३० एप्रिल, २०२४

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - बिंग फुटलं


बिंग फुटलं

हॉस्पिटलमध्ये स्पिरिटचा आणि औषधांचा वास जास्तच दरवळत होता. नर्सेसची येण्याजाण्याची लगबग चालू होती. त्या त्या स्पेश्यालीटीचे डॉक्टर्स आपापल्या केबिनमध्ये आलेले होते आणि नंबरनुसार पेशंट्सना तपासत होते. अशाच एका केबिन बाहेर रॉबिन आपला नंबर येण्याची वाट पाहत बाकावर बसला होता. त्याच्या आजूबाजूला जास्त पेशंट्स न्हवते कारण डॉक्टरांची तपासायची वेळ अजून सुरु झालेली न्हवती. डॉक्टर येण्याची वेळ पाहूनच रॉबिनने तातडीने दिवसाची पहिली अपॉइंटमेंट घेतली होती. डॉक्टरांनी अजून पेशंट तपासायला सुरुवात केली न्हवती त्यामुळे रॉबिनला पटकन आत जाऊन डॉक्टरांची भेट घेता येणार होती.

एवढ्यात केबिन मधून एक गलेलठ्ठ बाई डोळ्यावरचा चष्मा सावरत बाहेर आली आणि तिने आवाज दिला.

मिस्टर रॉबिन कोण आहेतअसं म्हणत बाकावरच्या २-३ लोकांकडे शोधक नजरेने पाहू लागली.

मीच आहे रॉबिनजागेवरून उठत रॉबिन म्हणाला. 

डॉक्टरांनी बोलावलंय.. आतमधे या..” असं म्हणत ती तिच्या बसण्याच्या जागेकडे वळली.

रॉबिन पुढे होत डॉक्टरांच्या केबिनजवळ आला. केबिनच्या दारावर ठळक अक्षरात पाटी होती.

डॉ. सचित पटवर्धन, न्युरोलॉजी तज्ञ. रॉबिनने केबिनच्या दारावर टकटक केली. तसा आतून आवाज आला “प्लीज कम इनसाईड

रॉबिन आतमध्ये गेला. एका मोठ्या टेबलाच्या समोर मोठ्या खुर्चीत डॉक्टर सचित पटवर्धन एकटेच हलकंसं स्मित करत बसले होते. बाजूलाच पेशंटला तपासायचा बेड होता. मागच्या शेल्फमध्ये काही औषधांचे बॉक्सेस आणि सलाईनच्या बाटल्या होत्या. बाजूलाच कसलीतरी हेल्मेटसारखी मशीन होती.

हेल्लो डॉक्टर सर्वप्रथम धन्यवाद मला तातडीने वेळ दिल्याबद्दलरॉबिन पुढे झुकत हात जोडत म्हणाला.

अहो रॉबिन धन्यवाद कसले आम्ही जशी समाजाची सेवा करतो. तशीच तुम्ही सुद्धा समाजाची सेवा करता. तुम्हाला वेळ द्यावाच लागला.. या या बसा..डॉ. सचित समोरच्या खुर्चीत निर्देश करत हसत म्हणाले.

डॉक्टर सचित यांच्या नम्र वागण्याने रॉबिनला खूप बरं वाटलं. डॉक्टर सचित पटवर्धन यांना रॉबिनबद्दल माहिती होती. तो सध्या देसाई खून प्रकरण हाताळतोय आणि त्यानिमित्तच त्याला आपली भेट हवी असं त्यांचं रॉबिनसोबत फोनवर बोलण झालेलं होतं.

तुमचा जास्त वेळ न घेता मी मुद्द्यालाच हात घालतो. म्हणजे तुम्ही पण तुमचे पेशंट्स पाहायला मोकळे आणि मी पण माझी कामं करायला मोकळारॉबिन म्हणाला.

शुअर, गो अहेडडॉ. सचित पुढे झुकत म्हणाले.

ओके, खरंतर फोनवर आपलं बोलणं झालंच आहे तरीही परत एकदा सांगतो. तुम्ही परदेशात वास्तव्यास असताना मेंदूच्या तंतुंबद्दल केलेलं संशोधन माझ्या वाचण्यात आलं. त्याबद्दल मला काही प्रश्न आहेत.रॉबिनने बोलायला सुरुवात केली. त्यावर डॉ. सचित यांनी फक्त मान डोलावली. त्यामुळे पुढे रॉबिन बोलू लागला.

