड बॉडी पहा कदाचित त्याचा चेहरा तुमच्या ओळखीचा असेल” डिटेक्टिव्ह दोघींची हालचाल बारकाईने टिपत होता. 
मेरी स्तब्ध होऊन रुबेलाकडे पाहत होती तर रुबेला जणू काही हा काय भलताच प्रकार असल्याप्रमाणे एकदा मेरीकडे आणि परत त्या डिटेक्टीव कडे पाहत होती.

मेरीने त्या डिटेक्टिव्हला आपण येऊ असं सांगितलं  मग काही वेळाने तो  निघून गेला.

दुसऱ्या दिवशी मेरी आणि रुबेला शवागारात गेल्या, तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना आतमध्ये नेलं, आतमधल वातावरण स्मशानापेक्षा कमी न्हवत, एक विचित्र वास तिथे दरवळत होता. समोर लोखंडी कपाटे रांगेत लावलेली होती. मेरी रुबेलाला चिटकून त्या अधिकाऱ्यामागे चालली होती. तो अधिकारी एका कपाटाजवळ आला, एका कप्प्याच हँडल पकडून ओढलं, कप्पा बाहेर आला, एक माणूस झोपेल एवढा मोठा कप्पा होता तो, मेरी आणि रुबेला लांबच उभ्या होत्या त्या धास्तावलेल्या दिसत होत्या. 

“ पुढे या ” तो अधिकारी बोलला.
तसं त्या दोघी सावकाश पुढे गेल्या, त्या काप्य्यामध्ये एका माणसाच शव होतं. दोघींनी पुढे होऊन त्या माणसाचा चेहरा पहिला, मेरीला त्याचा चेहरा पाहून गरगरल्यासारखच झालं. ती पडता पडता वाचली कारण तो मृत इसम दुसरा तिसरा कोणी नसून “सायमन” होता. 
“ओळखीचा वाटतो का चेहरा” तो अधिकारी म्हणाला.
“ नाही” रुबेला पटकन म्हणाली. खरंतर तिला पटकन असल्या घाणेरड्या वातावरणातून बाहेर सटकायच होतं.
मेरीनेदेखील नकारार्थी मान हलवली.
“ आम्ही याला ओळखत नाही ऑफिसर आता आम्ही जाऊ शकतो का” रुबेला फणकार्याने म्हणाली. त्या अधिकाऱ्याने जायला परवानगी दिली. रुबेलाला ऑफिसला जायचा असल्याने तिने मेरीला घरी सोडलं आणि ती  ऑफिसला निघून गेली. मेरी तडक आपल्या खोलीमध्ये जाऊन पडली आता तिला चांगलीच काळजी वाटू लागलेली होती. सायमन जो बेन्जामिन या नकली नावाने इथे वावरत होता आपल्या घरावर पाळत ठेऊन होता त्याचा खून झाला होता. मेरीने आपण त्याला ओळखत नसल्याच खोटच सांगितलं कारण तिला दुसरं काही सुचलंच नाही. रुबेला तर त्याला साहजिकच ओळखत नसावी. मेरीला जरासं दडपण आल होता अत्यंत गूढपणे सायमनचा मृत्यू झाला होता. तो रुबेलाची विल्हेवाट लावण्याआधीच त्याची वाट लागली होती. खरंच कोणाच कृत्य असावं हे.मेरी डोळे मिटून पडली होती आणि त्या दिवशी रुबेलाचा फाटलेला टॉप मेरीला आठवला रुबेला खूपच अस्वस्थ वाटत होती तेव्हा काय झाला असेल तिला कोणास ठाऊक. शवागारातील तो विचित्र दर्प मेरीला अजूनही जाणवत होता...
क्रमशः

“ द माइंडगेम ” (भाग २)



“ द माइंडगेम ” (भाग २)


