आफ्रिकेतील अतर्क्य - भाग ५ ( अंतिम भाग )

 २-३ मोठ्या टेकड्यांचा मधोमध एक लहानशी टेकडी होती त्यावर झोपडी सारखं एक खोपट दिसत होतं. आणि वरून धूर निघत होता.

आम्ही थोड्याच वेळात बांगाच्या झोपडीजवळ येऊन पोहोचलो. बाजूला ३-४ कोंबड्या खुराड्यात कोंडलेल्या होत्या. शेजारीच खुंटीला बांधलेल्या २ शेळ्या कुतूहलाने आमच्याकडे पाहत जमिनीवर पाय दुमडून बसल्या होत्या. त्या खुराड्याभोवती आणि शेळ्यांच्या भोवती मोठ्ठ लालसर मातीचं एक रिंगण केलेलं होतं. झोपडीच दार बंद होतं. आता बांगा आत झोपडीमध्ये असला पाहिजे नाहीतर परत त्याची वाट पाहत बसायला लागलं असत, आता सूर्यास्त होऊन आता चांगलाच काळोख होऊ लागलेला होता.

घरमालकाने पुढे होऊन बांगाला आवाज दिला.

तसं आतून मधून एक धीरगंभीर आवाज आला. म्हणजेच बांगा आतच होता तर.

माझामागे आत मध्ये या घरमालक झोपडीचा दरवाजा उघडत म्हणाला.

घरमालक आत गेला तसे आम्हीदेखील एक एक करत आतमध्ये गेलो.

झोपडी बऱ्यापैकी ऐसपैस होती. कोपऱ्यात शेकोटी पेटवलेली दिसत होती आणि तिच्या वरच्या बाजूला एक भगदाड होतं जेणेकरून धूर झोपडीमध्ये नं राहता बाहेर निघून जावा.

त्याचा विरुद्ध दिशेला झोपडीच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक माणूस मांडी घालून चूल पेटवत होता चुलीवर एक मातीचं भांड होतं.

घरमालकाने पुढे जाऊन बांगाला नमस्कार चमत्कार केला. बांगा दिसायला खुपंच मजबूत शरीरयष्टीचा आणि चांगलाच उंचपुरा होता. त्याचा तोंडावर लाल रंगाचे तीन पट्टे ओढलेल दिसत होते. दंडावर वाघाच्या तीन नखांचा ताईत होता. कमरेला वाघांचा कातड्याच बनवलेलं वस्त्र आणि वर उघडाच असा एकंदरीत त्याचा पेहराव होता. त्याने हसूनच घरमालकाच स्वागत केलं.

घरमालकाने आमच्या तेथे येण्याचं कारण बांगाला सांगितलं तसा त्याचा चौकोनी चेहरा गंभीर होत गेला. त्यांची सगळी चर्चा आफ्रिकन भाषेत चाललेली असल्याने आम्हाला त्यातलं काही कळाल नाही.

नंतर बांगा अॅलन जवळ आला आणि आफ्रीकांमध्ये शांतपणे काहीतरी बोलला ते न समजून अॅलन ने घरमालकाकडे पाहिलं. तेव्हा घरमालकाने भाषांतर केलं तो म्हणतोय कि आजवर परदेशी लोकांना आफ्रिकेतल्या पिशांचांची फक्त नाव ऐकूनच पळुन जाताना पाहिलंय. पण त्यांचाशी सामना करणारा तुझासारखा धाडसी माणूस पहिल्यांदाच पाहतोय

यावर काहीही न बोलता फक्त हसला.

एका गरीब आफ्रिकन माणसासाठी त्याचा कुटुंबाच्या रक्षणासाठी तू आणि तुझे सहकारी जीव धोक्यात घालतायत मला तुमचा अभिमान वाटला. आणी म्हणूनच मी नक्कीच तुम्हाला मदत करेन बांगा पुढे म्हणाला.

तसे एक हात वर करत आफ्रिकन भाषेत बांगाने कसलीतरी आरोळी दिली त्यामागोमाग घरमालकाने आणि बोमाननेही हात वर करत त्या आरोळीचा पुनुरुच्चार केला.

थोडक्यात बांगा आमच्या मदतीसाठी तयार झाला होता. मला हायसं वाटलं. मग आम्ही सगळे त्या पिशाच्चाला कसं बोलवावं आणि त्याचा खात्मा करावा यावर चर्चा विमर्श करू लागलो. बाहेर चांगलाच काळोख पडलेला होता. दुरून कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकू येत होती.