डॉक्टर तुमचा सायंटिफिक मॅगझिन मधला लेख वाचला. परदेशातील काही औषधनिर्मात्या कंपनीतील ज्येष्ठ शास्त्रज्ञांसोबत मिळून तुम्ही एक वेगळ्या पद्धतीची उपचारपद्धती शोधून काढली. ज्यामुळे मेंदूशी निगडीत असलेले अनेक रोग बरे होण्यास मदत तर झालीच पण त्याहून अधिक म्हणजे फिट्स आणि स्मृतीभ्रंश यासारख्या आजारांवर सुद्धा हा इलाज रामबाण ठरला. परदेशातील पेशंट्स बरे होण्याचं प्रमाण जवळपास ९८ टक्के इतके आहे. अगदी जुनाट मेंदूचे रोग असलेले पेशंट्स जे अतिवयोवृद्ध आहेत त्यांना सुद्धा या उपचार पद्धतीने फरक पडलाय. त्याच उपचार पद्धती तुम्ही इथे स्वदेशात वापरत आहात. मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय.

तुम्ही माझे लेख अत्यंत मनापासून वाचलेले दिसतायत मिस्टर रॉबिनडॉ. अतिशय कौतुकाने म्हणाले.

माझा पेशा गुप्तहेराचा असल्याकारणाने आणि माझ्या केसमध्ये याचं महत्व मला जाणवल्याने तो लेख बारकाईने वाचण भाग होतंशांतपणे रॉबिन म्हणाला.

हम्म.. हे बघा रॉबिन उपचार पद्धतीच म्हणाल तर मी ज्या परदेशी शास्त्रज्ञ टीम सोबत काम करून एक औषध निर्माण केलं होतं ते औषध आणि काही रोजच्या दैनंदिन सवयी उदाहरणार्थ खाण्याच्या सवयी, झोपेतून उठायच्या सवयी यांचा ताळमेळ बसवून पेशंट्सना बरे करता येऊ शकते अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो होतो. परदेशात त्याचे अफलातून रीजल्ट आलेत. तुम्ही म्हणालात तसे जवळपास ९८% इतके. आपल्या देशात सुद्धा हि उपचार पद्धती मी आणली आणि इथे सुद्धा चांगले निष्कर्ष आहेत.डॉ सचित म्हणाले.

आपल्या देशात किती रुग्णांवर हि उपचार पद्धत अवलंबली गेली आणि किती रुग्ण बरे झालेत?रॉबिनने गंभीर होत विचारलं.

माझ्या जवळील अधिकृत महितीनुसार या उपचार पद्धतीने तब्बल २०८ पेशंट्स मी हाताळले. त्यातले जवळपास २०५ पूर्ण बरे झालेत. उर्वरित ३ बरे न झालेल्यापैकी २ अगदीच वृद्ध होते आणि त्यांना मेंदूचे सोडून इतर दुर्धर आजार पण होते. त्यांच्या मेंदूची तंतू असलेली रचना सुधारत होती. पण इतर दुर्धर आजारात शरीर जास्तच खंगल्यामुळे ते दगावले. डॉ. पटापट बोलले.

तिसरा पेशंट जो बरा झाला नाही ते म्हणजे याचं शहरातील रहिवासी असलेले आबासाहेब देसाई बरोबर ना?हनुवटीवर दोन्ही हात ठेवत रॉबिन म्हणाला.

येस्स.. मागच्या बऱ्याच महिन्यांपासून त्यांची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू आहे. सी.टी. स्कॅनचे रिपोर्ट्स मी चेक केले. मागच्या दोन महिन्यात त्यांच्या मेंदूच्या तंतूंची सुधारणा छान झालीय. ठरलेली औषधउपचार पद्धती आणि दैनंदिन सवयीसुद्धा उपचार पद्धतीप्रमाणे चालू आहेत. पण त्यांना अजून पूर्ण बरं वाटत नाहीये. त्यांची स्मृती त्यांना दाद देत नाहीये. डॉ. सचित खंत व्यक्त करत म्हणाले.

उपचार जर व्यवस्थित चालू असतील तर त्यांची स्मृती का दाद देत नाहीये अजूनरॉबिनने विचारणा केली.

कदाचित त्यांच्या केसमध्ये उपचारांमुळे गुण येण्यास जास्त कालावधी लागत असेलडॉ. बोलले.