दुसऱ्या दिवशी मेरी लवकर उठली. कालचा प्रसंग अजून तिला आठवत होता, रात्री आपल्या खोलीबाहेर घुटमळनाऱ्या पावलांच्या आवाजाने तिची झालेली भयप्रद अवस्था आठवून तिला सकाळीसुद्धा घाबरल्यासारख झालं. रुबेलाल याबाबत विचारावं असं मेरीला वाटू लागलं.
तिने रुबेलाला विच्रारल “ मॉम काल तू किती वाजता आली होतीस गं”
“काल लवकरच आले गं “ काहीस तिरकसपणे मेरीकडे पाहत रुबेला म्हणाली.
“हो पण किती वाजता “ मेरीने अधिरतेने विचारलं.
“ साधारण अकरा साडेअकरा वाजले असतील” “पण का गं “ रुबेलाने साशंकतेने विचारलं.
रुबेलाल मेरीचं असं प्रश्न रुबेलाल खचितच रुचलं नाही. 
तिची ती संशयी नजर मेरीला लगेच जाणवली, 
“ काही नाही तुझासाठी पेस्ट्री बनवणार होते पण तू उशिरा येशील म्हणून नाही बनवली त्यामुळे विचारलं.” मेरीने कशीबशी वेळ मारून नेली. रुबेलासुद्धा काहीही न बोलता इतर कामाकडे वळाली. पण मेरीचं विचारचक्र काही थांबेना रात्री तिला जी चाहूल जाणवली ती कोणा व्यक्तीची होती कि तिला झालेला भास होता. कि ती रुबेलाच होती आणि खोटं बोलत होती. मेरीच मन आता शंका कुशंका नी भरून गेलं होता. घराबाहेर रात्री कोणीतरी सिगारेट ओढत थांबत, आणि अशाच एका अपरात्री आपल्याला खोलीबाहेर कोणाचीतरी चाहूल जाणवते की सारच अगम्य होतं. त्यात अजून रुबेलाच्या पिस्तुलाच गौडबंगाल अजून होतंच, त्याबाबतीत मेरीने मनाची समजूत घातली होती कि ते रुबेला स्वसंरक्षणसाठी ते बाळगत असेल पण आता तिचं मन काहीसं साशंक झालेलं होतं. कसल्यातरी विचित्र घटनांची हि चाहूल तर नसावी ना असं उगाचच वाटून मेरीच्या अंगावर शहारा आला.
त्या रात्री रुबेला लवकरच घरी आली, तेव्हा मेरी जागीच होती म्हणून दोघींनी जेवण एकत्रच केलं. जेवण करून रुबेला लगेचंच झोपायला गेली ती झोपयला गेली कि नाही याची खात्री करूनच मग मेरी आपल्या खोलीत झोपायला आली.   
अचानक मध्यरात्री हलकासाच कडकड असा आवाज झाला. पण त्या भयाण शांततेत तो आवाज उमटलाच होता. मेरी अर्धवट जागी झाली, कोणीतरी खोलीच्या बाहेरून कि हॉलमध्ये चावी फिरवत असल्यासारखा आवाज होता तो. मेरी दार तर व्यवस्थित लॉक केलेल होतं. पण आवाजासरशी मेरी धडपडत जागी झाली. आपल्याला स्वप्न पडलं कि काय असं मेरीला क्षणभर वाटलं. त्यामुळे मेरीने स्वतःला चिमटा घेऊन पाहिलं. पण कोणीतरी आपल्या खोलीचं बाहेरून लॉक उघडतंय हे मेरीला समजायला काही क्षणच लागले. ती बिछान्यावर उठून अर्धवट उठून बसली होती, दिवे बंदच होते खोलीमध्ये जास्त प्रकाश न्हवता. मेरीचा चेहरा घामाने डबडबला होता. अगदी निश्चितपणे कोणीतरी  खोलीमधे यायला पाहत होता, ते नक्कीच स्वप्न न्हवत. मेरी आता खडबडून जागी झाली. मेरीला काय करावे ते सुचेना. चावी फिरवण्याचा आणि दार ढकलण्यासाठी असणाऱ्या मुठेचा कर्र असा आवाज आला. बाजूच्या टेबलावरचा फ्लॉवरपॉट मेरीने चटकन हातात धरला. बाहेर जे कोणी असेल ते आत येत क्षणी त्याचा डोक्यात घालायचा विचार तिने पक्का केला. लॉकच्या होलमधील चावीची धडपड थांबली. त्या व्यक्तीला लॉक उघडण्यात यश मिळाल होतं. मेरीने फ्लॉवरपॉट वरची पकड घट्ट केली. दरवाजा उघडला गेला आणि ..
“मेरी घाबरू नकोस मी तुला कसलीही इजा करणार नाही, मला तुझा हितचिंतकच समज” आत येण्याआधीच त्या व्यक्तीचा घोगरा आवाज आला होता. शांत पण धीरगंभीर असा तो आवाज एका बेडर व्यक्तिचा वाटला. आवाजावरून ती व्यक्ती पुरुष असावी असा वाटत होता. मेरी जागच्या जागी गोठली होती, रुबेला जागी असेल का? कि मोठ्याने किंचाळून तिला जागे करावं असा तिला वाटून गेलं. एवढ्यात त्या व्यक्तीने भिंतीवरील दिव्याचं बटन चालू केलं. आणि संपूर्ण खोली प्रकाशाने उजळून गेली. मेरी जराशी दचकली तिने फ्लॉवरपॉट उचलून धरला. अगदी मध्यम वयाचा दिसणारा साधारण चाळीशी पंचेचाळीशीचा माणूस तिच्यासमोर उभा होता, अंगात कोट खाली बूट, रुंद खांदे, काळेभोर खोलवर गेलेले डोळे, जरासे पिंगट केस चांगला सहा साडेसहा फुट उंच असा एकूण त्याचा वेश होता.
“मेरी फ्लॉवर पॉट खाली ठेव , मी तुला काहीही इजा करण्यासाठी आलेलो नाहीये.” तो शांतपणे म्हणाला. आणि आपले हात पुढे एकमेकांवर ठेवत मेरीकडे थंड दृष्टिने पाहू लागला. तो अजूनही दारामध्येच उभा होता. मेरीकडे येण्यासाठी कसलीही चपळाई किंवा धडपड त्याने केलेली न्हवती. म्हणूनच मेरीने फ्लावर पॉट उगारण्यासाठी वर घेतलेला हात खाली केला पण फ्लॉवरपॉट हातातून सोडला नाही.
“ कोण आहात आपण, अशा वेळी चोरासारखं दुसऱ्याचा घरात तुम्ही कसं काय घुसू शकता, याबद्दल मी तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करू शकते.” मेरी न थांबता पटापट बोलली. बोलताना तिच्या छातीतील धडधड अजून वाढलेली होती. तरीही धाडसाने ती बोलली.
“ तू असा काही करणार नाहीस, कारण तू अस केलंस तर त्यात तुझंच नुकसान असेलं” तो माणूस शांतपणे म्हणाला. तो अजून दारामध्येच जागच्या जागीच हातावर हात ठेवून उभा होता.
मेरीला समजेचना या माणसाला पोलिसांच्या हवाली करण्यात आपलं काय नुकसान होईल. कपाळावरील घाम दुसऱ्या हाताने पुसत मेरी पुढे बोलली “ कोण आहात आपण” इथे अपरात्री चोरासारखं घुसण्याच काय कारण आहे ?
“ माझा नाव सायमन, मी तुझा वडिलांसोबत काम करत होतो, एका महत्वाचा गोष्टीबाबतीत मी तुला सावध करायला आलोय, असं बोलून त्या माणसाने कोटाच्या खिशातून एक फोटो काढून तो मेरीच्या पुढे बिछान्यात फेकला. मेरीने तो घेतला, तो तिच्या वडिलांचा आणि स्वतःला सायमन म्हणवणाऱ्या या माणसाचा एकत्रित फोटो होता.
“मेरी आपण दिवे घालवून अंधारात बोलू कारण रुबेला जागी होण्याची शक्यता आहे.”  असं बोलून त्याने बाजूची खुर्ची हळूच जवळ ओढून मेरीच्या होकाराची वाट पाहत बसला. मेरीने शांतपणे विचार केला आणि सायमनला दिवे विझवायला होकार दिला. सायमनने दिवे विझवले, आणि बाजूच्या खुर्चीत तो बसला. अंधारात मेरीला तो अंधुकसा दिसत होता, मेरीने फ्लॉवरपॉट आपल्या बाजूला ठेवला. मेरी आता जराशी स्वस्थ झाली होती.
“कोणत्या कारणासाठी तुम्ही इथे आलाय” मेरीने प्रश्न केला.
सायमनने आपल्या कोटाच्या खिशातून एक सिगरेट काढली आणि ती पेटवली आणि बोलायला सुरुवात केली
“ विल्यमच्या ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये मी विल्यामचा सहकारी म्हणूनच काम करत होतो, युरोप मध्ये आम्ही एकत्रच काम केलं, खूप सारी कामे आम्हाला मिळाली होती. सिझन मधल्या फळांची देवाणघेवाण हे आमचं सर्वात बहुमूल्य काम असे. त्यातून विल्यमला बक्कळ पैसा मिळालेला होता. अर्थात त्याचा सहकारी म्हणून आम्हालादेखील मिळाला. मागच्या सिझनमध्ये सगळ्या उत्पादनांची देवाणघेवाण आमच्या मार्फत झाली, आम्ही खूप नफा कमावला. त्या रात्री मी आणि विल्यामने आनंदामध्ये खूप दारू ढोसली. दारूच्या नशेत विल्यम खूप हळवा झाला होता. आपली मुलगी मेरी किती गोड आहे आपण तीचापासून कसे दूर आहोत याबद्दल भरभरून बोलत होता. रुबेला हि कशी पैशाची भुकेली बायको आहे हे देखील सांगत होता. याचाच फायदा घेत मी विल्यमला दारूचा आग्रह करत मी त्याचा एकूणच मिळकतीबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला कि त्याचा मागे त्याने कमावलेले जवळपास ९ मिलिअन डॉलर त्याने सुरक्षितपणे मेरीला मिळतील अशी व्यवस्था त्याने केलेली आहे. 
मेरी शांतपणे त्याच बोलण ऐकत होती.
“ पुढे विल्यम मृत्यू झाला, त्याने आजपर्यंत मिळवलेली संपत्तीपैकी जवळपास आठमिलिअन डॉलर तुला मिळेल आणि राहिलेली एक मिलिअन डॉलर रुबेलाला, कारण व्यावहारिक दृष्टिने का होईना रुबेलाने आपल्यामागे मेरीची काळजी घेतलेली होती आणि हे वाटप असंच व्हावं अशीच व्यवस्था विल्यमने केली होती, तर माझी इच्छा अशी आहे कि... असं म्हणून सायमनने जरासं दीर्घ श्वास घेतला. 
" काय इच्छा आहे " मेरीने विचारणा केली.
'' त्या मिलिअन डॉलर मधले निम्मे म्हणजे चार मिलिअन डॉलर मला मिळावेत एवढंच." सायमनने आपलं पुढचं वाक्य पूर्ण केलं आणि सिगरेटचा एक दीर्घ झुरका घेतला. तसं खोलीच्या अंधारात त्याचा सिगारेटच लालबुंद टोक स्पष्ट दिसलं.
काही क्षण शांततेत गेले. मेरी ऐकून सुन्नच झाली. “पण मी तुला का पैसे द्यावेत.” मेरीने  विचारले.
यावर मात्र सायमनने काहीच उत्तरं दिलं नाही थोड्या वेळाने तो आणि म्हणाला.

