आफ्रिकेतील अतर्क्य - भाग ५ ( अंतिम भाग )

 २-३ मोठ्या टेकड्यांचा मधोमध एक लहानशी टेकडी होती त्यावर झोपडी सारखं एक खोपट दिसत होतं. आणि वरून धूर निघत होता.

आम्ही थोड्याच वेळात बांगाच्या झोपडीजवळ येऊन पोहोचलो. बाजूला ३-४ कोंबड्या खुराड्यात कोंडलेल्या होत्या. शेजारीच खुंटीला बांधलेल्या २ शेळ्या कुतूहलाने आमच्याकडे पाहत जमिनीवर पाय दुमडून बसल्या होत्या. त्या खुराड्याभोवती आणि शेळ्यांच्या भोवती मोठ्ठ लालसर मातीचं एक रिंगण केलेलं होतं. झोपडीच दार बंद होतं. आता बांगा आत झोपडीमध्ये असला पाहिजे नाहीतर परत त्याची वाट पाहत बसायला लागलं असत, आता सूर्यास्त होऊन आता चांगलाच काळोख होऊ लागलेला होता.

घरमालकाने पुढे होऊन बांगाला आवाज दिला.

तसं आतून मधून एक धीरगंभीर आवाज आला. म्हणजेच बांगा आतच होता तर.

माझामागे आत मध्ये या घरमालक झोपडीचा दरवाजा उघडत म्हणाला.

घरमालक आत गेला तसे आम्हीदेखील एक एक करत आतमध्ये गेलो.

झोपडी बऱ्यापैकी ऐसपैस होती. कोपऱ्यात शेकोटी पेटवलेली दिसत होती आणि तिच्या वरच्या बाजूला एक भगदाड होतं जेणेकरून धूर झोपडीमध्ये नं राहता बाहेर निघून जावा.

त्याचा विरुद्ध दिशेला झोपडीच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक माणूस मांडी घालून चूल पेटवत होता चुलीवर एक मातीचं भांड होतं.

घरमालकाने पुढे जाऊन बांगाला नमस्कार चमत्कार केला. बांगा दिसायला खुपंच मजबूत शरीरयष्टीचा आणि चांगलाच उंचपुरा होता. त्याचा तोंडावर लाल रंगाचे तीन पट्टे ओढलेल दिसत होते. दंडावर वाघाच्या तीन नखांचा ताईत होता. कमरेला वाघांचा कातड्याच बनवलेलं वस्त्र आणि वर उघडाच असा एकंदरीत त्याचा पेहराव होता. त्याने हसूनच घरमालकाच स्वागत केलं.

घरमालकाने आमच्या तेथे येण्याचं कारण बांगाला सांगितलं तसा त्याचा चौकोनी चेहरा गंभीर होत गेला. त्यांची सगळी चर्चा आफ्रिकन भाषेत चाललेली असल्याने आम्हाला त्यातलं काही कळाल नाही.

नंतर बांगा अॅलन जवळ आला आणि आफ्रीकांमध्ये शांतपणे काहीतरी बोलला ते न समजून अॅलन ने घरमालकाकडे पाहिलं. तेव्हा घरमालकाने भाषांतर केलं तो म्हणतोय कि आजवर परदेशी लोकांना आफ्रिकेतल्या पिशांचांची फक्त नाव ऐकूनच पळुन जाताना पाहिलंय. पण त्यांचाशी सामना करणारा तुझासारखा धाडसी माणूस पहिल्यांदाच पाहतोय

यावर काहीही न बोलता फक्त हसला.

एका गरीब आफ्रिकन माणसासाठी त्याचा कुटुंबाच्या रक्षणासाठी तू आणि तुझे सहकारी जीव धोक्यात घालतायत मला तुमचा अभिमान वाटला. आणी म्हणूनच मी नक्कीच तुम्हाला मदत करेन बांगा पुढे म्हणाला.

तसे एक हात वर करत आफ्रिकन भाषेत बांगाने कसलीतरी आरोळी दिली त्यामागोमाग घरमालकाने आणि बोमाननेही हात वर करत त्या आरोळीचा पुनुरुच्चार केला.

थोडक्यात बांगा आमच्या मदतीसाठी तयार झाला होता. मला हायसं वाटलं. मग आम्ही सगळे त्या पिशाच्चाला कसं बोलवावं आणि त्याचा खात्मा करावा यावर चर्चा विमर्श करू लागलो. बाहेर चांगलाच काळोख पडलेला होता. दुरून कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकू येत होती.

रात्र झाल्याने बांगाने आम्हा सर्वांना बसायला सांगून चुलीवर तापत असलेला मातीच भांड खाली उतरवलं आणी बाजूच्या टोपली मधील ५-६ कंदमूळ काढली ती मातीच्या तव्यावर चांगली भाजली. नंतर भांड्यामध्ये असलेला घट्ट द्रवपदार्थ आणी ती कंदमूळ आम्हा सर्वांना वाढली, आणी आम्ही सगळेजण पुढ्यातला त्या पदार्थाचे सेवन करू लागलो. 

पुढची योजना कशी आखणार आहोत आपण अॅलन बांगाकडे पाहत म्हणाला.

आपण त्या बिर्नाख पिशाच्चाला आपल्याकडे आकृष्ट करून घेणार आहोत ते एकदा आलं कि मग आपण त्याचा खात्मा करू पुढ्यात असलेलं कंदमूळ दाताने कुरतडत बांगाने उत्तरं दिलं. अर्थात त्या दोघांमध्ये दुभाषाच काम घरमालक करत होता.

पण नक्की कस? “अॅलन ने आश्चर्यकारक रित्या विचारलं. मलासुद्धा उत्सुकता होती कि आपण त्या पिशाच्चाला आकृष्ट कसे करणार आहोत.

बांगाने बाजूला ठेवलेल्या बोचक्यातून एक भांड आणि कसलीतरी पुरचुंडी बाहेर काढली.

त्यासाठी आपण तुमच्या रक्ताचा वापर करणार आहोत. बांगा शांतपणे म्हणाला आणि त्याने बोचक्यातून काढलेलं भाडं अॅलन च्या पुढ्यात ठेवून पुरचुंडीची गाठ सोडली त्यातून पांढऱ्या रंगाची माती अॅलन च्या समोर असलेल्या भांड्यात टाकली.

या मातीत तुमचं थोडसं रक्त टाकून विशिष्ट मंत्रोच्चार करावे लागतील. त्यासरशी तुमचा माग काढत ते पिशाच्च त्या भांड्याजवळ येईल. पुढे मी सांगेन काय करायचं तेबांगा एवढ बोलून चुलीमधली लाकडं व्यवस्थित करू लागला.

आमचं सगळ्याचं खाऊन झालं. आणी परत आम्ही चर्चा करू लागलो.

बांगा बोलू लागला इथून जवळच काही अंतरावर एक कुरणवजा मैदान आहे, तिथे बऱ्यापैकी पिशाच्चांचा वावर असतो. टोन्डू टेकड्या उतरून मागे गेलो कि उताराला एक ओढा लागेल तो ओलांडून पुढे गेलं कि काही अंतरावरच ते मैदान लागेल.

पण ती जागा तर वावरण्यासाठी निषिद्ध आहे घरमालक म्हणाला.

हो कारण तिथे पिशाच्च वास करतात, तिचं जागा आहे जिथे आपल्याला आपलं सावज मिळेल बांगा त्यावर म्हणाला.   

असं असेल तर लागलीच आपल्याला तिथे जावं लागेल अॅलन पुढ्यात असलेल्या भांड्याकडे पाहत म्हणाला.

आज पोर्णिमेनंतरचा तिसरा दिवस आहे त्यामुळे आजसुद्धा जाऊ शकतो कारण पुढे नंतर चंद्र जसजसा कमी होत जाईल तसं पिशाचांचा तिथला वावर कमी होतो. त्यामुळे जे काही करायचं असेल ते या काही दिवसातच करणे योग्य ठरेल बांगा म्हणला.

बांगाच्या त्या विधानावर कोणीच काही बोललं नाही. अॅलन ने सगळ्यांना तयार व्हायला सांगितलं आपण आत्ताच तिथे जाणार आहोत. सगळेजण तयार झाले.

टोन्डू टेकड्यांचा मागच्या बाजूला जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्याने आम्ही सगळेजण चालू लागलो. सर्वात पुढे बांगा मशाल घेऊन वाट दाखवत होता. त्यामागोमाग अॅलन, घरमालक, बोमान आणि मी. चंद्राचा मंद प्रकाश सगळीकडे पसरलेला होता. घुबडाचे घुत्कार ऐकू येत होते. एखाद जंगली श्वापद आलाच तर संरक्षणासाठी घेतलेलं रायफल माझा खांद्यावरच होतं. थोड्याच वेळात ओढा लागला. पाण्याचा खळखळ आवाज रात्रीचा गंभीरपणा कापत असल्याप्रमाणे तो वाटला. सावधपणे ओढा ओलांडून आम्ही पुढे आलो. समोर कुरण असलेलं मैदान होतं

तसं बांगा ने आम्हाला थांबण्याची खुण केली. त्याचा जवळ असलेल्या पाण्याच्या कातडी थैलीमधील पाणी तो घटाघटा प्यायला.