पण डॉक्टर तुमच्या हातून बरे होणाऱ्या रुग्णांची जास्त संख्या आणि त्यावरील सकारात्मक सर्वे पाहता असं होणं थोडं विचित्र नाही का? म्हणजे देसाई हे इतके म्हातारे पण नाहीत किंवा असपण नाही कि त्यांना इतर काही आजार आहेत, ज्यामुळे उपचारांचा गुण येण्यास वेळ लागतोयरॉबिनने आपली शंका उपस्थित केली.

खरंतर ते एव्हाना बरे व्हायला हवे होते. पण काही केसेस मध्ये ठराविक घटनांचा पेशंट्ना मानसिक धक्का बसलेला असतो त्यामुळे रिकवरीला वेळ लागतो.डॉ. सचित आपली बाजू मांडत म्हणाले.

ते आहेच.. पण तुमचा संशोधन लेखाप्रमाणे रुग्णांच्या बरे होण्याच्या यादीत आबासाहेब देसाई हि केस जरा वेगळी आहे असं म्हणायला हरकत नाही.रॉबिन स्मित करत म्हणाला.

हो.. एक अपवाद म्हणा हवं तर. पण मला खात्री आहे त्यांना आज ना उद्या नक्की पूर्ण बरं वाटेल आणि त्यांची गेलेली स्मृती सुद्धा परत येईल.डॉ सचित खात्रीपूर्वक म्हणाले.

नक्कीच डॉक्टर मला सुद्धा तुमच्याकडून याचं उत्तराची अपेक्षा होती. आज ना उद्या त्यांना नक्कीच पूर्ण बऱ वाटणार. चला तुमचा खूप वेळ घेतला.रॉबिन आभार व्यक्त करत उठला. हस्तांदोलन करत रॉबिनने डॉक्टर सचित पटवर्धन यांचा निरोप घेतला.

केबिनच्या बाहेर येत हलकंसं स्मित करत आणि शिळ वाजवतच तो चालू लागला.

घरी पोचताच रॉबिनने आपले अंग बेडवर टाकले. रात्रभर त्याला झोप न्हवती. एकतर त्या गूढ व्यक्तीचा पाठलाग करताना सपाटून आपटल्याने त्याची पाठ चांगलीच दुखावली गेली होती आणि वाड्यावरून त्यादिवशी आणलेली प्रवासवर्णनांची पुस्तकं वाचता वाचता पहाट कधी झाली त्याला कळलेच नाही. सकळी लवकर डॉक्टर सचित पटवर्धन यांची ठरलेली गाठ घेणे भाग असल्याने झोप अपूर्णच राहिली. त्यामुळे थोडी झोप घेण्याच्या उद्देशाने रॉबिनने अंग टाकलं आणि लागलीच त्याला झोप लागली. रॉबिन झोपून काही तासच झाले असतील कि त्याची झोपमोड झाली ती टेबलावरच्या फोनच्या आवाजानेच. डोळे किलकिले करत चरफडतच रॉबिन उठला आणि फोनजवळ गेला.

कोण आहेरॉबिनने त्रासिक सुरात विचारले.

इस्पेक्टर देशमुख बोलतोय, रॉबिन काय झालं एवढ वैतागायलासमोरून देशमुख बोलले.

अच्छा देशमुख तुम्ही आहात होय.. काही नाही हो रात्रभर झोप न्हवती नुकतीच झोप लागली तर तेवढ्यात तुमचा फोन आला. बऱ ते सोडा तुम्ही कशासाठी फोन केला होतारॉबिन मुद्द्याला हात घालत म्हणाला.

आशुतोषबद्दल सांगायचं होतं. तू सांगितल्याप्रमाणे त्याच्या मागावर माणूस ठेवलेला होता.देशमुख शांतपणे बोलले.

बऱ मग काय हाती लागलंरॉबिन जवळच्या खुर्चीत बसत म्हणाला.

शहरात तो ज्या क्लासला जातो तो क्लास ७ वाजता सुटतो पण कधीकधी शहराबाहेर असणाऱ्या बारमध्ये सुद्धा आशुतोष साहेब दिसले होते. सिगरेट आणि दारू पीत मित्रांसमवेत वेळ घालवतानादेशमुख व्यंगात्मक पद्धतीत बोलले.