“ चांगला प्रश्न विचारलास, त्याचं असं आहे कि मेरी, तुझा सावत्र आईच्या वाट्याला फक्त एक मिलिअन डॉलर आले आहेत, त्या अधाशी महिलेला पैशाची किती चटक आहे हे तुला माहितच आहे. ते मी सांगायला नको. आणि तुला मिळणार ८ मिलिअन, हे समजल्यामुळे तिने तुला ठार मारण्याचा डाव रचला आहे, ती पाताळयंत्री बया पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. तुला मारल्यानंतर तुझे बाकीचे पैसे विल्यमची पत्नी म्हणून सुद्धा तिलाच मिळतील आलं लक्षात. तर गोष्ट अशी आहे कि तुझा जीव धोक्यात आहे  आणि तू तुझं रक्षण करण्याइतकी सक्षम नाहीयेस, पण मी तुला वाचवू शकतो, रुबेला तुझ्या केसालासुद्धा धक्का लावू शकणार नाही. फक्त त्याबदल्यात मला तू चार मिलिअन द्यावेस. रुबेलाच काय करायचं ते मी पाहीन ती तुला काहीही त्रास देऊ शकणार नाही उलट तिच्या वाट्याचे एक मिलियन सुद्धा आपल्याला म्हणजे तुलाच मिळतील म्हणजेच तुझाकडे सगळे ९ मिलियन असतील, म्हणजेच तुला ५ आणि मला ४ मिलिअन मिळतील. मग बोल काय वाटतंय तुला.”

एवढ बोलून सायमन परत शांत बसला. मेरीला काय खर काय खोटं हेच समजेना. खरंच रुबेला आपल्याला मारू शकते यावर तिला काहीच सुचेना, तिच्या पर्स मधील पिस्तूल याच कारणासाठी तर ती ठेवत नसेल ना कि कधीतरी आपला काटा तिला काढता येईल. मेरी ला क्षणभर भणभणल्यासारख झालं.
" पण हीच ऑफर तू रुबेलाला सुद्धा देऊ शकतोस म्हणजे रुबेलासोबत मिळून तू माझा काटा काढू शकतोस, तसं करूनसुद्धा तुला पैसे मिळू शकतात. मेरीने उलट प्रश्न केला.
" अहं... तिच्यासोबत मिळून तुला मारलं तर सगळे पैसे रुबेलाला मिळतील. आणि ती पैशाला वखवखलेली बाई आपलं शब्द पाळेल कि नाही यात शंकाच आहे, तुझा काटा काढल्यावर ती बाई सरळ हात वर करेल आणि मला पैसे द्यायला नकार देईल. आईवडिलांविना एकटी पडलेली तू मला असं काही करू शकणार नाहीस, त्यामूळेच हि ऑफर तुला देण मला योग्य वाटत' सायमन सिगरेटच्या धुराची वलये हवेत सोडत म्हणाला.