आता मी सांगतो ते नीट ऐका बोलता बोलता तोंड पुसत एका झाडाच्या आडोशाला बांगा उभा रहिला. 

मी आणि अॅलन आता समोरच्या कुरणाच्या मैदानात जातो. त्या भांड्यात जी पांढरी माती आहे त्यामध्ये अॅलन चं रक्त टाकतो आणि मंत्रविधी सुरु करतो, तुम्ही सगळे त्या समोरच्या झाडामागे आडोशाला थांबा. मंत्रविधी संपताच काही वेळात ते पिशाच्च येईल. पिशाच्च जवळ यावं यासाठी आमिष म्हणून अॅलन मैदानातच थांबेल. अॅलन चहुबाजूला मी स्फोटकंमिश्रित पावडर असलेलं रिंगण आखणार आहे. मंत्रविधी म्हणून मी लगेचच अॅलन च्या मागच्या झाडामागे लपून राहिलं. पिशाच्च जसं त्या रिंगणात अॅलन कडे येईल तसं मी माझाकडील कापडाचा बोळा जो केरोसीन मध्ये भिजवलेला आहे त्या स्फोटकमिश्रित पावडर वर टाकेन. आणि लगेचच ते रिंगण पेटेल. पिशाच्च त्यामध्ये अडकले जाईल आणि भांबावून जाईल. मग तुम्ही सगळे बाहेर, मग तुम्ही तुमच्याजवळील गोफणीने आगीचे गोळे त्या पिशाच्चावर टाका. घरमालकाला आणि बोमानकडे निर्देश करत बांगा म्हणाला.

हो आम्ही बरोबर नेम धरतो सवय आहे आम्हाला घरमालक म्हणाला.

छान.. जसे आगीचे गोळे त्या बिर्नाखावर पडतील तसा तो जळून खाक होईल, त्याला आगीच्या रिंगणात आपण आधीच अडकवलेल असेल त्यामुळे त्याला पळुन देखील जाता येणार नाही, फक्त एकंच गोष्ट जिकिरीची आहे  ” बांगा म्हणाला.

ती कोणती न समजून मी विचारलं

पिशाच्च रिंगणात येऊन त्यावर आगीचे गोळे फेकेपर्यंत तुम्हाला तग धरून पिशाच्चासोबत रिंगणात उभं राहावं लागेल. बांगा अॅलन कडे कपाळावर आठ्या आणत म्हणाला.

ते ऐकून माझातर पाचावरच धारण बसली. याशिवाय दुसरा मार्ग नाही का निघू शकत असं मी विचारायचा आधीच अॅलन बोलू लागला.

मी आतमध्ये तग धरून थांबायला तयार आहे. निग्रहपूर्वक अॅलन म्हणाला.

शाब्बास.. तू काळजी करू नकोस हा बांगा तुला जास्त वेळ पिशाच्चासोबत राहू देणार नाही”  बांगा अॅलन च्या दंडावर थोपटत म्हणाला.

मला सुद्धा अॅलन च्या धाडसाचं कौतुक वाटलं. मी सुद्धा अॅलन च्या दंडावर थोपटत त्याला मी सोबत असल्याचं सांगितलं.

 ठरल्याप्रमाणे मी घरमालक आणि बोमान बांगा ने सांगितलेल्या झाडामागे आडोशाला आलो. इथे पिशाच्चांचा वावर असल्याने सावध राहण्याचा इशारा बांगाने आम्हाला दिलेला होता. त्यानुसार मी कान आणि डोळे उघडे ठेवून रायफल हातात घेऊनच उभा होतो. घरमालकाने गोफण तयार ठेवली, बोमान ने कापडाचे बोळे केरोसीन च्या डब्यात टाकून ठेवले. आणि तो चवड्यावर बसला. मी रायफल हातात घेऊन झाडाच्या मागून समोर पाहू लागलो.

समोर अॅलन आणि बांगा मैदानाच्या मध्यभागी येऊन मंत्र विधीची तयारी करू लागले. अॅलन ला मध्यभागी उभं राहायला सांगून बांगाने स्फोटक मिश्रित पावडरचं रिंगण आखल. आणि नंतर त्याचा झोळीतून मातीचं भांड आणि पांढरी पूड असलेली पुरचुंडी काढली. मातीच्या भांड्यात पांढरी पूड अलगद टाकली. 

तेवढ्यात समोरच्या बाजूने खूप मोठी कोल्हेकुई ऐकू आली. आणि ४-५ वटवाघळे त्या झाडावरून   फडफडत आवाज करत उडून गेली. आमच्या सगळ्याचंच लक्ष तिथे गेलं. ते झाड आमच्यापासून खूप दूर होतं पण अॅलन आणि बांगा च्या समोरच होतं. ते दोघे सुद्धा तिथे पाहू लागले.

हे लक्षण काही ठीक दिसत नाहीये घरमालक समोर पाहत गूढपणे म्हणाला.

मी रायफलवरची पकड घट्ट केली. आणि डोळ्याची पापणीही न लवता समोर अॅलन आणि बांगाच्या हालचाली पाहू लागलो. त्या निशाचर पक्षांकडे आणि कोल्हेकुई कडे कानाडोळा करून बांगा आपल्या मंत्र विधीची तयारी करू लागला. हातवारे करत मंत्र उच्चारण करून झाल्यावर बांगाने आपल्या पाठीमागून धारदार सुरा काढला आणि अॅलन ला त्याचा हात पुढे करायची खुण केली.

अॅलन ने आपला हात पुढे केलं बांगाने आपल्या धारदार सुऱ्याने अॅलन च्या तळहातावर फिरवला. हातामधून रक्त येऊ लागलं. रक्ताचे थेंब त्या भांड्यात सोडण्याचा इशारा बांगाने केला. तसं अॅलन ने हातातली जखमेची बाजू भांड्यावर धरली. त्यातून काहीसे रक्ताचे थेंब पडले असतील तोच..

तेवढ्यात अॅलन आणि बांगाला त्यांचा मागून गुरगुरण्याचा आवाज आला. तसं त्यांचा माना मागे वळल्या. तो गुरगुरण्याचा आवाज आमच्यापर्यंत देखील आला. घरमालक गोफण तयार करून पुढे आला. बोमानने कापडाचे बोळे गोफणीच्या खोबणीत ठेवले. बिर्नाख आल्याची चाहूल लागल्याने आम्ही तिघे सज्ज झालो.

परत एकदा गुरगुरण्याचा आवाज आणि झुडुपांची खुसपूस ऐकू आली. मगाशी ज्या झाडावरून वटवाघळे उडाली होती हा आवाज तेथूनच येत होता. आता जरा बांगा साशंक झाला. त्याने जवळ पडलेली मशाल हातात घेतली  रिंगणाच्या जवळ आला. एवढ्यात त्यांचा समोरच्या झाडामधून चीत्याप्रमाणे झेप घेऊन एक काळकुट्ट सातफुटी तोंडाच पिशाच्च अॅलन कडे झेपावलं. त्याची चपळाई एवढी होती कि अॅलन देखील गांगरला. पण त्वरेने त्याने बाजूला उडी मारली आणि पिशाच्च अॅलन च्या पुढे घसरत रिंगणाच्या आता कडेला गेलं. बांगा त्या पिशाच्चाकडे रोखून पाहू लागला.

बिर्नाख पिशाच्च आलं होतं तरीही ठरल्याप्रमाणे बांगा रिंगणाला आग का लावत न्हवता म्हणून मला आश्चर्य वाटलं.

अॅलन न देखील बांगाला आग लाव असा इशारा दिला. कारण योजनेप्रमाणे पिशाच्च रिंगणात आलेलं होतं. बांगा ने ओरडूनच नकार दिला. आणि पिशाच्चाला त्याचाकडे येण्यासाठी आवाज देऊन चेतवू लागला पिशाच्च आता जास्तच गुरगुरत होतं आणि त्याने आपला मोर्चा बांगाकडे वळवला. बांगाला दिसत होतं पिशाच्च गुरगुरत होतं. बांगा काही करत न्हवता उलट वेड्यासारखं त्या पिशाच्चाला जास्तच खवळत असल्याचं पाहून मी पटकन घरमालकाला म्हणलो आगीचे गोळे टाका नाहीतर ते पिशाच्च दोघांना कच्च खाऊन टाकेल. घरमालक घाबरत घाबरत पण सावधगिरीने पुढे आला.