रात्र झाल्याने बांगाने आम्हा सर्वांना बसायला सांगून चुलीवर तापत असलेला मातीच भांड खाली उतरवलं आणी बाजूच्या टोपली मधील ५-६ कंदमूळ काढली ती मातीच्या तव्यावर चांगली भाजली. नंतर भांड्यामध्ये असलेला घट्ट द्रवपदार्थ आणी ती कंदमूळ आम्हा सर्वांना वाढली, आणी आम्ही सगळेजण पुढ्यातला त्या पदार्थाचे सेवन करू लागलो. 

पुढची योजना कशी आखणार आहोत आपण अॅलन बांगाकडे पाहत म्हणाला.

आपण त्या बिर्नाख पिशाच्चाला आपल्याकडे आकृष्ट करून घेणार आहोत ते एकदा आलं कि मग आपण त्याचा खात्मा करू पुढ्यात असलेलं कंदमूळ दाताने कुरतडत बांगाने उत्तरं दिलं. अर्थात त्या दोघांमध्ये दुभाषाच काम घरमालक करत होता.

पण नक्की कस? “अॅलन ने आश्चर्यकारक रित्या विचारलं. मलासुद्धा उत्सुकता होती कि आपण त्या पिशाच्चाला आकृष्ट कसे करणार आहोत.

बांगाने बाजूला ठेवलेल्या बोचक्यातून एक भांड आणि कसलीतरी पुरचुंडी बाहेर काढली.

त्यासाठी आपण तुमच्या रक्ताचा वापर करणार आहोत. बांगा शांतपणे म्हणाला आणि त्याने बोचक्यातून काढलेलं भाडं अॅलन च्या पुढ्यात ठेवून पुरचुंडीची गाठ सोडली त्यातून पांढऱ्या रंगाची माती अॅलन च्या समोर असलेल्या भांड्यात टाकली.

या मातीत तुमचं थोडसं रक्त टाकून विशिष्ट मंत्रोच्चार करावे लागतील. त्यासरशी तुमचा माग काढत ते पिशाच्च त्या भांड्याजवळ येईल. पुढे मी सांगेन काय करायचं तेबांगा एवढ बोलून चुलीमधली लाकडं व्यवस्थित करू लागला.

आमचं सगळ्याचं खाऊन झालं. आणी परत आम्ही चर्चा करू लागलो.

बांगा बोलू लागला इथून जवळच काही अंतरावर एक कुरणवजा मैदान आहे, तिथे बऱ्यापैकी पिशाच्चांचा वावर असतो. टोन्डू टेकड्या उतरून मागे गेलो कि उताराला एक ओढा लागेल तो ओलांडून पुढे गेलं कि काही अंतरावरच ते मैदान लागेल.

पण ती जागा तर वावरण्यासाठी निषिद्ध आहे घरमालक म्हणाला.

हो कारण तिथे पिशाच्च वास करतात, तिचं जागा आहे जिथे आपल्याला आपलं सावज मिळेल बांगा त्यावर म्हणाला.   

असं असेल तर लागलीच आपल्याला तिथे जावं लागेल अॅलन पुढ्यात असलेल्या भांड्याकडे पाहत म्हणाला.

आज पोर्णिमेनंतरचा तिसरा दिवस आहे त्यामुळे आजसुद्धा जाऊ शकतो कारण पुढे नंतर चंद्र जसजसा कमी होत जाईल तसं पिशाचांचा तिथला वावर कमी होतो. त्यामुळे जे काही करायचं असेल ते या काही दिवसातच करणे योग्य ठरेल बांगा म्हणला.

बांगाच्या त्या विधानावर कोणीच काही बोललं नाही. अॅलन ने सगळ्यांना तयार व्हायला सांगितलं आपण आत्ताच तिथे जाणार आहोत. सगळेजण तयार झाले.