हम्म.. मला शंका होतीच. साधारण किती वाजता दिसला आशुतोष तिथे?” रॉबिन म्हणाला.

साधारण ९ च्या आसपास होता तिथे. बारमध्ये चौकशी केली तेव्हा समजले आठवड्यातून एक दोनदा येत असतो तो बारमध्ये याच सुमारास. पण मला एक शंका आहे रॉबिन. ९ वाजता त्याला वाड्याच्या बाहेर जाताना कोणी हटकल नसेल का? कि एवढ्या रात्री कुठे जातोयस म्हणून देशमुखांनी विचारलं.

अहं.. कोणीही हटकल नसेल. कारण तो वाड्याच्या मुख्य दरवाजातून जातच नाही मुळी. बाहेर पडायला तो त्याच्या खोलीतील खिडकीचा वापर करतो. वाड्यात देखील कोणाला त्याच्या व्यसनांविषयी माहिती नसावीरॉबिन म्हणाला.

तू एवढ ठामपणे कस काय बोलतोसदेशमुख बोलले. त्यावर रॉबिनने आशुतोषच्या खोलीत जाऊन तिथे दिलेली भेट सांगितली. त्याच्या खिडकीबाहेर त्याने विझवलेली सिगरेट आणि त्यामुळे खिडकीबाहेर पडलेले सिगरेटचे डाग, सिगरेट विझवून खाली टाकलेलं थोटूक आणि त्याच्या कपाटामध्ये त्याने ठेवलेला तो गाठी मारलेला दोरखंड याबाबत सविस्तर वृतांत सांगितला.

ओह्ह असं आहे तर... म्हणजे रात्री गुपचूप दोरीच्या सहाय्याने आशुतोष खिडकीवाटे खाली उतरून बारमध्ये दारू प्यायला जातो तर.देशमुख म्हणाले.

येस देशमुख, दोरीच्या साहाय्याने खिडकीबाहेर खाली उतरून बाजूचं पुरुषभर उंचीचं कंपाऊंड उडी मारून ओलांडायला त्याला अवघड नाहीयेरॉबिन खुर्चीत बसत म्हणाला.

सध्यातरी आशुतोषबद्दल एवढचं आहे. तुला काही अजून माहिती मिळालीदेशमुखांनी विचारणा केली.

त्यावर रॉबिनने त्या रात्री पाटील डॉक्टरांना दिलेली भेट, डॉक्टरांच्या घराबाहेर ठेवलेली पाळत आणि एका गूढ व्यक्तीचा केलेला पाठलाग सांगितला.

माय गॉड रॉबिन, एवढ सगळं झालं मग तू मला त्याचवेळीच का नाही कळवलसदेशमुख मोठ्याने बोलले.

तितका वेळ न्हवता देशमुख आणि तसंही इतर गोष्टींची छाननी करण बाकी होतंरॉबिन म्हणाला.

ठीक आहे रॉबिन, पण तुला काय वाटत कोण असावी ती व्यक्ती जी अपरात्री पाटलांच्या घरात होती. काय काम असेल तिचं तिथंदेशमुख अधीर होत म्हणाले.

मला अंदाज आला आहे. त्या व्यक्तीचा बुरखा लवकरच फाडणार आहे मी. खरतरं त्याचं दिवशी सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणार होतो मी. पण मला खात्री करून घ्यायची होती म्हणून थांबलो होतोरॉबिन शांतपणे म्हणाला.

खात्री.. कसली खात्री? तुला नक्की कोणावर संशय आहे का? आत्ताच जाऊन त्याची चौकशी करूयात आपणदेशमुख तावातावात म्हणाले.

रिलॅक्स देशमुख सगळं काही करायची संधी मिळेल तुम्हाला. तुम्ही लगेचच देसाई वाड्यावर यायला निघा सगळं काही प्रात्यक्षिक करूनच दाखवतो आणी हो.. त्या डॉक्टर पाटलांना सुद्धा त्याचं मानगुट पकडून आणा वाड्यावररॉबिन जरा कडक आवाजात म्हणाला. रॉबिनच्या अशा ठाम उद्गारानंतर तर देशमुखांची खात्रीच पटली कि रॉबिनला गुन्हेगार कोण आहे ते समजलंय. देशमुख यावर भलतेच खुश झाले आणि त्या खुशीतच त्यांनी फोन ठेवला. रॉबिन सुद्धा पटकन आवरून देसाई वाड्याकडे जाण्यासाठी निघाला.