बोमानने कापडी बोळ्यांना आग लावली. आणि घरमालकाने क्षणाचाही विलंब ना लावता कापडी बोळ्यांना गोफणीने बरोबर नेम धरून पिशाच्चाकडे भिरकावले. घरमालकाचा नेम अचूक बसला. पण कागदी बोळे अंगाला लागून खाली पडावेत तसं ते आगीचे बोळे त्या पिशाच्चच्या अंगाला लागून कुचकामी असल्याप्रमाणे खाली पडले. त्याचा पिशाच्चावर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याला त्याचा मागच्या झाडामागे कोणीतरी आहे हे समजलं आणि ते आमच्याकडे चाल करून चाचपडत येऊ लागलं. आगीचे बोळे कुचकामी ठरल्याने आमच्या तिघांचेही तोंडच पाणीच पळाल.

असं कसं झाला आगीच्या बोळ्यांचा परिणाम व्हायला हवं होता. पण आम्हाला विचार करायला वेळ न्हवता पळुन जावं तर पाय जागचे हलेनात. पुतळ्याप्रमाणे आम्ही तिघेही गोठून जागीच उभे होतो. आमच्या या करामतीमुळे पिशाच्चाची पाठ बांगा समोर आली. आणि त्याचाच फायदा घेऊन बांगा पळत पळत पिशाचाकडे धावू लागला. मागून कोणीतरी येत असल्याने पुढे आमचाकडे येत असतानाच पिशाच्च मागे वळणार इतक्यात बांगाने जवळ येत मोठी आरोळी ठोकत उंच उडी मारली आणि आपल्या जवळील पाण्याची कातड्याची पिशवीच बुच काढून पिशाच्चाच्या नुकत्याच वळलेल्या तोंडावर त्यातलं पाणी फेकलं. चर्रर असा आवाज झाला. आणि पिशाच्चाने ओरडतच तोंड झाकून घेतलं. पिशाच्चाच्या चेहऱ्यावरून धूर येऊ लागला. जवळ पोचलेल्या बांगाने त्वरेने पिशवीतले अजून थोडे पाणी त्याचा छातीवर आणि पायांवर टाकले, त्यामुळे पिशाच्चाच्या छातीवरून पायांवरून सुद्धा तसेच धुराचे लोट निघू लागले. तसे मोठ्याने आवाज करत ते पिशाच्च बांगाच्या अंगावरून मागे उडी मारून पळतच मैदान ओलांडून त्वरेने मागच्या झाडीच्या गर्दीत नाहीसे झाले. पिशाच्च जाताच अॅलन धावत बांगाकडे आला. आम्ही तिघेजण सुद्धा बांगाकडे धावलो. बांगा हसतहसत कमरेवर हात ठेवून आफ्रिकन मध्ये काहीतरी बडबडत खाली वाकू लागला. त्याला की होतंय आम्हाला कळेना.

पिशाच्च निघून गेलं आपला प्लान पण फसला अॅलन चरफडत म्हणाला.

आम्ही तिघे सुद्धा बांगाच्या या वागण्याकडे पाहू लागलो. पण काही झालं तरी मोठ्या साहसाने बांगाने त्या पिशाच्चाला पळवून लावलं होतं.

पण आगीच्या गोळ्यांना ते पिशाच्च घाबरल कसं नाही घरमालक साशंक स्वरात म्हणला.

अरे हो ते पण आहेच मी घरमालकाच्या शंकेला दुजोरा दिला.

कारण ते बिर्नाख पिशाच्च न्हवत गालावर हास्याची लकेर उमटवत बांगा म्हणाला.

ओह्ह तरी मला शंका आलीच होती कारण हे पिशाच्च वेगळच दिसत होता कोल्ह्याप्रमाणे तोंड असल्यासारख मी पाहिलेल्या बिर्नाखासारख दिसायला न्हव्तच अॅलन विचार करत म्हणाला.

आम्ही सगळेजण परत आखलेल्या रिंगणाजवळ आलो.

आपला विधी पूर्ण झालेलाच होता अॅलन चं रक्त पण भांड्यात टाकलं होतं पण मधेच झाडीमागे आधीपासूनच असणाऱ्या ख्रास्तर पिशाच्चाने आपल्याकडे मोर्चा वळवलेला होता. पहिल्यांदा मला पण आश्चर्य वाटलं कि मंत्र पूर्ण होतंच एवढ्या त्वरेने बिर्नाख कस की येऊ शकत पण नंतर थोडा वेळ मी पिशाच्च निरखून पाहिलं तेव्हा कळल कि साला हे तर ख्रास्तर पिशाच्च आहे ...बांगा ने माहिती दिली.

ओह्ह म्हणूनच एवढ्या मेहनतीने टाकलेलं आगीचे गोळे कुचकामी ठरले तर घरमालक निराश होत म्हणाला.

अरे त्यानिमित्ताने कळल तरी कि तुझा नेम अजूनही चांगला आहे बांगाने त्यावर हसत हसत सांगितले.

त्यावर घरमालक लाजून खाली पाहू लागला

मी तुम्हाला सांगितलं होतं इथे पिशाच्चाचा वावर जास्त असतो म्हणूनबांगा आजूबाजूला पाहत म्हणाला.

बर झाला तुम्चाकडे पाण्याची पिशवी होती त्यामुळे ख्रास्तराला पळवून लावता आला, ख्रास्तरा पिशाच्चाचं पाण्याशी जमत नाही आणी आजूबाजूला पाणी पण न्हवते कुठे मी म्हणलो.

यापेक्षाही भयानक पिशाच्चांचा सामना मी केलाय. हे ख्रास्तर पिशाच्च काय आहे त्यापुढे बांगा कुत्सितपणे हसत म्हणाला.

सगळेजण ख्रास्तराच्या अचानक हल्ल्याने भांबावून गेले होते पण बांगाच्या साहसी खेळीमुळे त्याला पळवून लावण्यात आम्हला यश मिळालं होतं.

चला आपला मंत्रविधी पूर्ण झालाय रक्त पण भांड्यात आहे, बिर्नाख कधीपण येऊ शकत तयारीला लागा. असं म्हणून आम्ही सगळेजण होकार भरत आपापल्या जागेकडे जायला वळणार इतक्यात..

बाजूच्या झाडीमधून मोठ्याने आवाज करत एक भलमोठ पिशाच्च आवाज करत अॅलन कडे झेपावलं. त्याचा आवाजाने आम्ही सगळेच घाबरलो. अॅलन ने पिशाच्च अंगावर येताच खाली झुकांडी देऊन त्याची झेप चुकवण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा सावध नसल्याने अर्धवट यशस्वी झाला. पिशाच्चाचे मजबूत लांब पंजे अॅलन च्या दंडाला घासून पुढे गेले होते त्यामुळे पिशाच्च पुढे जाऊन कोलमडल तसा अॅलन देखील खाली उताणा झाला. आम्ही सगळेजण बेसावध असल्याने काय करावे तेच कळेना. कारण या पिशाच्चाने अचानकच वाघाप्रमाणे आमच्यावर म्हणजेच अॅलन वर झडप घातलेली होती.

बिर्नाख ....अस ओरडतच बांगा पळतच रिंगणाच्या जवळ गेला.

अॅलन उठून उभा राहिला आणि पिशाच्चाकडे पाहत दोन शिव्या हासडून कपडे झटकत सावधपणे उभा राहिला. अॅलन च्या दंडाला थोडीशी जखम पण झाली होती.

पुढे जाऊन पिशाच्च पण सावधपणे उभं राहिलं आणि अॅलन कडे तोंड करून आवाज करू लागलं

बेशक हे बिर्नाख पिशाच्चच होतं मी त्याचा चेहर्या कडे पाहून ओळखलं अंधारातला त्याचा खिडकी मध्ये पाहिलेला चेहरा मी अजूनही विसरलेलो न्हवतो.

तेवढ्यात चहुबाजूला ज्वाळा भडकल्या. बांगाने मशाल पेटवून स्फोटका च्या मिश्रणाला आग लावलेली होती आणि आगीचा रिंगण तयार झाला होतं पण आता आम्ही सगळेजण त्या पिशाच्चासकट आगीच्या रिंगणात अडकलेलो होतो. बाजूचं रिंगण पाहून पिशाच्च इकडे तिकडे पाहत भांबावून गेल्यासारखं दिसलं. नन्तर आमचाकडे पाहून त्याने मोट्ठ्याने आवाज केला. तो आवाज अगदी अॅलन च्या घरी मी खिडकीतून मागे कोसळलो असता आलेला होता तसा वाटला.

ये हरामखोर ये आता .. आत्ता खरा आमना सामना आहेमोठ्याने हसत हातातली मशाल घट्ट पकडत बांगा म्हणाला.

बांगाने मला घरमालकाला आणि बोमान ला एका बाजूला येण्यासाठी फर्मावले. घरमालकाच्या हातातील गोफणीमध्ये गोळे टाकायला लावले.