टोन्डू टेकड्यांचा मागच्या बाजूला जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्याने आम्ही सगळेजण चालू लागलो. सर्वात पुढे बांगा मशाल घेऊन वाट दाखवत होता. त्यामागोमाग अॅलन, घरमालक, बोमान आणि मी. चंद्राचा मंद प्रकाश सगळीकडे पसरलेला होता. घुबडाचे घुत्कार ऐकू येत होते. एखाद जंगली श्वापद आलाच तर संरक्षणासाठी घेतलेलं रायफल माझा खांद्यावरच होतं. थोड्याच वेळात ओढा लागला. पाण्याचा खळखळ आवाज रात्रीचा गंभीरपणा कापत असल्याप्रमाणे तो वाटला. सावधपणे ओढा ओलांडून आम्ही पुढे आलो. समोर कुरण असलेलं मैदान होतं

तसं बांगा ने आम्हाला थांबण्याची खुण केली. त्याचा जवळ असलेल्या पाण्याच्या कातडी थैलीमधील पाणी तो घटाघटा प्यायला.

आता मी सांगतो ते नीट ऐका बोलता बोलता तोंड पुसत एका झाडाच्या आडोशाला बांगा उभा रहिला. 

मी आणि अॅलन आता समोरच्या कुरणाच्या मैदानात जातो. त्या भांड्यात जी पांढरी माती आहे त्यामध्ये अॅलन चं रक्त टाकतो आणि मंत्रविधी सुरु करतो, तुम्ही सगळे त्या समोरच्या झाडामागे आडोशाला थांबा. मंत्रविधी संपताच काही वेळात ते पिशाच्च येईल. पिशाच्च जवळ यावं यासाठी आमिष म्हणून अॅलन मैदानातच थांबेल. अॅलन चहुबाजूला मी स्फोटकंमिश्रित पावडर असलेलं रिंगण आखणार आहे. मंत्रविधी म्हणून मी लगेचच अॅलन च्या मागच्या झाडामागे लपून राहिलं. पिशाच्च जसं त्या रिंगणात अॅलन कडे येईल तसं मी माझाकडील कापडाचा बोळा जो केरोसीन मध्ये भिजवलेला आहे त्या स्फोटकमिश्रित पावडर वर टाकेन. आणि लगेचच ते रिंगण पेटेल. पिशाच्च त्यामध्ये अडकले जाईल आणि भांबावून जाईल. मग तुम्ही सगळे बाहेर, मग तुम्ही तुमच्याजवळील गोफणीने आगीचे गोळे त्या पिशाच्चावर टाका. घरमालकाला आणि बोमानकडे निर्देश करत बांगा म्हणाला.

हो आम्ही बरोबर नेम धरतो सवय आहे आम्हाला घरमालक म्हणाला.

छान.. जसे आगीचे गोळे त्या बिर्नाखावर पडतील तसा तो जळून खाक होईल, त्याला आगीच्या रिंगणात आपण आधीच अडकवलेल असेल त्यामुळे त्याला पळुन देखील जाता येणार नाही, फक्त एकंच गोष्ट जिकिरीची आहे  ” बांगा म्हणाला.

ती कोणती न समजून मी विचारलं

पिशाच्च रिंगणात येऊन त्यावर आगीचे गोळे फेकेपर्यंत तुम्हाला तग धरून पिशाच्चासोबत रिंगणात उभं राहावं लागेल. बांगा अॅलन कडे कपाळावर आठ्या आणत म्हणाला.

ते ऐकून माझातर पाचावरच धारण बसली. याशिवाय दुसरा मार्ग नाही का निघू शकत असं मी विचारायचा आधीच अॅलन बोलू लागला.

मी आतमध्ये तग धरून थांबायला तयार आहे. निग्रहपूर्वक अॅलन म्हणाला.

शाब्बास.. तू काळजी करू नकोस हा बांगा तुला जास्त वेळ पिशाच्चासोबत राहू देणार नाही”  बांगा अॅलन च्या दंडावर थोपटत म्हणाला.

मला सुद्धा अॅलन च्या धाडसाचं कौतुक वाटलं. मी सुद्धा अॅलन च्या दंडावर थोपटत त्याला मी सोबत असल्याचं सांगितलं.

 ठरल्याप्रमाणे मी घरमालक आणि बोमान बांगा ने सांगितलेल्या झाडामागे आडोशाला आलो. इथे पिशाच्चांचा वावर असल्याने सावध राहण्याचा इशारा बांगाने आम्हाला दिलेला होता. त्यानुसार मी कान आणि डोळे उघडे ठेवून रायफल हातात घेऊनच उभा होतो. घरमालकाने गोफण तयार ठेवली, बोमान ने कापडाचे बोळे केरोसीन च्या डब्यात टाकून ठेवले. आणि तो चवड्यावर बसला. मी रायफल हातात घेऊन झाडाच्या मागून समोर पाहू लागलो.