हा कोण कुठला सायमन रुबेलाला किंवा आपल्याला खरंच मारू शकतो काय. आणि आपलं दुर्बल आहोत म्हणूनच तो हि ऑफर आपल्याला देतोय असं मेरीला वाटलं. रुबेला खरंच आपला काटा काढू शकते त्यात तिला यत्किंचितही वावगं वाटणार नाही याची मेरीला खात्री वाटत होती. वडील गेल्यानंतर देखील तिने मेरीला आधार दिलेला न्हवता कि मायेने आपुलकीने धीर दिलं नाही. त्यामुळे सायमन म्हणतोय तसं रुबेला आपल्याला मारण्याचा डाव आखेपर्यंत खालच्या पातळीला जाऊ शकते. 

 “रुबेलाला तू कसं हाताळणार “ मेरीने विचारले.
“वेल ..तू त्याची काळजी करू नकोस मी तिची व्यवस्थित विल्हेवाट लावीन.” सायमन अगदी सहजंच रोजच काम असल्यासारखं बोलला.
" आणि रुबेला मला मारायचा डाव रचते आहे हे तू एवढं खात्रीपूर्वक कस की सांगू शकतो" मेरीने सायमनला साशंकतेने विचारलं.
" इथे या शहरात आल्यापासून मी तुमच्या घरावर पाळत ठेवून आहे, तुमचा घरात कोण येत कोण जातं याची इत्यंभूत माहिती मी मिळवली आहे, काही दिवसांपूर्वीच मी रुबेलाचा पाठलाग करत होतो. रात्रीची वेळ होती, अलेक्स गन शॉप या गन विकणाऱ्या डीलर जवळ रुबेलाने आपली गाडी थांबवली होती. मी बाहेरच थांबलो होतो. काही वेळाने ती निघून गेली तसं मी दुकानात शिरलो म्हटलं गन शॉप मध्ये हि बया का शिरली याची चौकशी तरी करावी. आत जाऊन मी बंदुकांची चौकशी करू लागलो व ते करता करता मी मगाशी आलेली महिला काय घेऊन गेली याची त्या दुकानदाराला संशय न येत चौकशी केली, तर बया लहानशी पिस्तून विकत घेऊन गेली होती असं मला समजलं आणि ती अशी शस्त्र जवळ का बाळगते याबद्दल माझा कयास असा झाला कि ती काहीतरी डाव रचते आहे" सायमनने सांगितलं.
" कदाचित शहरातल्या वाढत्या चोरांच्या सुळसुळाटामुळे स्वसंराक्षणासाठी तिने पिस्तून घेतलं असेल यात गैर की आहे." मेरीने सायमनला विचारलं. 
" हम्म मलादेखील तसंच वाटलं आधी पण पिस्तून घेतल्याची अधिकृत नोंदणी करू नका यासाठी दुकानदाराला जास्त पैसे तिने का द्यावेत आणि तसदेखील तिचाकडे पिस्तूल वापरण्याचा परवाना देखील नाहीये, म्हणजे मी तशी चौकशी केली आहे. सायमन अस्फुट हसत म्हणला.
रुबेलाने पिस्तून घेतलं यावर मेरी आश्चर्य चकित होईल असं सायमनला वाटून तो मेरीच्या बोलण्याची वाट पाहू लागला.

“जर मी तुला पैसे द्यायला नकार दिला आणि पोलिसांकडे गेले तर? “ मेरीने विचारलं.

या अनपेक्षित प्रश्नाने खरंतर सायमन बावचाळला तरीही तो म्हणाला "दोन्हीही पर्याय तुलाच घातक ठरतील कारण जर माझी ऑफर जर स्वीकारली नाहीस तर मी रुबेलाल सांगेल कि मेरीने मला तुला मारण्यासाठी पाठवला आहे. माझा अभिनय पाहून ती बावळट अधाशी बाई लगेचच विश्वास ठेवेल. मग तुला मारण्यासाठी मी तिच्याकडून पैसे घेईन अर्थात ४ मिलिअन पेक्षा ते कमी असतील पण ती मला रग्गड पैसे देईल यात शंकाच नाही. मला ते पैसे देखील चालतील. राहिला पोलिसांचा प्रश्न. तर मी सध्या या देशात एका वेगळ्याच नावाने वावरत आहे, एक वेगळीच ओळख, आणि ते सिद्ध करणारी भरपूर कागदपत्रे माझाकडे आहेत. त्यामुळे सायमन या व्यक्तीला ते ओळखेपर्यंत तुझा थडग बांधल सुद्धा जाईल. मला रुबेलाकडून पैसेही मिळालेले असतील आणि पोलिसांना कळेपर्यंत मी जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असेन. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती मध्ये माझा तोटा काहीच नाहीये. त्यामुळे एकतर माझी ऑफर स्वीकार कर अन्यथा मी हि ऑफर रुबेलाला देईन ज्यात मला तुला मारण्यासाठी रुबेला नाही म्हटलं तरी ६०-७० हजार डॉलर्स देईलच ज्यात तुझं थडगे बांधण्याची व्यवस्था देखील असेल.” सायमन खुर्चीतून उठला आणि दाराजवळ उभं राहून मेरीच्या उत्तराची वाट पाहत होता. 
सायमन म्हणतोय त्यात नक्कीच तथ्य होत त्याला कोणा ना कोणाकडून पैसे मिळणारच होते, फक्त मेरीकडे तो आधी ऑफर घेऊन आला होता कारण मेरीने जर ऑफर स्वीकारली तर त्याला ४ मिलिअन चा फायदा होणार होता इतकंच. 

“ मला विचार करायला वेळ हवाय” मेरी म्हणाली.

“ ओके काही हरकत नाही तुला परवा पर्यंतचा वेळ देतो तोपर्यंत ठरव काय ते, परवा रात्री साडेबाराला तुझा खिडकीतुन टॉर्चचा प्रकाश समोरच्या झाडीमध्ये दाखव. मी तेव्हा समोरच्या झाडीतच उभा राहीन आणि झाडीमधून पाहीन आणि प्रतिसाद म्हणून तुलादेखील माझाजवळ असलेल्या टॉर्चचा प्रकाश दाखवून इशारा करेन. तुझा टॉर्चचा प्रकाश पाहून मी समजून जाईन कि तुला ऑफर मान्य आहे म्हणून. आणि नंतर मी टॉर्च दाखवेन ओके. 