अॅलन एका बाजूला झाला आणि पिशाच्चाला आपल्याकडे येण्यासाठी चेतवू लागला. तसे करताना त्या पिशाच्चाचे पूर्ण लक्ष त्याचाकडे जावे हा त्याचा हेतू होता. दरम्यान या गोष्टीचा फायदा घेऊन आम्ही त्या पिशाच्चावर आगीच्या गोळ्यांचा वर्षाव करावा असं ओरडून त्याने आम्हाला सांगितलं.

आगीच्या ज्वाळा चहुबाजूने पेटल्या होत्या आणि त्या जास्तवेळ असणार न्हाव्त्या तेवढ्याच वेळात आम्हाला त्या बिर्नाखाला संपवायचा होतं.

पिशाच्च आवाज करत अॅलन च्या चेतावण्याने त्याचाकडे परत झेप टाकत आलं. त्याला चुकवाव म्हणून यावेळेस झुकांडी मारणार पण त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पिशाच्चाने अॅलन ला अंगावर घेतले आणि आपल्या लांब हातांनी त्याचा चेहऱ्यावर वार करणारच होते.

तितक्यात बांगा सावधगिरीने पळत त्यांचा जवळ गेला हातातल्या मशालीने एक जोरदार फटका त्या पिशाच्चाचा एका बाजूने तोंडावर हाणला. बांगा आल्याचं पिशाच्चाला लक्षात न आल्याने पिशाच्च अॅलन च्या अंगावरून बाजूला फेकले गेले. पिशाच्चाला तोंडावर थोडे आगीचे चटके लागले आणि त्याचा एक लांब असलेला हात आगीच्या रिंगणावर पडला. आणि त्याचा एका हाताला आग लागली. तसं पिशाच्च फडफडत इकडे तिकडे लोळून आग विझवण्याचा प्रयत्न करू लागलं.

स्फोटक मिश्रित आगीचे रिंगण जास्तवेळ आग निर्माण करू शकत नाही, ते पिशाच्च अर्धवट जखमी आहे, हाच मोका आहे ....असं म्हणत बांगाने घरमालकाला खुण केली

घरमालकाला सुद्धा ते समजलं. त्याने त्वरेने गोफणीमधले कापडाच्या बोळ्यांना आग लावली आणि ते नेम धरून हातच्या आग विझवण्यात व्यस्त असणाऱ्या बिर्नाखाकडे भिरकावले. आगीचे २-३ गोळे बिर्नाखाच्या अंगावर पडले तसे पिशाच्च जमिनीवर पडून अजूनच ओरडू लागलं सगळा आसमंत दणाणून गेला. पिशाच्चाचे दोन्ही हात पेटलेले होते. अंगावर पण आगीचा प्रभाव दिसून येत होता.

अजून गोळे टाक बांगा ओरडला.

घरमालक गोळे टाकायला गोफण तयार करणार इतक्यात पिशाच्च्च उठून उभं राहिला आणि त्वरेने झेपावलं. पण यावेळी अॅलन पूर्ण सावध होता त्याने बांगच्या हातातून विद्युत गतीने मशाल घेऊन आमचाकडे येणाऱ्या पिशाच्च्च्या सरळ खोबणी असणाऱ्या तोंडातच घातली. पिशाच्च जागेवरच थांबलं. आणि घोगरा आवाज काढू लागलं. तसं बांगा ने बोमानकडचा केरोसिनचा डबा पटकन घेतला. अॅलन जवळ जाऊन त्याला ढकलून बाजूला केलं. तसं अॅलन बाजूला जाऊन पडला. मग बांगाने हातातला डबा पकडून त्यातले केरोसीनच बिर्नाखाच्या तोंडावर ओतले. आगीचा मोठा भडका उडाला. बिर्नाख मोठमोठ्याने चित्कार काढू लागले, भडकलेल्या आगीमुळे बांगा त्वरेने बाजूला झाला आणि सगळ्यांना लांब जाण्याचा निर्देश दिला. बिर्नाखाचे तोंड आणि दोन्ही हात पेटत चालले होते. आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न बिर्नाख धडपडत होते. बांगाने परत हातातले केरोसीन पळत जाऊन बिर्नाखाच्या अंगावर ओतले आणि बाजूला उडी मारली जेणे करून आगीचे लोळ त्याचा अंगावर येऊ नये. 

आता बिर्नाखाच्या पूर्ण शरीराला आग लागलेली होती आणि ते जमिनीवर पडले. आणि गडबडा लोळू लागले. परत पळत जाऊन बांगाने सगळाच्या सगळा केरोसीन चा डबा लांबूनच बिर्नाखावर ओतला. आणि बाजूला गेला. बिर्नाख आता पूर्णपणे पेटलेलं होते. आगीच्या ज्वाळांनी त्याला घेरलं होतं. आम्ही सगळेजण त्याची तडफड पाहत उभे होतो.

थोड्याच वेळात बिर्नाखाची हालचाल मंद होऊ लागली पण आग अजूनही त्याचा शरीरावर होती.

थोड्याच वेळात बिर्नाखाची संपूर्ण हालचाल शांत झाली. बांगाने जवळ जाऊन खातरजमा करून घेतली.

आगीच्या रिंगणाचा लोळ सुद्धा कमी होऊ लागला. थोड्या वेळाने रिंगणाची आग सुद्धा शांत झाली. आम्ही सगळ्यांनी जवळ जाऊन बिर्नाखाचा कोळसा झालेल्या शरीराचा आढावा घेतला. अखेरीस बिर्नाखाचा खात्मा झाला असं बांगा म्हणाला आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

इथला परिसर पिशाच्चानी भरलेला असल्याने इथून चटकन निघण्यास बांगाने सांगितले. तसं आम्ही परतीच्या मागाकडे लागलो. मी अॅलन जवळ जाऊन त्याचा दंडावरील जखमेचा अंदाज घेतला. बांगाच्या झोपडीत जाऊन त्याचावर मलमपट्टी करूयात असं मी त्याला सांगितलं.

शेवटी आल्या मार्गानेच आम्ही रात्रीच्या निरव शांततेत बांगाच्या झोपडीकडे परत आलो. रात्र भरपूर झाल्याने ती रात्र बांगाच्या झोपडीतच काढली.

दुसऱ्या दिवशी बांगाचा निरोप घेतला त्याने खूप मोठ्या संकटातून घरमालक आणि आमची सुटका केल्यामुळे आम्ही त्याचे मनापासून आभार व्यक्त केले. बांगाने सुद्धा आपल्याला या कामात मजा आली आणि माझा अनुभवामध्ये तुम्ही लोकांनी भरच टाकली असं म्हणत बांगाने आम्हाला निरोप दिला. माघारी गेस्टहाउस वर परतल्यावर मी कंपनीचं उर्वरित काम चटकन संपवलं आणि अजून काही आगळीक होण्याचा आतच आफ्रीकेमधली ती चित्रविचित्र भूमी सोडण्याचा मी आणि अॅलन ने निश्चय केला. आफ्रिकेतला पिशाच्च पाहण्याचा अॅलन चा छंद पार पडलेला होता. परत कोणत संकट येण्याचा आतच आम्ही आफ्रिकेतून  काढता पाय घेतला ते पण इथे परत ना येण्याचा निश्चय करूनच...


 समाप्त.

अफ्रिकेतील अतर्क्य - भाग ४

 

नंतर जेव्हा मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी माझा रूमवर माझा बेडवर पडलेलो होतो. माझा हाताला मलमपट्टी केलेली होती. सकाळ झाल्यासारखं वाटत होतं. खिडक्यांमधून थोडासा  कसलातरी जळका वास माझा नाकात शिरला आणि मला शिंकायला आलं. माझा शिंकण्याचा आवाजाने बाहेर च्या खोलीत बसलेला अॅलन पळतच आत माझाकडे आला.

मित्रा बऱ वाटतय का तुलाकाळजीनेच माझा जवळ येत अॅलन ने मला विचारलं.

हो ठीक आहे आताअसं म्हणत मी उशीच्या आधाराने भिंतीला टेकून बसू लागलो.

मला रात्री इथे कसे आलो ते काहीच आठवत नाहीयेभिंतीला टेकत मी अॅलन ला विचारलं.