समोर अॅलन आणि बांगा मैदानाच्या मध्यभागी येऊन मंत्र विधीची तयारी करू लागले. अॅलन ला मध्यभागी उभं राहायला सांगून बांगाने स्फोटक मिश्रित पावडरचं रिंगण आखल. आणि नंतर त्याचा झोळीतून मातीचं भांड आणि पांढरी पूड असलेली पुरचुंडी काढली. मातीच्या भांड्यात पांढरी पूड अलगद टाकली. 

तेवढ्यात समोरच्या बाजूने खूप मोठी कोल्हेकुई ऐकू आली. आणि ४-५ वटवाघळे त्या झाडावरून   फडफडत आवाज करत उडून गेली. आमच्या सगळ्याचंच लक्ष तिथे गेलं. ते झाड आमच्यापासून खूप दूर होतं पण अॅलन आणि बांगा च्या समोरच होतं. ते दोघे सुद्धा तिथे पाहू लागले.

हे लक्षण काही ठीक दिसत नाहीये घरमालक समोर पाहत गूढपणे म्हणाला.

मी रायफलवरची पकड घट्ट केली. आणि डोळ्याची पापणीही न लवता समोर अॅलन आणि बांगाच्या हालचाली पाहू लागलो. त्या निशाचर पक्षांकडे आणि कोल्हेकुई कडे कानाडोळा करून बांगा आपल्या मंत्र विधीची तयारी करू लागला. हातवारे करत मंत्र उच्चारण करून झाल्यावर बांगाने आपल्या पाठीमागून धारदार सुरा काढला आणि अॅलन ला त्याचा हात पुढे करायची खुण केली.

अॅलन ने आपला हात पुढे केलं बांगाने आपल्या धारदार सुऱ्याने अॅलन च्या तळहातावर फिरवला. हातामधून रक्त येऊ लागलं. रक्ताचे थेंब त्या भांड्यात सोडण्याचा इशारा बांगाने केला. तसं अॅलन ने हातातली जखमेची बाजू भांड्यावर धरली. त्यातून काहीसे रक्ताचे थेंब पडले असतील तोच..

तेवढ्यात अॅलन आणि बांगाला त्यांचा मागून गुरगुरण्याचा आवाज आला. तसं त्यांचा माना मागे वळल्या. तो गुरगुरण्याचा आवाज आमच्यापर्यंत देखील आला. घरमालक गोफण तयार करून पुढे आला. बोमानने कापडाचे बोळे गोफणीच्या खोबणीत ठेवले. बिर्नाख आल्याची चाहूल लागल्याने आम्ही तिघे सज्ज झालो.

परत एकदा गुरगुरण्याचा आवाज आणि झुडुपांची खुसपूस ऐकू आली. मगाशी ज्या झाडावरून वटवाघळे उडाली होती हा आवाज तेथूनच येत होता. आता जरा बांगा साशंक झाला. त्याने जवळ पडलेली मशाल हातात घेतली  रिंगणाच्या जवळ आला. एवढ्यात त्यांचा समोरच्या झाडामधून चीत्याप्रमाणे झेप घेऊन एक काळकुट्ट सातफुटी तोंडाच पिशाच्च अॅलन कडे झेपावलं. त्याची चपळाई एवढी होती कि अॅलन देखील गांगरला. पण त्वरेने त्याने बाजूला उडी मारली आणि पिशाच्च अॅलन च्या पुढे घसरत रिंगणाच्या आता कडेला गेलं. बांगा त्या पिशाच्चाकडे रोखून पाहू लागला.

बिर्नाख पिशाच्च आलं होतं तरीही ठरल्याप्रमाणे बांगा रिंगणाला आग का लावत न्हवता म्हणून मला आश्चर्य वाटलं.