 सायमनच्या बोलण्यावरून तो पूर्ण तयारीत असल्यासारखा वाटत होता. त्या रात्री सायमनच सिगारेट ओढत झाडीत उभं असणार आता मेरीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, सायमन त्यांचं घरावर पाळत ठेवून होता तर. त्या रात्री अचानक खोलीबाहेर जाणवलेली ती चाहूल म्हणजे सायमनच असणार. दुसऱ्याचा घरामध्ये विनासायास तो घुसू शकत होता, आणि पैशासाठी तर कोणाचाही मुडदा पडण्याची तयारी होतीच. जे काही करायचं ते त्यात जरासुद्धा चूक झाली तर जीवावर बेतणार होतं. 

“ठीक आहे मी परवा रात्रीपर्यंत आपलं निर्णय कळवीन” मेरी म्हणाली.

“ओके, चालेल परवा रात्री. आता मी निघतो “ अस म्हणून सायमन आल्यापावली सावकाशपणे बाहेर पडला. 
सायमन निघून गेला तरीही पण मेरी अजून बिछान्यात तशीच विचार करत बसून होती....

क्रमशः

“ द माइंडगेम ” (भाग १)

“ द माइंडगेम ” (भाग १)

थंडीच्या दिवसातील ती एक प्रसन्न सकाळ होती. मेरी आज नेहमीपेक्षा लवकरच उठली होती. उठल्याबरोबर तिने खिडकीतुन बाहेर पाहिलं. आदल्या दिवशी रात्री हिमवृष्टी झाल्यामुळे सगळीकडे बर्फाचे थर साचलेले होते. झाडांच्या पानावर बर्फ साचून एक जड थर निर्माण झाल्यामुळे ते दृष्य मोठे विलोभनीय दिसत होते. रस्त्यावर बर्फ साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून काही कर्मचारी रस्त्यावरुन साचलेले बर्फ बाजूला करत होते. रस्त्यावर पडलेलं कोवळं ऊन पाहून मेरीला जरा बरं वाटलं. सकाळचं आन्हिक आवरून मेरी ब्रेकफास्ट करायला खाली आली. मेरी टेबलावर बसली कि लगेचच रुबेलाने न्याहारीची थाळी मेरीपुढे सरकवली. 
संपूर्ण घरामध्ये फक्त दोनच व्यक्ती राहत असत. एक मेरी आणि तिची सावत्र आई रुबेला. हा पण रुबेला हि काही जन्मापासून सावत्र आई न्हवती. मेरीचे वडील विल्यम यांचा स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता. कामानिमित्त त्यांना सतत देशाबाहेर जावे लागत असे. युरोप मध्ये विल्यम यांनी आपल्या व्यवसायाचं जाळे पसरवून मोठा नफा कमावला होता. त्यांचं त्यांच्या एकुलत्या एक मुलीवर मेरीवर मनापासून प्रेम होतं.  मेरी हि खूपच चुणचुणीत मुलगी होती, अभ्यासात कायम पुढे, तिचा वडिलांना तिचा खूपच अभिमान वाटायचा. मेरीची आई मेरी दहा वर्षाची असतानाच वारली. मेरीचं मातृछत्र हरवलं तशी ती खूपच उदासवाणी झाली, तिचा वडिलांनी विल्यम यांनी तिला तऱ्हेतऱ्हेची अनेक ठिकाणे दाखवून आणली, तरी मेरी पहिल्यासारखी उस्फुर्त झाली नाही. विल्यमला कामामुळे बाहेर राहावे लागे, अशा परिस्थिती मध्ये विल्यम मेरीकडे कसे लक्ष देणार होते. हसरी बोलकी मेरी आता खूपच शांत आणि उदासपणे वावरत असे. विल्यमला तिची खूपच काळजी वाटत होती. आपल्या अनुपस्थितीत मेरी कशी जगू शकेल, नीट खाऊ पिऊ शकेल कि नाही याचीच चिंता त्यांना भेडसावत होती. मेरीला देखभालीची गरज होती किंबहुना आधाराची, त्यामूळेच विल्यम दुसऱ्या लग्नाला तयार झाले केवळ नाईलाज म्हणून किंवा मेरीसाठी त्यांनी हे पाउल उचललं. मेरीला याबद्दल काहीच आक्षेप न्हवता, किंबहुना तिला आताशा कोणत्याच गोष्टीबाबत आक्षेप नसे. शेवटी अशा प्रकारे विल्यम आणि मेरी यांच्या आयुष्यात आगमन झालं रूबेलाच, विल्यम यांची दुसरी पत्नी म्हणून. विल्यमची संपत्ती पाहूनच कदाचित रुबेला तयार झाली असावी. कारण आपल्या नवऱ्याला त्याचा पहिल्या पत्नीपासून मुल आहे आणि ते आपल्याला सांभाळावे लागणार आहे हे पाहून स्त्रिया कोणाची दुसरी पत्नी व्हायला सहसा तयार होत नसत. रूबेलाच लग्न कधीच झालेलं न्हवत. कामाच्या निमित्ताने एकदा विल्यम यांची रुबेलाची ओळख झालेली होती. रुबेलाला जवळचं असं कोणीही न्हवते. विल्यम यांनी रुबेलाला आपल्या घरावर ओढवलेली परिस्थिती सांगितली तशी रुबेलाने त्यांना होकारार्थी मान हलवली. रुबेला हि आर्थिक दृष्ट्या यथातथा असणारी स्त्री, कोरड्या मनाची आणि बऱ्यापैकी व्यावहारिक असणारी. विल्यमकडे विचार करायला फारसा वेळ न्हवता. तिचा होकारासरशी विल्तयम आणि रुबेला विवाहबध्द झाले. रुबेला व्यावहारिक असूनदेखील ही रुबेलाने मेरीचा नीट सांभाळ केला, पण त्यामध्ये मेरीला कधी प्रेमाची ऊब जाणवलीच नाही. एक काम म्हणून ती रुबेलाचा सांभाळ करे. तिला हवं नको ते सगळं पाहे. अर्थात असं केलं तरच रुबेलाला विल्यमच्या अलिशान घरात त्याची पत्नी म्हणून राहता येणार होतं. विल्यम देशाबाहेर गेले कि मेरीला नेहमी आपल्या वडिलांची आठवण येत राही. विल्यम