या माझा प्रश्नावर तो फक्त हसला. आणि माझी शुद्ध हरपल्याची आणि इथे आल्याची इत्यंभूत माहिती त्याने मला दिली. रात्री पळत इथे आल्यानंतर त्याने मला बेडवर झोपवलं आणि माझी  मलमपट्टी सुद्धा केली होती. रात्री परत पिशाच्च इथे येऊ नये म्हणून घरात जागोजागी शेकोट्या पेटवून ठेवल्या होत्या. मगाशी त्याचाच जळका दर्प माझा नाकात गेला होता. खरंच त्याचमुळे आज माझे प्राणच वाचले होते असे म्हणायला हरकत न्हवती. मी त्याचे मनापासून आभार मानले. आज खरंच तो नसता तर माझी काहीच धडगत न्हवती. पण अॅलन च्या म्हणण्यानुसार माझे प्राण वाचवणे हे अॅलन चे कर्तव्यच होते कारण ते पिशाच्च अॅलन च्या मागावर होते, घरमालकाच्या मुलीला बर करायला गेल्यावर तिथे आलेले पिशाच्च हेच होते. अॅलन च्या म्हणण्याप्रमाणे त्यानेच त्या पिशाच्चाला उकसावले आणि म्हणूनच ते त्याचा मागावर त्याचा खोलीपर्यंत आले  आणि योगायोगाने त्या रात्री मी अॅलन च्या खोलीवर असल्याने त्या पिशाच्चाने माझासुद्धा खरपूस समाचार घेतला होता. 

पिशाच्चाचा त्या नुसत्या नावानेच मला सकाळ सकाळ घाम फुटला. त्या रात्री माझी अवस्था खरंच भयानक झाली होती. एवढ जीवावर बेतलं आपल्या खरंच या गोष्टी घडतील अशी अपेक्षासुद्धा केली न्हवती. आता इथे राहणं खरंच मला धोक्याचं वाटू लागलं. दैवयोगाने म्हणा किंवा अॅलन च्या तल्लख बुद्धीने त्या रात्री आपण जिवंत राहिलो नाहीतर की झालं असत याचा विचार न केलेलाच बरा. आपली बायका पोरं तिथे आपल्या मायदेशी उघड्यावर पडली असती, ते काही नाही आजच कंपनी मध्ये प्रकृतीच कारण सांगून इथून सटकलेलच बर नाहीतर उद्या परत काही वेगळा घडलं तर जाळायला आपलं शरीर सुद्धा सापडणार नाही. मी माझा विचार अॅलनला बोलून दाखवला इथे राहण्याबाबतचे धोके आणि इथल्या विचित्र पद्धती एके दिवशी आपल्या जीवावर उठतील.

माझं बोलणं ऐकून अॅलन विचारात पडला.

कसला विचार करतोयस मी म्हणालो.

काही नाही रे .. एकतर ते पिशाच्च माझामुळे क्रुद्ध होऊन आपल्या मागे लागलं. त्यादिवशी मांत्रिकाच्या मुलीचा सुद्धा जीव माझामुळेच जाता जाता राहीला. काल सुद्धा ते पिशाच्च माझा मागावरच माझा रूमपर्यंत आले होते पण योगायोगाने ते तुला पाहून तुझा जीवावर उठले  अॅलन म्हणाला.

पण तुला नक्की म्हणायचंय काय ना कळून मी विचारलं.

हेच कि तू इथून जा हवं तर पण माझामुळे ते पिशाच्च आता इतर कोणालाही त्रास देणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार मला, कारण आज ते तुझा जीवावर उठले उद्या न जाणो माझा घरमालकाच्या मागे लागेल त्याचे कुटुंब आधीच गरिबी आणि आजारांनी त्रस्त आहे त्यात अजून हि असली भयानक अवदसा मागे लागल्यावर तर बिचारा कोलमडूनच पडेल. देव ना करो पण त्याचा कुटुंबातल्या लोकांचा जीव मी त्या पिशाच्चाला घेऊ देणार नाही अॅलन निग्रहाने म्हणाला.

काही वेळ शांततेत गेला. अॅलन ने उठून खोलीमधली खिडकी उघडली. त्याने जशी खिडकी उघडली तसं मंद थंड हवेचा झोत आतमध्ये आला, मला तो बराच सुखावून गेला.

काही वेळाने त्या शांततेचा भंग करत मी अॅलन ला म्हणालो पण आपण काय करू शकतो मित्रा. ते एक पिशाच्च आहे कोणी हाडामांसाचा माणूस असता तर मारून मुटकून वठणीवर आणता आला असता. इथे तर भयंकर अशा पिशाच्चाशी गाठ आहे. आपण त्याचं की वाकड करू शकतो.

माहित नाही, पण आता काही झालं तरी या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी माघारी परतणार नाही, मग परिणाम काहीही होवोहाथ मागे बांधून खिडकीच्या बाहेर पाहत अॅलन निश्चयपूर्वक म्हणाला.

 अॅलन च्या या निग्राहाच्या निर्णयामुळे मला एकट्याला या आफ्रिकन भुमिमधून काढता येईना. आपण किती स्वार्थीपणाने विचार करतो याचच मला दुख: झालं याउलट अॅलन ने त्याचा घरमालकाच्या गरीब कुटुंबाचा विचार केला. आपण इथून कसेबसे जीव वाचवून जाऊ पण त्या गरीब घरमालकाच्या कुटुंबाचं काय हा विचार त्याने केला पण असा विचार माझा मनात आला न्हवता. श्या.. काय हा आपण असे कसे विचार करू शकतो याची माझी मलाच लाज वाटू लागली. प्रकृतीच कारण सांगून २-३ दिवस कंपनी मध्ये येणार नाही असं तिथल्या सुपरवायझर ला मी निरोप दिला आणि मी सुद्धा अॅलन च्या या कार्यात सहभागी होण्याचं ठरवलं.

त्या दिवशी दुपारच्या सुमारास अॅलन च्या घरमालकाच्या घरी आमची बैठक जमली, मी , अॅलन, माझा गेस्टहाउस चा केअरटेकर बोमान, अॅलन चा घरमालक आणि त्याचा घरातले लोकं.

माझावर आणि अॅलन वर काल रात्री गुदरलेला बाका प्रसंग ऐकून सगळेजण हादरलेले होते.

तुम्हाला सांगत होतो मी साहेब रात्री अपरात्री बाहेर पडू नका बोमान काळजीच्या सुरात म्हणाला.

अरे हो .. पण मी अॅलन कडेच गेलो होतो दुसरीकडे कुठे नाही मी उत्तरलो.

खरंच मी उगीचंच तुम्हाला त्या मांत्रिकाकडे नेलं आणि त्यामूळेच तुमच्यावर अशी वेळ आली.अॅलन चा घरमालक अॅलन कडे पाहत म्हणाला.

सगळेजण आपापलं म्हणण मांडत होते, घरमालकाची बायको आणि मुलगी मात्र एका कोपऱ्यात शांतपणे ऐकत उभे होते. तसचं अॅलनसुद्धा शांतपणे सगळ्याचं ऐकत भिंतीला टेकून उभा होता.

घरमालक आणि बोमान त्या पिशाचाच्या मागे किती ताकद आहे हे सांगत होते.

आता आपल्या पुढे एकच मार्ग आहे.अॅलन जमिनीकडे पाहत मधेच म्हणाला.

कोणता मार्ग घरमालक आणि बोमान आपली बडबड थांबवून शंकेच्या सुरात म्हणाले.

या पिशाच्चाने आपल्यापैकी कोणाला काही करायचा आत आपणच त्या पिशाच्चाला शोधून नेस्तनाभूत करणेअॅलन ची नजर अजूनही जमिनीवरच होती.

का..काय बिर्नाखाला नेस्तनाभूत करायचं.. अहो साहेब काय बोलताय एवढ सोपं आहे का ते,” घरमालक घाबरत मोठ्याने म्हणाला.

हे तर मोठ्ठ वेडेपणाच काम आहे आपले मोट्ठे डोळे अजूनच मोठे करत बोमानने घरमालकाला दुजोरा दिला.

का ? काय अवघड आहे. आपल्या कुटुंबावर त्याने जीवानिशी हल्ला केला तर की करणार आहात तुम्ही लोकं अॅलन आपली नजर घरमालकावर रोखत म्हणाला.

साहेब हे मान्य आहे तुम्ही दोन वेळा बिर्नाखाचा सामना केलं आहे, त्यामुळे तुम्ही एवढ आत्मविश्वासाने बोलताय पण तुम्ही म्हणताय एवढं सोपं काम नाहीये ते.त्यात आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. त्या मांत्रिकाची काय हालत झाली आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलीय ना साहेब घरमालक दीनवाण्या सुरात म्हणला.

त्यावर मी पुढे होऊन घरमालकाला म्हणालो हे बघ मी आणि अॅलन इथून जर निघून गेलो तर ते पिशाच्च तुमचा जीवावर उठेल, तुमचा कुटुंबाला धोका आहे हे तुम्हाला कळत कसं नाहीये. आपण की नाही केलं तरी तसंही ते आपल्या मागे लागलेलंच आहे, तुमच्या कुटुंबाला कोणताही धोका नको म्हणूनच अॅलन त्याला संपवायला निघालाय ना..? आणि पिशाच्चाला मारण एवढं अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नसेल. कारण परमेश्वरापेक्षा शक्तिशाली दुसरं कोणी असू शकेल का ? अमी परमेश्वर आपल्या सोबत आहे म्हणूनच तर दोनदा आपण पिशाच्चाच्या तडाख्यातून वाचलो ना.  काहीतरी मार्ग नक्कीच असेल त्या बिर्नाख पिशाच्चाला संपवण्याचा.