अॅलन न देखील बांगाला आग लाव असा इशारा दिला. कारण योजनेप्रमाणे पिशाच्च रिंगणात आलेलं होतं. बांगा ने ओरडूनच नकार दिला. आणि पिशाच्चाला त्याचाकडे येण्यासाठी आवाज देऊन चेतवू लागला पिशाच्च आता जास्तच गुरगुरत होतं आणि त्याने आपला मोर्चा बांगाकडे वळवला. बांगाला दिसत होतं पिशाच्च गुरगुरत होतं. बांगा काही करत न्हवता उलट वेड्यासारखं त्या पिशाच्चाला जास्तच खवळत असल्याचं पाहून मी पटकन घरमालकाला म्हणलो आगीचे गोळे टाका नाहीतर ते पिशाच्च दोघांना कच्च खाऊन टाकेल. घरमालक घाबरत घाबरत पण सावधगिरीने पुढे आला.

बोमानने कापडी बोळ्यांना आग लावली. आणि घरमालकाने क्षणाचाही विलंब ना लावता कापडी बोळ्यांना गोफणीने बरोबर नेम धरून पिशाच्चाकडे भिरकावले. घरमालकाचा नेम अचूक बसला. पण कागदी बोळे अंगाला लागून खाली पडावेत तसं ते आगीचे बोळे त्या पिशाच्चच्या अंगाला लागून कुचकामी असल्याप्रमाणे खाली पडले. त्याचा पिशाच्चावर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याला त्याचा मागच्या झाडामागे कोणीतरी आहे हे समजलं आणि ते आमच्याकडे चाल करून चाचपडत येऊ लागलं. आगीचे बोळे कुचकामी ठरल्याने आमच्या तिघांचेही तोंडच पाणीच पळाल.

असं कसं झाला आगीच्या बोळ्यांचा परिणाम व्हायला हवं होता. पण आम्हाला विचार करायला वेळ न्हवता पळुन जावं तर पाय जागचे हलेनात. पुतळ्याप्रमाणे आम्ही तिघेही गोठून जागीच उभे होतो. आमच्या या करामतीमुळे पिशाच्चाची पाठ बांगा समोर आली. आणि त्याचाच फायदा घेऊन बांगा पळत पळत पिशाचाकडे धावू लागला. मागून कोणीतरी येत असल्याने पुढे आमचाकडे येत असतानाच पिशाच्च मागे वळणार इतक्यात बांगाने जवळ येत मोठी आरोळी ठोकत उंच उडी मारली आणि आपल्या जवळील पाण्याची कातड्याची पिशवीच बुच काढून पिशाच्चाच्या नुकत्याच वळलेल्या तोंडावर त्यातलं पाणी फेकलं. चर्रर असा आवाज झाला. आणि पिशाच्चाने ओरडतच तोंड झाकून घेतलं. पिशाच्चाच्या चेहऱ्यावरून धूर येऊ लागला. जवळ पोचलेल्या बांगाने त्वरेने पिशवीतले अजून थोडे पाणी त्याचा छातीवर आणि पायांवर टाकले, त्यामुळे पिशाच्चाच्या छातीवरून पायांवरून सुद्धा तसेच धुराचे लोट निघू लागले. तसे मोठ्याने आवाज करत ते पिशाच्च बांगाच्या अंगावरून मागे उडी मारून पळतच मैदान ओलांडून त्वरेने मागच्या झाडीच्या गर्दीत नाहीसे झाले. पिशाच्च जाताच अॅलन धावत बांगाकडे आला. आम्ही तिघेजण सुद्धा बांगाकडे धावलो. बांगा हसतहसत कमरेवर हात ठेवून आफ्रिकन मध्ये काहीतरी बडबडत खाली वाकू लागला. त्याला की होतंय आम्हाला कळेना.

पिशाच्च निघून गेलं आपला प्लान पण फसला अॅलन चरफडत म्हणाला.

आम्ही तिघे सुद्धा बांगाच्या या वागण्याकडे पाहू लागलो. पण काही झालं तरी मोठ्या साहसाने बांगाने त्या पिशाच्चाला पळवून लावलं होतं.

पण आगीच्या गोळ्यांना ते पिशाच्च घाबरल कसं नाही घरमालक साशंक स्वरात म्हणला.

अरे हो ते पण आहेच मी घरमालकाच्या शंकेला दुजोरा दिला.

कारण ते बिर्नाख पिशाच्च न्हवत गालावर हास्याची लकेर उमटवत बांगा म्हणाला.

ओह्ह तरी मला शंका आलीच होती कारण हे पिशाच्च वेगळच दिसत होता कोल्ह्याप्रमाणे तोंड असल्यासारख मी पाहिलेल्या बिर्नाखासारख दिसायला न्हव्तच अॅलन विचार करत म्हणाला.