मध्ये मध्ये त्यांना पैसे पाठवत असत मेरीसाठी काहीतरी भेटवस्तू पाठवत. रुबेलाची मात्र चंगळ व्हायची येणाऱ्या पैशातून रुबेला महागड्या वस्तू, पार्लर, शॉपिंग यामध्ये रुबेला यथेच्छ पैसा उडवायची. पण तिला हेही पैसे कमी पडायचे, तिच्या तुटपुंज्या पगारामध्ये तिची चैन भागायची नाही, नशिबानेच विल्यमची पत्नी होण्याचं भाग्यं तिला मिळालं होतं. त्यामुळे ती विल्यामकडे सारखी पैशासाठी तगादा लावायची. जगाला दाखवायला ती नोकरी करायची पण पैसा हा तिची कमजोर कडी होता. आपण फक्त नवऱ्याच्या पैशावर मजा मारतो असा कोणाला वाटू नये म्हणूनच तिने नोकरी सोडलेली न्हवती. पैसे मिळाले कि ती आपल्या सगळ्या हौस मौज भागवत असे, त्यामुळे इतर कोणत्या गोष्टीकडे ती फारसं लक्ष देत नसे, बाकी मेरीला तिने त्रास वगैरे काही दिला न्हवता. तिला फक्त पैशाची चटक होती आणि तो तिला मिळत होता बाकी तिला कसलीही परवा न्हवती. त्यामुळे तिने मेरीवर कसलेही बंधन वगैरे लादलेले न्हवते. ती मेरीला तिच्या इच्छेप्रमाणे वागू द्यायची. रुबेला कामावर जायची त्यावेळी मेरी घरीच असायची. मेरीचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं. पदवीच्या शेवटच्या वर्षी असताना तिने सादर केलेल्या क्रिमिनल सायकोलॉजी या प्रबंधाला तर प्रोफेसर सिम्सन यांनी तर “ए” श्रेणी दिली होती आणि पूर्ण कॉलेज भर मेरीच्या प्रबंधाबद्दल स्तुतिसुमने गात होते. रसायनशास्त्र या विषयातसुद्धा तिला चांगली गती होती. रसायनशास्त्रातील किचकट अभिक्रिया तिच्या हातचा मळच होत्या. मेरीला कॉलेज मध्ये बरेच मित्र मैत्रिणी होते, पण जसं आई गेली आणि कॉलेज संपले तसे मित्रांची ती कधी फारशी भेटेनाशी झाली. फक्त डॅनिअल, एलिना, आणि स्टिव्ह कधी मधी भेटत असतं, हेच तिचे जवळचे मित्र. दिवस असे बरे चाललेले असतानाच अचानक एक दिवस बातमी आली, 
मेरी सकाळी सकाळी तिच्या घरामागे असणाऱ्या बागेत एक रोप लावण्यासाठी खड्डा खणत होती. रुबेला त्यादिवशी घरीच होती, एक माणूस दारावरची बेल वाजवत होता त्याच आवाजाने मेरी मागच्या दारातून पुढच्या रुममध्ये आली. रुबेलाच्या किंचाळण्याने ती पळतच आली. आलेल्या माणसाने खबर आणली होती. मेरीच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटका येऊन निधन झाला होतं. कामाच्या ठिकाणीच त्यांच्या सोबतच्या लोकांना त्यांचा मृतदेह मिळाला. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह मेरीच्या घरी आणण्यात आला. या घटनेने मेरी खूपच तुटून गेली. तिला आता खूप एकट एकट वाटायला लागलं, तीचं तिच्या वडिलांशिवाय कोणी आपलं असं न्हवत, रुबेलाने तिचं फक्त नावालाच सांत्वन केलं. मेरीला ते खूपच कृत्रीम वाटलं. झाली घटना स्वीकारल्याशिवाय मेरीपुढे मार्गदेखील न्हवता. आईच्या धक्क्यातून ती सावरतच होती तर अजून एका मोठ्या धक्क्याला तिला सामोरे जावे लागले. रुबेला जेव्हा कामाला जायची तेव्हा मेरी घरीच असायची, घरामध्येच काही बाही करत बसायची. जॉब करायची इच्छा देखील राहिलेली न्हवती. रुबेलाला यायला कधी कधी उशीर व्हायचा तोवर मेरी झोपी जायची. कसेबसे दिवस पुढे गेले. मेरी ला कळल कि आयुष्य हे जगावेच लागणार वाईट घटना घडतंच राहणार पण आपण पुढचा विचार करायला हवा. तेव्हापासून मेरीने स्वतःला वेगवेगळ्या कामात गुंतवून ठेवायला सुरुवात केली. आज सकाळी निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणामुळे मेरीला जरा उत्साह वाटत होता, दोन दिवसापासून तिच्या अंगात जरा कणकण तिला जाणवत होती. बागेमध्ये झाडांची काळजी घेण्यात आणि झाडांच्या बाजूचे अनावश्यक तण काढण्यात तिचे ४ दिवस गेले होते. अंगदुखीमुळे ती जरा वैतागली होती पण आज जरा तिला बऱ वाटत होतं.
नाश्ता झाल्यावर मेरी आजचं वृत्तपत्र चाळत बसली.
“मेरी आज मला कामावरून यायला जरा उशीर होईल असं वाटतंय, रात्री जेऊन घे आणि दार वगैरे व्यवस्थित लावून झोपी जा.” आपली जाडजूड पर्स सावरत रुबेला दाराबाहेर पडली.