माझा बोलण्याने घरात खूपच शांतता पसरली घरमालकासह इतर सगळेच शांत झाले. घरमालकाला माझं म्हणण पटत होतं पण त्याचं हे करण्याचं धाडस होत न्हवत. बिर्नाखाशी टक्कर म्हणजे साक्षात मृत्यूशी सामना असं त्याला वाटत होतं.

शेवटी अॅलन पुढे आला आणि घरमालकाच्या हाताला पकडून त्याचा मुलीसमोर ओढत उभं केलं आणि म्हणालाहि तुझी मुलगी आणि बायको हे तुझावर विसंबून आहेत. आता जर तू माघार घेतलीस आणि यांना उद्या काही झालं तर सर्वस्वी तू जबाबदार असशील कळतंय का तुला. घरमालक मान खाली घालून उभा होता. तो काहीच बोलत नसल्याचं पाहून अॅलन माझाकडे पाहत बोलला असं वाटतय आपल्या दोघांनाच हि कामगिरी पार पाडावी लागणार आहे. असं बोलून तो दरवाजाजवळ गेला.

आपल्याला बांगाकडे जावं लागणार मदतीसाठीघरमालक बोलला तसं अॅलन जाताजाता दरवाजाजवळच थांबला.

काय..कोणाकडे..मला नाव नीट न ऐकू आल्यामुळे मी घरमालकाला विचारलं.

बांगाबऱ्याच लोकांना त्याने मदत केलीय पिशाच्चांचा त्रासा पासून, कोणाच्या शेतात धान्य उगवत नसेल किंवा अचानक रात्री पाळीव प्राण्यांचे मृतदेह घराबाहेर पडत असतील तर लोकं बांगा लाच शरण जातघरमालक गूढ स्वरात म्हणला.

असं.. कुठे मिळेल हा माणूस आपल्याला अॅलन घरमालकाजवळ येत म्हणला.

टोन्डू टेकड्यांचा जवळ त्याची झोपडी आहे तो तिथेच असतो. चांगला माणूस आहे तो खूप लोकांना मदत केलीय त्याने त्याबदल्यात त्याला फक्त खाण्याचं सामान द्यावं लागत इतर काहीही तो घेत नाही. तो जास्त लोकांमध्ये मिसळत नाही पण त्याने आजपर्यंत बऱ्याच पिशाचांचा सामना केलायबोमान मधेच बोलला.

मग आपल्याला या बांगा कडे जावच लागणार तर त्याची मदत होईल आपल्याला अॅलन विचार करत म्हणाला.

यावर कोणीच काही बोललं नाही शेवटी त्या पिशाच्चाचा नायनाट करण्यावर सगळ्याचं एकमत झालं होतं. आता या बांगा नावाच्या माणसाकडे जाऊन पुढची आखणी करावी लागणार होती. आजचं निघावं असं अॅलन ने सगळ्यांना सांगितलं जेवढं शक्य असेल तेवढी लवकर हालचाल करावी असं अॅलन चं मत होतं. त्यानुसार सगळेजण आवश्यक त्या गोष्टी घेऊन तयारीला लागले. बांगासाठी जेवणाच सामान, पायात मोठे बूट, मशाली वगेरे साहित्य. सगळ्या सामानाची तयारी करून संध्याकाळच्या सुमाराला आम्ही सगळेच म्हणजे टोन्डू टेकड्यांचा रोखाने निघालो. माझाकडे अॅलन ची रायफल होती ती कशी वापरायची याचं जलद प्रशिक्षण त्याने मला दिलेलं होतं. बोमान आणि घरमालकाकडे सुऱ्या होत्या. जवळपास २-३ मैलाचा रस्ता होता. मैलभर जंगलामधून गेल्यानंतर मोकळ्या मैदानातून पण झाडाझुडूपांचा गर्दीमधून आम्ही पुढे चाललो होतो. पुढे घरमालक आणि अॅलन त्यांचामागोमाग मी आणि बोमान आम्ही सगळेचजण चाललो होतो. अॅलन घरमालकाच्या कुटुंबासाठी एवढी जोखीम घ्यायला निघालेलं पाहून बोमान ला गहिवरूनच आलं. घरमालक सुद्धा अॅलन कडे आदराने पाहू लागलेला होता.

पश्चिम क्षितिजावरून सूर्य अस्ताकडे चाललेला होता त्याचा लालिमा आभाळात सगळीकडे पसरलेला होता. आकाश निरभ्र असल्याने तो रंग जास्तच उठून दिसत होता.

सगळेजण शांतपणे चाललेले होते ती शांतात तोडायचा प्रयत्न करून

बांगा आपली मदत नक्की करू शकेल ना मी उगाचच ने घरमालकाला विचारलं

हो हो नक्कीच .. मी सांगितलं ना तुम्हाला तो सगळ्यांना मदत करतो. त्याचाकडे पण काही विशिष्ट मंत्रसिद्धी आहेत ज्या तो लोकांच्या भल्याकरिता वापरतो. घरमालकाने उत्तरं दिल.

जर असं आहे तर तुझी मुलगी आजारी पडल्यावर तू तिला बांगाकडेच का नाही घेऊन गेलासअॅलन ने घरमालकाला विचारलं.

त्याचं काय आहे कि . आजारी माणसाला बऱ करण्याची मंत्रशक्ती बांगाकडे नाहीये, तो फक्त शेतजमिनीची उत्तम जोपासना, पाळीव प्राण्याचे पिशाच्चापासून रक्षण, आणि जर घरावर कोणी वाईट हेतूने काळी सावली पाडली असेल तर यांपासून बचावाचे उपाय करतोरोग बरे करायचे असतील तर बिर्नाखाला शरण जावं लागतं त्याची उपासना करावी लागते. बांगा कधीही कोणत्या पिशाच्चाची उपासना करणार नाही”  घरमालक चालत चालत खाली पाहत म्हणाला.

मोठं गूढ आणि रसपूर्ण वक्तव्य घरमालकाने केलं होतं त्याला अजून काही विचारावं असं वाटून मो तोंड उघडलं एवढ्या बोमान म्हणाला त्या बघा त्या टोन्डू टेकड्या आता आपण थोड्याच वेळात पोहोचू

समोर एका मैलावर पसरट आकाराच्या टेकड्यांचा घोळका दिसत होता. त्या टेकड्यापासून काही अंतरावर लांब माणसांची वस्ती होती होती. आम्ही चालत चालत त्या टेकड्यांचा जवळ पोचलो

आणी ती बांगा ची झोपडी घरमालक समोरच्या छोट्या टेकडीकडे निर्देश करत म्हणाला.

क्रमश:

आफ्रिकेतील अतर्क्य- ३

 

दुसऱ्या दिवशी अॅलनन काल सांगितलेल्या त्या पिशाच्चाच्या भयानक अनुभवाचा विचार करतच माझा दिवस गेला. खरंच असं झालं असेल माझा मनात उगाचच शंकेची पाल चुकचुकली खोटं म्हणावं तर अॅलन तसं का सांगेल त्यात त्याचा काय फायदा, नाही नाही ते विचार माझा डोक्यात चालू झाले. इथ राहणं खरोखरंच सुरक्षित तर आहे ना असं वाटू लागलं. संध्याकाळी कंपनीमधून घरी आल्यावर घर खायला उठलं. जाताजाता बोमान ला विचारावं आणि उगाचच मनाची सांत्वना करावी म्हणून त्याला विचारलं कि इथे खरंच मांत्रिकांना पिशाच्च इत्यादी शक्ती अवगत असतात का? त्यावर त्याने होकार भरला. अॅलन च्या घरमालकाला बोमान ओळखत होता आणि त्याची मुलगी पण तशीच बरी झालीय असं तो मला सांगू लागला. अच्छा म्हणजे अॅलन च्या घरमालकाची मुलगी बरी झाली होती तर. का कुणास ठावूक मला या घटनेची संपूर्ण माहित त्या घटनेसंदर्भात निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून जाणून घायची होती. तसं करण्यामागे माझे खरंतर माझे दोन हेतू होते एक असा कि अॅलन खरंच जे सांगत होता ते खरं होतं कि दारूच्या नशेत जंगलात रात्री अपरात्री भटकल्यामुळे आणि नंतर रात्री स्वप्न पडल्याने त्याचा डोक्यातून निघालेली हि काथोकाल्पित घटना होती कि दुसरंच म्हणजे हे जर खरं असेल तर आपण या जागी कितपत सुरक्षित  आहोत हे कळणार होतं. जंगलाचा भाग मी राहतो होतो त्या जागेपासून इतका जवळ न्हवता तसा तो तितका लांबदेखील न्हवता. कोणत्या हिंस्र प्राण्याचा आणि नुकत्याच ऐकलेल्या अॅलन च्या भयानक पिशाच्ची अनुभवाचा धोका आपल्यापर्यंत पोचला तर? विचारानेच मला घाम फुटला एकतर माझा स्वभाव तसा भित्राच होता. रात्रीच काय तर दिवसासुद्धा जंगलात जायची हिम्मत माझात न्हवती.  जर इथे राहण्यात काही धोका असेल तर लवकरात लवकर आपलं बाडबिस्तर बांधून दुसरीकडे राहायला गेलेलं बरे कारण कंपनीचं आढावा घेण्याचं काम संपलेलं न्हवता. काय करावं कळेना

तसं मला एक कल्पना सुचली कि आपण जरा अॅलन च्या घरमालकाला स्वतः भेटून त्याचाशी बोलून खऱ्या गोष्टीचा उलगडा करावा आणि पुढचं पाउल उचलावे.