आम्ही सगळेजण परत आखलेल्या रिंगणाजवळ आलो.

आपला विधी पूर्ण झालेलाच होता अॅलन चं रक्त पण भांड्यात टाकलं होतं पण मधेच झाडीमागे आधीपासूनच असणाऱ्या ख्रास्तर पिशाच्चाने आपल्याकडे मोर्चा वळवलेला होता. पहिल्यांदा मला पण आश्चर्य वाटलं कि मंत्र पूर्ण होतंच एवढ्या त्वरेने बिर्नाख कस की येऊ शकत पण नंतर थोडा वेळ मी पिशाच्च निरखून पाहिलं तेव्हा कळल कि साला हे तर ख्रास्तर पिशाच्च आहे ...बांगा ने माहिती दिली.

ओह्ह म्हणूनच एवढ्या मेहनतीने टाकलेलं आगीचे गोळे कुचकामी ठरले तर घरमालक निराश होत म्हणाला.

अरे त्यानिमित्ताने कळल तरी कि तुझा नेम अजूनही चांगला आहे बांगाने त्यावर हसत हसत सांगितले.

त्यावर घरमालक लाजून खाली पाहू लागला

मी तुम्हाला सांगितलं होतं इथे पिशाच्चाचा वावर जास्त असतो म्हणूनबांगा आजूबाजूला पाहत म्हणाला.

बर झाला तुम्चाकडे पाण्याची पिशवी होती त्यामुळे ख्रास्तराला पळवून लावता आला, ख्रास्तरा पिशाच्चाचं पाण्याशी जमत नाही आणी आजूबाजूला पाणी पण न्हवते कुठे मी म्हणलो.

यापेक्षाही भयानक पिशाच्चांचा सामना मी केलाय. हे ख्रास्तर पिशाच्च काय आहे त्यापुढे बांगा कुत्सितपणे हसत म्हणाला.

सगळेजण ख्रास्तराच्या अचानक हल्ल्याने भांबावून गेले होते पण बांगाच्या साहसी खेळीमुळे त्याला पळवून लावण्यात आम्हला यश मिळालं होतं.

चला आपला मंत्रविधी पूर्ण झालाय रक्त पण भांड्यात आहे, बिर्नाख कधीपण येऊ शकत तयारीला लागा. असं म्हणून आम्ही सगळेजण होकार भरत आपापल्या जागेकडे जायला वळणार इतक्यात..

बाजूच्या झाडीमधून मोठ्याने आवाज करत एक भलमोठ पिशाच्च आवाज करत अॅलन कडे झेपावलं. त्याचा आवाजाने आम्ही सगळेच घाबरलो. अॅलन ने पिशाच्च अंगावर येताच खाली झुकांडी देऊन त्याची झेप चुकवण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा सावध नसल्याने अर्धवट यशस्वी झाला. पिशाच्चाचे मजबूत लांब पंजे अॅलन च्या दंडाला घासून पुढे गेले होते त्यामुळे पिशाच्च पुढे जाऊन कोलमडल तसा अॅलन देखील खाली उताणा झाला. आम्ही सगळेजण बेसावध असल्याने काय करावे तेच कळेना. कारण या पिशाच्चाने अचानकच वाघाप्रमाणे आमच्यावर म्हणजेच अॅलन वर झडप घातलेली होती.

बिर्नाख ....अस ओरडतच बांगा पळतच रिंगणाच्या जवळ गेला.

अॅलन उठून उभा राहिला आणि पिशाच्चाकडे पाहत दोन शिव्या हासडून कपडे झटकत सावधपणे उभा राहिला. अॅलन च्या दंडाला थोडीशी जखम पण झाली होती.

पुढे जाऊन पिशाच्च पण सावधपणे उभं राहिलं आणि अॅलन कडे तोंड करून आवाज करू लागलं

बेशक हे बिर्नाख पिशाच्चच होतं मी त्याचा चेहर्या कडे पाहून ओळखलं अंधारातला त्याचा खिडकी मध्ये पाहिलेला चेहरा मी अजूनही विसरलेलो न्हवतो.