मेरीने तिचा फक्त ऐकून घेतलं आणि कोणताही उत्तरं न देता आणि परत वृत्तपत्र चाळू लागली. अर्थात रुबेलाल त्याचं कहीच वाटलं न्हवत. विल्यम गेल्यापासून तिचं या घराची मालकीण झाल्यामुळे तिला आता एकदम निवांत असल्यासारखं वाटत होत. मेरीला रात्री झोपायला सांगून रुबेला तिच्या उंच टाचांच्या सॅंडलचा आवाज करत निघून गेली. मेरी नाश्ता करत वृत्तपत्र चाळू लागली, त्यातल्या एका बातमीने तिचं लक्ष वेधून घेतलं. शहरामध्ये काही भागात चोर आणि लुटारूंचा सुळसुळाट वाढला होता, रात्री अपरात्री रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना धाक दाखवून पैशासाठी लुटलं जात होतं. मेरी ती बातमी वाचून काहीशी अस्वस्थ झाली, रुबेलाच उशिरा घरी येणं आजकाल जास्तच वाढलं होतं, आणि मुख्य म्हणजे रुबेला आजकाल वेगळ्याच तंद्रीत असायची घरात देखील कधीकधी लक्ष नसायचं तीच. कामच्या व्यापामुळे होत असेल असं मेरीला वाटून गेलं. पण त्यादिवशी रुबेला जरा वेगळीच वाटली, एकदा जेवणाच्या टेबलवर मेरी आणि रुबेला जेवण करत होत्या. त्यावेळी अचानक रुबेला म्हणाली ” मेरी, तुझं कोणत्या बॅंकमधे खाते आहे,? “खाते कधी काढले? कसे काढले"? असले काही बाही प्रश्न ती विचारात होती. मेरीला जरा आश्चर्य वाटलं, 
कारण रुबेलाने असली विचारणा या आधी कधीहि केली न्हवती. मेरीच्या आयुष्यात तिने कधीही कसलीही दखल दिलेली न्हवती. एकदा दोघी घर आवरत होत्या पसारा आवरत असतानाच रुबेलाला पती विल्यमच्या काही वस्तू मिळाल्या, आणि ती आठवणीत काहीशी हरवून गेली. नंतर काही वेळाने अचानकपणे ती म्हणाली” मेरी तुला आजकाल झोप नीट लागते ना” त्यावर मेरी “ हो ” असा म्हणाली खरी पण तिला तिचा आश्चर्य लपवता आलं नाही. कारण अशी काळजीयुक्त विचारणा तिने याआधी कधीही केलेली न्हवती. नाही म्हटलं तरी मेरीला थोडंस भरून आल्यासारखं झालं.
“ असं का विचारलं? “ मेरीने स्वतःला सावरत प्रतिप्रश्न केला.
“काही नाही सहजंच, म्हणजे परवा तुला बरं वाटत न्हवत ना ” रुबेला म्हणाली.
“हम्म” एवढचं मेरी बोलली. खरंतर रुबेला एवढी आस्थेवाईकपणे बोलत होती ती कधीच बोललेली न्हवती, त्याचा मेरीला आनंद व्हायला हवं होता पण तो काही झाला नाही. कारण ज्याकाळात मेरीला रुबेलाच्या आपुलकीची गरज होती तेव्हा रुबेलाकडून मेरीला जवळ करण्याकरिता कोणतंच पाउल उचललं गेलं न्हवत. एके रात्री मेरी झोपेतून अचानक उठली तिला तहान लागली होती, वरच्या खोलीतून मेरी खाली आली. बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता, रुबेला घरी आली असावी असं मेरीला वाटलं. बाहेर थंडी असल्यामुळे ती गरम पाण्याचा शॉवर घेत होती, मेरी पाणी पिऊन माघारी वळाली, तेवढ्यात तिची नजर टेबलावरच्या रुबेलाच्या पर्स कडे गेली. मगरीच्या कातडीपासून बनवलेली ती जाडजूड पर्स रुबेला कशी बाळगत असेल याचा मेरीला आश्चर्य वाटलं, पर्स पाहत असतांनाच मेरीला अचानक ती पर्स चाचपण्याचा मोह झाला. रुबेला अजूनही बाथरूम मधेच होती, असं करावं कि नाही याचा विचार करण्याकरिता मेरीने जरा वेळ घेतला कारण असं इतरांच्या वस्तू त्यांचा परवानगीशिवाय हाताळण चुकीचंच होतं. पण मेरीने चूक बरोबर चा विचार झटकला आणि हळूच पर्सची चैन उघडली.
पर्सच्या आतमध्ये रुबेलाचं मेकअप चं समान होतं. लिपस्टिक, रुमाल, आय लायनर आणि इतर गोष्टी. पर्सच्या तळाशी काहीतरी असल्याचं मेरीला जाणवलं. दिवे बंद असल्याने तिला व्यवस्थित ती वस्तू काय आहे ते कळलं नाही, मेरीने हात घालून हळूच ती काहीशी जड भासणारी वस्तू बाहेर काढली आणि तिने आश्चर्याने आ वासला. आपण की पाहतोय यावर क्षणिक तिचा विश्वासच बसेना, ,कारण ती वस्तू म्हणजे एक छोटंसं पिस्तूल होतं. मेरीला नाही म्हटलं तरी धक्का बसला होता, रुबेला आपल्या पर्स मध्ये पिस्तूल का बाळगून आहे. मेरीला क्षणभर काही सुचेना. पण बाथरूम मधून शॉवर चा आवाज येणं बंद झालं. रुबेलाची अंघोळ उरकत आली असेल असं वाटून मेरीने ते पिस्तूल पर्सच्या तळाशी आहे तसं ठेवून दिलं. आणि इतर वस्तू सुद्जधा जशास तशा ठेवल्या पर्स बंद केली आणि सावकाशपणे आपल्या खोलीमध्ये येऊन बेडवर पडली. मेरीला राहून राहून ते पिस्तुलंच सारखं आठवत होता, रुबेला ते पिस्तुलं का बाळगते याचाच तिला प्रश्न पडला होता. ति त्या पिस्तुलाचा वापर तर करत नाही ना?, 
अरे देवा, म्हणजे लोकांचे मुडदे पाडते का काय हि बया, रुबेला एका खाजगी कंपनी मध्ये काम करते हे तिला माहित होतं, पण ते सोडून ती इतर काय काय करत असेल? असे एक ना अनेक प्रश्न तिला भेडसावू लागले तेवढ्यात तिला आठवलं वृत्तपत्रात परवा आलेली बातमी कि शहरात आजकाल लुटमारीच प्रमाण वाढलं आहे. त्यात हि बया अपरात्री घरी येते त्यामुळे संरक्षणाच्या हेतूने ति पिस्तुल स्वतःजवळ बाळगत असेल. कारण रुबेला स्वतःच्या काळजीबाबत दक्ष असायचीच. मेरीला हा स्वतःचा हा तर्क पटला, आपण उगाचच सुतावरून स्वर्ग गाठतोय असं तिला वाटलं.