त्या संध्याकाळी मी जेवणाच्या आधी अॅलन च्या घरमालकाला जाऊन भेटायचे ठरवले. तसं तो कुठे राहतो हे मला माहित होतेच, लगबगीने मी त्या घरमालकाच्या घराजवळ गेलो. घराच्या आजूबाजूला ४-५ शेळ्या जे खुंटीला बांधलेल्या होत्या, त्यांचा पडलेल्या मलमूत्राचा तीव्र वास दरवळत होता, बाजूलाच कोंबड्यांचे खुराडे असा सगळा प्रकार होता. मुख्य दरवाजा काहीसा उघडा होता. मी हातानेच त्यावर टकटक केली. तेव्हा आतून घरमालक बाहेर आला. मुलीच्या तब्बेतीची चौकशी करायला आल्याचं मी खोटच सांगितलं. 

तो मला ओळखत असल्यामुळे त्याने मला आत घेतलं. आतमध्ये मंद असा दिव्याचा प्रकाश होता. आणि बाजूला घरमालकाची बायको आणि बरी झालेली मुलगी शांतपणे बसलेले होते. थोडं आत आल्यावर पाहतो तर की अॅलन देखील भिंतीला टेकून आढ्याकडे बसलेला होता. खरंतर अॅलन इथे असणार हे मला अपेक्षित न्हवते कारण अॅलन हा भाडेकरू असल्यामुळे तो त्याचा रूम मध्ये असेल असा माझा अंदाज होता. आणि तसंही अॅलन समोर मला घरमालकाला जास्त विचारपूस करावी असं वाटत न्हवता. मी अॅलन च्या बाजूला जाऊन बसलो.

‘’अरे तू इथे’  अॅलन ने माझाकडे पाहून म्हटलं.

‘’हो, मुलीची तब्बेत बघावी कशी आहे म्हणून आलो पाहायला.’’ मी उतरादाखल म्हणालो.

‘’ देवाची कृपाच म्हणायची म्हणून ती बरी झाली म्हणायची आणि आमचं जीव देखील वाचला. घरमालक मधेच बोलला.

घरमालक वर पाहून आफ्रिकन भाषेत देवाचे आभार वगेरे मनात असल्यासारखे हातवारे करत होता.

‘’ अहो तुम्हाला काय होणार आहे, तुम्ही कोणाचे काही वाईट केलंय काय ’’ घरमालकाने अजून काहीतरी बोलावे म्हणून मी उगाचच विषय वाढवायचा म्हणून बोललो.

‘’ यादिवशी हे साहेब होते म्हणूनच मला माझा आणि माझा मुलीला सहीसलामत परत आणता आले. घरमालक अॅलन बोट दाखवून म्हणला.

घरमालक एवढे अॅलन चे गोडवे गात असल्याचे ऐकून खरंतर ती पिशाच्चाची घटना खरीच असावी कि काय असा मला वाटून भीतीने पोटात गोळा आला. कारण हे जर खरं असेल तर मला मी एका धोक्याचा ठिकाणी राहतोय अशी शंका रास्त ठरली असती.

नंतर घरमालकाने मला परत एकदा अॅलन नेच सांगितलेली ती घटना, ते दोघे कसे मांत्रिकाकडे गेले, पिशाच्च कसे मागे लागले हे परत विस्तारित रित्या सांगितलं.

घरमालकाची पत्नीनेदेखील आफ्रिकन मध्ये काहीतरी बडबडली. त्यावर घरमालक देखील तिला काहीतरी उत्तरला ते साहजिकच मला आणि अॅलन ला न कळल्यामुळे घरमालकाने ते मोडक्या तोडक्या इंग्रजीत भाषांतर करून सांगितलं.

माझी बायको म्हणतेय कि ‘’ बिर्नाख पिशाच्च असल्याने खरंतर पोरीचा जीव वाचला, आणि मला पण तसच वाटतंय, नाहीतर ख्रास्तर किंवा बाडूम्बी पिशाच्च असत तर एव्हाना आम्ही कोणीच वाचलो नसतो’’ असं म्हणत घरमालक पुन्हा वर पाहत आभारप्रदर्शन करू लागला.

मी आणि अॅलन जरा बुचकळ्यातच पडलो कारण आता घरमालकाने उल्लेख केलेला बिर्नाख किंवा ख्रास्तर हा की प्रकार आहे हे दोघांनाही कळाल न्हवता. आम्ही तसं घरमालकाला विचारलं कि हा काय प्रकार आहे. त्यावर घरमालक म्हणाला कि

प्रत्येक पिशाच्च हे विशिष्ट शक्तींच्या वर प्रभुत्व मिळून असते जसं कि आजारामधून मुक्तता, शत्रूचं खंडन, पिकाची आणि जनावरांची उत्तम पैदास अशा गोष्टी त्या पिशाच्च साधना केल्याने मांत्रिकाला मिळतात. त्यामुळे त्या त्या शक्तीं मिळवण्याकरिता मांत्रिक ठराविक पिशाच्चाची साधना करत असतात. जशा त्या पिशाच्चान्मध्ये शक्ती असतात. तसं त्यांच्यामध्ये एखादी कमजोरी सुद्धा असते, जसं कि बिर्नाख पिशाच्च हे आगीला मोठा लोळ असेल तर ओलांडून जाऊ शकत नाही. ख्रास्तर पिशाच्चाला पाण्याची भीती. बाडूम्बी ला कोणत्याही वाद्याचा आवाज सहन होत नाही असे अनेक पिशाच्चाचे प्रकार असतात आणि त्यांचा जशा ठराविक शक्ती असतात तशा कमजोरी सुद्धा असतात. त्यामूळेच असे पिशाच्च आजूबाजूला येऊ नये किंवा त्रास देऊ नये म्हणून आमच्या इथे कधी मोठी शेकोटी करून लहानसहान वाद्ये वाजवत राहतात, प्राणी पाळतात किंवा अनेक गोष्टी करतात ज्या इथे बाहेरून येणाऱ्या लोकांना विचित्र वाटतील पण असं करणे हे आमच्या संरक्षणासाठी फायद्याचे असते किंवा तशी प्रथाच आहे इथली. प्रामुख्याने यामागे अशा पिशाचांचा उपद्रव होऊ नये हि धारणा असते ‘’

घरमालकाने दिलेली ती अभिनव माहिती ऐकून माझा तर पोटात गोळाच आला एकतर अॅलन ने सांगितलेली घटना सत्य असल्याचं कळल आणि दुसरं म्हणजे अशी बऱ्याच प्रकारची पिशाच्च असतात हे ऐकून धडकी भरलेली होती. आता काय करावे हा प्रश्नच माझापुढे होता कारण कुठेही गेले तरी आफ्रिकन भूमीतली पिशाच्च सगळीकडे असणार होती त्यामुळे घर बदलून फायदा न्हवता. आता करावे तरी काय विचार करतच मी आणि अॅलन घरमालकाचा निरोप घेऊन खानावळीकडे निघालो.

जेवण करत असताना मी शांत असल्याचं पाहून अॅलन म्हणाला ‘’ की झाला खूप शांत वाटतोय आज, कामाचं काही टेन्शन आहे का

अं हो जरा जास्तच काम पाहावं लागतं म्हणून जरा त्याच विचारात होतेअसं बोलून खरंतर मी घरमालकाने केलेल्या पिशाचांच्या त्या इत्यंभूत वर्णनाने गर्भगळीत झालो असल्याचं सांगायची लाज वाटून चक्क खोटं बोललो. होतो आणि मलाच माझा या खोट्याची कीव आली साला काय भित्रे आहोत आपण. ज्या व्यक्तीसोबत ती भयानक घटना घडली ज्याने ते पिशाच्च प्रत्यक्ष पहिले तो अॅलन किती स्थिर होता आणि माझा त्या घटनेमध्ये काहीही सहभाग नसून किंवा ते पिशाच्च पहिले देखील नसून माझी हि अवस्था. खरंच अॅलन च्या धाडसाच कौतुक करावं तेवढ थोडंच होतं. प्रसंगावधान राखून त्याने घरमालकाच्या मुलीचा जीव वाचवला होता.