तेवढ्यात चहुबाजूला ज्वाळा भडकल्या. बांगाने मशाल पेटवून स्फोटका च्या मिश्रणाला आग लावलेली होती आणि आगीचा रिंगण तयार झाला होतं पण आता आम्ही सगळेजण त्या पिशाच्चासकट आगीच्या रिंगणात अडकलेलो होतो. बाजूचं रिंगण पाहून पिशाच्च इकडे तिकडे पाहत भांबावून गेल्यासारखं दिसलं. नन्तर आमचाकडे पाहून त्याने मोट्ठ्याने आवाज केला. तो आवाज अगदी अॅलन च्या घरी मी खिडकीतून मागे कोसळलो असता आलेला होता तसा वाटला.

ये हरामखोर ये आता .. आत्ता खरा आमना सामना आहेमोठ्याने हसत हातातली मशाल घट्ट पकडत बांगा म्हणाला.

बांगाने मला घरमालकाला आणि बोमान ला एका बाजूला येण्यासाठी फर्मावले. घरमालकाच्या हातातील गोफणीमध्ये गोळे टाकायला लावले.

अॅलन एका बाजूला झाला आणि पिशाच्चाला आपल्याकडे येण्यासाठी चेतवू लागला. तसे करताना त्या पिशाच्चाचे पूर्ण लक्ष त्याचाकडे जावे हा त्याचा हेतू होता. दरम्यान या गोष्टीचा फायदा घेऊन आम्ही त्या पिशाच्चावर आगीच्या गोळ्यांचा वर्षाव करावा असं ओरडून त्याने आम्हाला सांगितलं.

आगीच्या ज्वाळा चहुबाजूने पेटल्या होत्या आणि त्या जास्तवेळ असणार न्हाव्त्या तेवढ्याच वेळात आम्हाला त्या बिर्नाखाला संपवायचा होतं.

पिशाच्च आवाज करत अॅलन च्या चेतावण्याने त्याचाकडे परत झेप टाकत आलं. त्याला चुकवाव म्हणून यावेळेस झुकांडी मारणार पण त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पिशाच्चाने अॅलन ला अंगावर घेतले आणि आपल्या लांब हातांनी त्याचा चेहऱ्यावर वार करणारच होते.

तितक्यात बांगा सावधगिरीने पळत त्यांचा जवळ गेला हातातल्या मशालीने एक जोरदार फटका त्या पिशाच्चाचा एका बाजूने तोंडावर हाणला. बांगा आल्याचं पिशाच्चाला लक्षात न आल्याने पिशाच्च अॅलन च्या अंगावरून बाजूला फेकले गेले. पिशाच्चाला तोंडावर थोडे आगीचे चटके लागले आणि त्याचा एक लांब असलेला हात आगीच्या रिंगणावर पडला. आणि त्याचा एका हाताला आग लागली. तसं पिशाच्च फडफडत इकडे तिकडे लोळून आग विझवण्याचा प्रयत्न करू लागलं.

स्फोटक मिश्रित आगीचे रिंगण जास्तवेळ आग निर्माण करू शकत नाही, ते पिशाच्च अर्धवट जखमी आहे, हाच मोका आहे ....असं म्हणत बांगाने घरमालकाला खुण केली

घरमालकाला सुद्धा ते समजलं. त्याने त्वरेने गोफणीमधले कापडाच्या बोळ्यांना आग लावली आणि ते नेम धरून हातच्या आग विझवण्यात व्यस्त असणाऱ्या बिर्नाखाकडे भिरकावले. आगीचे २-३ गोळे बिर्नाखाच्या अंगावर पडले तसे पिशाच्च जमिनीवर पडून अजूनच ओरडू लागलं सगळा आसमंत दणाणून गेला. पिशाच्चाचे दोन्ही हात पेटलेले होते. अंगावर पण आगीचा प्रभाव दिसून येत होता.

अजून गोळे टाक बांगा ओरडला.

