इकीगाई – जगण्याचा उद्देश
जपान या देशाच्या आसपास असणाऱ्या अनेक बेटांपैकी ओकिनावा नावाचे एक बेट आहे. या बेटावर राहणारे लोक हे जगातल्या इतर भागात राहणाऱ्या लोकांपेक्षा तुलनेने जास्त काळ आणी आनंदी जीवन व्यतीत करतात असं काही अभ्यासकांचं मत आहे. आपले सुखी जीवन आणी प्रदीर्घ आयुष्य या गोष्टींमुळेच ओकिनावा बेटावरील लोक प्रसिद्ध आहेत असं म्हणायला हरकत नाही. तेथील लोक आपल्या आयुष्याची शंभरी सुद्धा गाठतात, पण खरा विचार केला असता असं कसं बऱ घडत असावं असा प्रश्न पडतो. असं कोणतं रहस्य ओकिनावा रहिवाश्यांना सापडलेलं आहे. ज्यामुळे ते इतके प्रदीर्घ आणी सुखी आयुष्य जगू शकत आहेत.
काही अभ्यासकांचं मंडळ तिथे याचं गोष्टींचा अभ्यास करायला गेले होते.
त्यात त्यांना बऱ्यान गोष्टी अशा आढळल्या कि ज्याने ओकिनावा रहिवासी आपले आयुष्य
आनंदमय करत असतं. सर्वप्रथम तर ओकिनावा भागातील लोक हे आपल्या मनाप्रमाणे काम
करतात म्हणजेच आपल्याला ज्या कामात आनंद वाटेल तेच काम ते करतात. आपल्या शेतात ते
स्वतः राबतात आणी शेतात भाजीपाला पिकवून स्वतः त्याचे भोजन बनवून ग्रहण करतात.
कोणत्याही प्रकारचे हायब्रीड किंवा जंक फुड ते सेवन करत नाहीत. तसेच ते जे काम
करतील त्यात आनंद मानतात. याचा अर्थ असा नाही कि ओकिनावा मध्ये अडचणी नाहीयेत, राहणीमानाच्या संदर्भात जशा अडचणी इतर देशात असतात तशा ओकिनावा मध्ये
देखील आढळतात पण ओकिनावा चे रहिवासी त्या अडचणी स्वीकारतात, समजून
घेतात आणी त्यावर स्मितहास्य करतात. येथील लोकांना लहानपणापासूनच एकमेकांना मदत
करायला शिकवले गेले आहे. हे लोक एकत्रित कुटुंब पद्धतीत जीवन जगत असतात.
लहानपणापासूनच त्यांना एकत्रित कुटुंबपद्धतीच राहणीमान, योग्य आहार, मनाप्आरमाणे काम आणी तणावरहित जीवनशैली
जगण्यास शिकवण मिळत असते. या गोष्टीलाच ते 'इकीगाई' असं संबोधतात. ओकिनावा येथील लोकांना त्यांचा इकीगाई सापडला असल्यामुळे
त्यांना प्रदीर्घ आणी आनंदी आयुष्य प्राप्त झालेलं आहे.
फक्त ओकिनावा भागातील लोकच नाही तर इतर भागातील लोक सुद्गधा आपापला
इकीगाई शोधून आपलं जीवन सुखकर करू शकतात. यासाठी गरज आहे
ती फक्त योग्य आहार, आनंदी आणी मनपूर्वक काम आणी तणावरहित जीवनशैली. या गोष्टींचा अवलंब करून कोणीही आयुष्याचा
मनमुराद आनंद लुटू शकतो. आपले दैनंदिन काम आणी आपली जीवनशैलीच
आपल्या शरीरावर चांगले वाईट परिणाम करत असतात. म्हणूनच आपण जे काम करतो ते त्यात
आपल्याला रस असायला हवा आणी त्यात कोणताही ताण तणाव असायला नको, याला जर योग्य आहाराची जोड दिली तर इतरांना सुद्धा प्रदीर्घ आयुष्याचा लाभ
घेता येईल. गरज आहे ती फक्त आपापला इकीगाई शोधण्याची ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Fell free to share your Feedbacks