आमचं जेवण संपत आले तसं अॅलन मला म्हणला चल आज माझा रूमवर झोप, तेवढ्याच गप्पा होतील आणि एक दोन घोट घेऊयात. डोळे मिचकावत अंगठा तोंडाकडे नेत अॅलन म्हणला.

उद्या मला तसंही फारस काम न्हवत उशिरा गेलो असतो तरी चालल असत आणि बरेच दिवस मी सुद्धा दारू प्यायलेलो न्हवतो कधी मधी घ्यायचो मी, पण इथे आल्यापासून या धावपळीत काही जमलं नाही. शिवाय पिशाच्च प्रकरण कळल्यापासून मी जरा धास्तावलेलोच होतो. त्यामुळे अॅलन ची ती विनंती मी चटकन स्वीकारली आणि आम्ही दोघे त्याचा रूमकडे जाण्यासाठी वळलो.

रूमवर शिरताच जास्त वेळ न दवडता आम्ही लगेचच ग्लास भरायला सुरुवात केली. अॅलन ने एक त्याचसाठी आणि एक माझासाठी ग्लास भरला आणि चियर्स असं म्हणत आम्ही ग्लास तोंडाला लावला. अॅलन त्याचा सैन्यदलातील आयुष्याबाबत सांगत होता. जसजसं पिऊ लागलो तसं गप्पांना रंग येऊ लागला अर्थात बोलत तो होता मी आपलं ऐकत होतो मधेचच ओह्ह, रिअली असे आश्चर्य वजा कुतूहलमिश्रित उद्गार काढायचो. माझा त्या उद्गारांनी प्यायलेला अॅलन अजूनच चेकाळून बोलायला लागायचा.

 हळू हळू रात्र चढायला लागली आणि दारूचा अंमल पण चढू लागलेला होता. रातकिड्यांचा आवाज  जास्तच येऊ लागला. आम्ही जिथे पीत बसलो होतो तिथेच बाजूच्या भिंतीवरच एक खिडकी होती ती अर्धी उगादी होती आणि तिथून थंड हवेचा झोत माझा अंगावर येत होता. दारू चढल्याने आणि थंड वाऱ्याचा झोताने मला झोप येऊ लागली, अॅलन काही थांबायचे नाव घेईना त्याचा गप्पा अविरत चालूच होत्या. मला गुंगी येऊ लागली मी कधी झोपी गेलो कळलंच नाही मला. अचानक रात्री कसल्यातरी आवाजाने मला जाग आली. मी जरासा दचकूनच उठलो. खिडकी वाऱ्याचा आवाजाने करकरत होती, मला उठायची अजिबातच इच्छा न्हवती पण खिडकीची करकर चाळू असताना झोप लागणारच न्हवती. कसाबसा चरफडत मी उठलो. खिडकीची अवस्था खरंतर बिकटच होती, पूर्णपणे जुनाट झालेली दिसत होती. खिडकीपाशी येऊन मी कसाबसा उभं राहिलो कारण दारूचा काहीसा अंमल अजूनही माझावर होता तसचं दारूमुळे अंगही जरासं ठणकत होतं. 

खिडकीपाशी उभं राहून मी माझी दृष्टी बाहेर टाकली अंगावर थंड हवेचा झोत अलगद माझा अंगावर आला.  समोर पाहिलं तर दूरदूरवर फक्त मैदानच दिसत होतं आणि काहीशी झाडे, मी खिडकी ओढून बंद करणार एवढ्यात समोरच्या झाडामागे कसलीतरी खुसपूस मला जाणवली. कसलेतरी जंगली जनावर किंवा सरपटणारा प्राणी असेल असं समजून मी खिडकी ओढून घेणार इतक्यात ..

समोरच्या झाडामागून झाडाच्या वाळलेल्या फांदिसारखा दिसणारा एक लांब हात मागून पुढे आला आणि झाडामागून कसलीतरी आकृती डोकावून पुढे पाहू लागली, ते दृष्य पाहताच भीतीने माझी बोबडीच वळाली. हा भ्रम आहे कि सत्य मला काहीच थांग लागेना. जागच्या जागी थीजल्यासारखा मी तिथेच खिडकीपाशी उभा होतो. त्या झाडामागून फांदिवजा हातापाठोपाठ एक गोलाकार रुंद डोके बाहेर आले. ज्याला डोळे असे न्ह्व्तेच त्या जागी फक्त खोबण्या होत्या. हे पाहून माझा तोंडच पाणीच पळाल, सर्वांगाला घाम फुटला आणि माझी उरलीसुरली नशा खाडकन उतरली. त्या आकृतीने घोड्यासारखा फुरफुरत कसलातरी आवाज केला. आणि तशी मी घाबरून जोरात बोंब ठोकली. 

माझा जोरदार बोम्बलल्याने झाडामागच्या आकृतीने हवेतच खिडकीपाशी असे काही उड्डाण केले कि इम घाबरून मागे पडलो. मागे ठेवलेला दारूच्या ग्लासाला धक्का लागून तो फुटला आणि नेमका माझा हात त्यावर पडला खसकन काच माझा हातात घुसली. आणि एक कळ माझा हातातून मस्तकात गेली. माझा ओरडण्याने अॅलन झोपेतून खाडकन जागा झाला होता. जसा तो जागा झाला तसं त्याने खिडकीतील आकृतीकडे आणि जमिनीवर रक्ताळलेला हात पकडून कण्हत बसलेल्या माझाकडे पाहिलं. अॅलन कडे पाहून त्या आकृतीने जोरदार आवाज केला जणूकाही वाफेच्या इंजिनाची शिट्टी असावी तसा. तो आवाज ऐकताक्षणी आता मरण जवळ आलेलं आहे असं समजून मी जमिनीकडे पाठ ठेकून लोळण घेतली. 

पण याउलट अॅलन ने चित्त्याप्रमाणे झेप घेऊन बाजूला पडलेला त्याचा लायटर घेतला. आणि मगाशी दारू पितापिता आपला अर्धवट राहिलेला ग्लास हातात घेतला. अॅलन ची हालचाल खूपच चपळाईने झाली. खिडकीतून त्या आकृतीने आपले डोके आत घ्यायला सुरुवात केली तेवढ्यातच अॅलन ने लायटर पेटवला आणि ग्लासामधील अर्धी दारू चटकन प्यायला आणि सर्कशीमध्ये मध्ये आगीचे खेळ करणाऱ्या लोकांप्रमाणे लायटर समोर तोंडातील दारू भसकन थुंकल्याप्रमाणे सोडली. तसं लायटर च्या आगीमुळे आणि दारूचा संपर्क येऊन मोठा आगीचा लोळ निर्माण झाला आणि खिडकीमध्ये तोंड घातलेल्या त्या झाडाप्रमाणे असणाऱ्या आकृती च्या सरळ तोंडावर गेला. मोठ्याने आवाज करत ती झाडसदृश आकृती बाजूला झाली. मी मात्र हा सगळा प्रकार गलितगात्र झाल्याप्रमाणे जमिनीवर पडून बघत होतो. हाताला काच लागल्याने रक्त वाहत होत आणि वेदना होत होत्या. 

ती आकृती आगीमुळे लांब गेल्यानंतर अॅलन ने मला उचललं आणि आपल्या खांद्यावर घेतलं. माझा हाताला लागल्याने आणि भीतीने माझी बोबडी वळल्याने माझाशी बोलण्यात काही अर्थ आहे असं त्याला वाटलं नसावं. मला खांद्यावर घेऊन त्याने मुख्य दरवाजावर लाथ घातली तसा दरवाजा उघडला. आणि मला खांद्यावर घेऊन एका वीराप्रमाणे रस्त्यावरुन पळत सुटला.

ते पिशाच्च फक्त आगीमुळे काही काळ लांब गेले आहे, ते परत आपल्या मागावर येण्याची शक्यता आहे, ते यायच्या आत आपल्याला शक्यतो लवकर इथून निघायला हवं पळत पळतच अॅलन मला म्हणाला. पिशाच्च हे नाव ऐकून माझा तोंडच पाणी पळायला आता माझात काहीच उरलं न्हवता.

अ..आ.. कु..कुठे चाललोय आपण.. फक्त एवढंच म्हणत कण्हत भानावर आल्यासारखं मी अॅलन ला विचारलं.

तुझा घरी एवढंच अॅलन म्हणाला. त्याचे ते ऐकलेले मी त्या रात्रीचे शेवटचे शब्द त्यानंतर माझी शुद्ध हरपली.

क्रमश:

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ७

  हॉस्पिटलमध्ये स्पिरिटचा आणी औषधांचा वास जास्तच दरवळत होता. नर्सेसची येण्याजाण्याची लगबग चालू होती. त्या त्या स्पेश्यालीटीचे डॉक्टर्स आपापल...