घरमालक गोळे टाकायला गोफण तयार करणार इतक्यात पिशाच्च्च उठून उभं राहिला आणि त्वरेने झेपावलं. पण यावेळी अॅलन पूर्ण सावध होता त्याने बांगच्या हातातून विद्युत गतीने मशाल घेऊन आमचाकडे येणाऱ्या पिशाच्च्च्या सरळ खोबणी असणाऱ्या तोंडातच घातली. पिशाच्च जागेवरच थांबलं. आणि घोगरा आवाज काढू लागलं. तसं बांगा ने बोमानकडचा केरोसिनचा डबा पटकन घेतला. अॅलन जवळ जाऊन त्याला ढकलून बाजूला केलं. तसं अॅलन बाजूला जाऊन पडला. मग बांगाने हातातला डबा पकडून त्यातले केरोसीनच बिर्नाखाच्या तोंडावर ओतले. आगीचा मोठा भडका उडाला. बिर्नाख मोठमोठ्याने चित्कार काढू लागले, भडकलेल्या आगीमुळे बांगा त्वरेने बाजूला झाला आणि सगळ्यांना लांब जाण्याचा निर्देश दिला. बिर्नाखाचे तोंड आणि दोन्ही हात पेटत चालले होते. आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न बिर्नाख धडपडत होते. बांगाने परत हातातले केरोसीन पळत जाऊन बिर्नाखाच्या अंगावर ओतले आणि बाजूला उडी मारली जेणे करून आगीचे लोळ त्याचा अंगावर येऊ नये. 

आता बिर्नाखाच्या पूर्ण शरीराला आग लागलेली होती आणि ते जमिनीवर पडले. आणि गडबडा लोळू लागले. परत पळत जाऊन बांगाने सगळाच्या सगळा केरोसीन चा डबा लांबूनच बिर्नाखावर ओतला. आणि बाजूला गेला. बिर्नाख आता पूर्णपणे पेटलेलं होते. आगीच्या ज्वाळांनी त्याला घेरलं होतं. आम्ही सगळेजण त्याची तडफड पाहत उभे होतो.

थोड्याच वेळात बिर्नाखाची हालचाल मंद होऊ लागली पण आग अजूनही त्याचा शरीरावर होती.

थोड्याच वेळात बिर्नाखाची संपूर्ण हालचाल शांत झाली. बांगाने जवळ जाऊन खातरजमा करून घेतली.

आगीच्या रिंगणाचा लोळ सुद्धा कमी होऊ लागला. थोड्या वेळाने रिंगणाची आग सुद्धा शांत झाली. आम्ही सगळ्यांनी जवळ जाऊन बिर्नाखाचा कोळसा झालेल्या शरीराचा आढावा घेतला. अखेरीस बिर्नाखाचा खात्मा झाला असं बांगा म्हणाला आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

इथला परिसर पिशाच्चानी भरलेला असल्याने इथून चटकन निघण्यास बांगाने सांगितले. तसं आम्ही परतीच्या मागाकडे लागलो. मी अॅलन जवळ जाऊन त्याचा दंडावरील जखमेचा अंदाज घेतला. बांगाच्या झोपडीत जाऊन त्याचावर मलमपट्टी करूयात असं मी त्याला सांगितलं.

शेवटी आल्या मार्गानेच आम्ही रात्रीच्या निरव शांततेत बांगाच्या झोपडीकडे परत आलो. रात्र भरपूर झाल्याने ती रात्र बांगाच्या झोपडीतच काढली.

दुसऱ्या दिवशी बांगाचा निरोप घेतला त्याने खूप मोठ्या संकटातून घरमालक आणि आमची सुटका केल्यामुळे आम्ही त्याचे मनापासून आभार व्यक्त केले. बांगाने सुद्धा आपल्याला या कामात मजा आली आणि माझा अनुभवामध्ये तुम्ही लोकांनी भरच टाकली असं म्हणत बांगाने आम्हाला निरोप दिला. माघारी गेस्टहाउस वर परतल्यावर मी कंपनीचं उर्वरित काम चटकन संपवलं आणि अजून काही आगळीक होण्याचा आतच आफ्रीकेमधली ती चित्रविचित्र भूमी सोडण्याचा मी आणि अॅलन ने निश्चय केला. आफ्रिकेतला पिशाच्च पाहण्याचा अॅलन चा छंद पार पडलेला होता. परत कोणत संकट येण्याचा आतच आम्ही आफ्रिकेतून  काढता पाय घेतला ते पण इथे परत ना येण्याचा निश्चय करूनच...


 समाप्त.

No comments:

Post a Comment

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ७

  हॉस्पिटलमध्ये स्पिरिटचा आणी औषधांचा वास जास्तच दरवळत होता. नर्सेसची येण्याजाण्याची लगबग चालू होती. त्या त्या स्पेश्यालीटीचे डॉक्टर्स आपापल...