आज मेरीने घरच्या पुढच्या भागात बागकाम करायचं ठरवलं होतं, बाजूच्याच भागात्त राहणाऱ्या मिस्टर जोनाथन यांच्कयाडून तिने छानशी रोपं आणली आणि जमिनीमध्ये खड्डे केले, माती मोकळी केली आणि आणलेली रोपं एक एक करून त्यात लावून टाकली. अशी कामे करण्यात मेरीला मोठी मौज वाटायची, पण एवढ्याशा कामानेदेखील तिला थकायला झालं. रात्री ती न जेवताच झोपी गेली, रात्री तिला जाग आली तेव्हा तिला भुकेची जाणीव झाली, खाली जाऊन काहीतरी खाऊन यावं असं तिला वाटलं. किचन मधे जाऊन तिने खाऊन घेतलं, टेबलावरच्या रुबेलाच्या वस्तू पाहून ती आलेली दिसत होतं, आल्या आल्या रुबेला झोपी गेली होती. जेवण करून मेरी आपल्या खोलीमध्ये  मध्ये आली, सहज म्हणून झोपायच्या आधी तिने खिडकीचा पडदा जरा बाजूला केला आणि बाहेर पाहिलं. बाहेर सगळीकडे अंधार दिसत होता, रस्त्याचवरचे दिवे अंधुकपणे लुकलुकत होते, रस्त्याच्या पलीकडे झुडूप आणि झाडी असल्याने तिहे काहीसा अंधार होता. मेरी पडदा सरकवून आपल्या बिछान्यावर जाणारच होती तेवढ्यात तिला रस्त्याच्या पलीकडील झाडीमध्ये एक लालबुंद ठिपका दिसला, डोळे बारीक करून मेरीने पाहिलं पण तिथे पुरेसा प्रकाश नसल्याने तिला स्पष्ट दिसेना. मेरीला तो लाल ठिपका ठराविक अंतराने गडद होताना दिसत होता. नक्की काय होतं ते हे पाहण्याकरिता मेरीने डोळे किलकिले केले आणि खिडकीच्या काचेला डोळा लावून पाहण्याचा प्रयत्न केला. 
अरेच्चा कोणीतरी तिथे सिगारेट ओढत होतं तर, तो लाल ठिपका म्हणजे सिगरेटच टोक होतं, कोणीतरी त्या अंधारात सिगारेट ओढत उभा होता. मेरीच्या छातीत धडधडायला लागलं. तरी मेरी तशीच उभी राहून पाहत होती, रात्रीच्या काळोखात तिथ सिगारेट ओढण्यात तिथे कोणाला स्वारस्य असणार होतं काही कळतंच न्हवते, काही वेळाने तो ठिपका विझला, तिथे जे कोणी होतं ते मागच्या मागे निघून गेलेलं असणार कारण नंतर तिथे काहीचं दिसलं नाही. मेरीच्या मनात विचारांचं काहूर दाटलं होतं. कोण होतं तिथें? आणि जे कोणी असेल ते अपरात्री तिथे या वेळी सिगारेट ओढत का उभं असेल? बराच वेळ मेरीला झोप लागली नाही. त्या रात्री पाहिलेली ती गोष्ट मेरीने कोणालाच सांगितली नाही, आपला मित्र डॅनिअलला हि घटना सांगावी का असा तिला प्रश्न पडला पण नंतर तिला वाटलं कि असा काही सांगितलं कि डॅनी उगाचंच आपली थट्टा करेल. आणि इथलाच एखादा रहिवासी तिथे सिगारेट ओढत उभं नसेल कशावरून. त्यामळे मेरीने कोणालाच काहीही सांगितलं नाही.
बागेतल्या रोपांची निगा राखण्यात आणि साफसफाई करण्यात दिवस कसा गेलं ते मेरीला कळलच नाही. रात्र झाली थंडी वाढली होती मेरीने हिटर वाढवला आणि खिडकीतुन बाहेर पहिल, वातावरणात खूप शांतता होती. पडदा सरकवून मेरी झोपायला वळाली. काम केल्याने तिला लागलीच झोप लागली. रात्री कसल्यातरी आवाजाने मेरीला जाग आली कसल्यातरी बुटांच्या करकरण्याचा आवाज होता तो. रुबेला आली असेल म्हणून मेरी तशीच पडून राहिली. तेवढ्यात तिला आपल्या खोलीच्या बाहेर कसलीतरी चाहूल जाणवली. मेरीने आपले कान टवकारले, खोलीबाहेर हळूहळू पावलं टाकत असल्यासारखा तिला जाणवलं. तिच्या कपाळावर एवढ्या थंडीत देखील घाम आला, तिने पांघरून घट्ट धरून ठेवलं. आणि शांतपणे पडून कानोसा घेत राहिली. नाही म्हटल तरी तिला भीती वाटतच होती. आपल्या रूम च्या बाहेर एवढ्या रात्री कोण असेल या विचारांनीच तिला घाम फुटला. काहीवेळ कसलीच हालचाल जाणवली नाही. मेरीचे कान बाहेरचं आवाज घेण्यासाठी आसुसलेले होते. पावलांचा आवाज परत आला. बाहेर जे कोणी होतं ते जिना उतरून खाली गेलं होतं. मेरी अजून पांघरून घट्ट पकडून होती. तिची छाती अजून धडधडतच होती, खोलीमध्ये हिटर असूनपण तिच अंग गारठल्यासारखं झालं होतं. कोण असेल बाहेर तिला काहीच अंदाज न्हवता. रुबेला होती का? जर ती असेल तर ती असं चोरून का येईल? नाना प्रश्न मेरीला पडू लागले होते.तिने बाजूच्या घडयाळात पाहिलं  दोन वाजून वीस मिनिटे झाली होती...

क्रमशः

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ७

  हॉस्पिटलमध्ये स्पिरिटचा आणी औषधांचा वास जास्तच दरवळत होता. नर्सेसची येण्याजाण्याची लगबग चालू होती. त्या त्या स्पेश्यालीटीचे डॉक्टर्स आपापल...