काही वेळाने रॉबिन देसाई वाड्याच्या जवळ पोहोचला. आपली दुचाकी देसाई वाड्याबाहेर थांबवून रॉबिन देशमुखांची वाट पाहत उभा होता. इन्स्पेक्टर देशमुख आल्यावरच वाड्यात प्रवेश करावा या इराद्याने रॉबिन बाहेर थांबलेला होता. रॉबिनला जास्त वाट पाहायला लागली नाही कारण थोड्या वेळातच देशमुखांची गाडी देसाई वाड्याजवळ येऊन थांबली. गाडीच्या आतमधून देशमुख लगबगीने उतरले आणि त्यांची वाट पाहत असणाऱ्या रॉबिन जवळ आले. नंतर गाडीतून हवालदार म्हस्के आणि अजून दोन हवालदार उतरले. गरज पडेल म्हणून देशमुखांनी पोलिसांची जादा कुमक सोबत आणली होती.

बोल रॉबिन काय योजना आहेअधीर होत देशमुखांनी विचारलं. आज देशमुख वेगळ्याच उत्साहात होते.

आपण दोघे आतमध्ये वाड्यात जाऊयात. हवालदार म्हस्केना सांगा त्या पाटील डॉक्टरांना उचलून वाड्याच्या मुख्यदरवाजापाशी आणून उभं करून ठेवा आणि जोपर्यंत मी आवाज देत नाही तोपर्यंत त्यांना आत आणू नका. उर्वरित दोन हवालदारांपैकी एकाला मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि दुसऱ्याला आतमध्ये अंगणात उभं राहायला सांगा. मी सांगितल्याशिवाय कोणीही वाड्यात येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही. रॉबिनने पटापट देशमुखांना निर्देश दिले.  

देशमुखांनी रॉबिनच्या निर्देशानुसार सगळ्यांना आदेश दिले. हवालदार म्हस्के डॉक्टर पाटलांना आणायला गेले. उर्वरित दोन हवालदार देशमुखांनी सांगितलेल्या जागेवर जाऊन थांबले. रॉबिन आणि देशमुखांनी वाड्यात प्रवेश केला.

क्रमशः


२४ एप्रिल, २०२४

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - काळी आकृती


काळी आकृती

हे सिगरेट विझवल्याचे डाग आहेत तर...खिडकीबाहेरच्या त्या काळसर डागांकडे पाहत रॉबिन मनातल्या मनात म्हणाला.

कदाचित आशुतोषला सिगरेटचे व्यसन असावे आणि त्यानेच खोलीत सिगरेट पिऊन खिडकीच्या बाहेरच्या भिंतीवर सिगरेट पिऊन विझवली असेल. रॉबिन स्वतः सिगारेट पीत असल्याने त्यानेदेखील अशाप्रकारे भिंतीवर कित्येकवेळा सिगरेट विझवली होतीत्यामुळे ते डाग कसले असतील हे रॉबिनच्या लक्षात आले. मगाशी वाड्याच्या खालील भागात जमिनीची तपासणी करताना जे सिगरेटचे थोटूक सापडलं होतं ते आशुतोषनेच वरून खाली टाकलेलं असावं. पहिल्यांदा रॉबिनला वाटलं होतं कि गेस्टरूममध्ये कोणीतरी सिगरेट पिली असेल आणि सिगरेट विझवून थोटूक बाहेर फेकलं असेल. गेस्टरूमच्या अगदी वरच आशुतोषची रूम होती. आशुतोषच्या खिडकीबाहेरील काळसर डागांवरून त्यानेच सिगारेट विझवून राहिलेले थोटूक बाहेर फेकले असल्याचं स्पष्ट होत होतं.

हळुवारपणे खिडकी लावून रॉबिनने आशुतोषकडे पाहिलं. आशुतोष अजूनही कपाळावर आठ्यांच जाळ ठेवून बसला होता. चेहऱ्यावर कंटाळवाणे भाव आणल्याच नाटक करत आणि आपणास काहीही मिळालं नाही अशा अविर्भावात रॉबिन दरवाजाजवळ आला. अजून काही बघण्यासारखे उरलेले नसल्याने रॉबिन आशुतोषच्या रूममधून बाहेर पडला आणि जिना उतरून खालच्या भागात आला. वाड्यात अजूनही कोणीच आलेलं न्हवत. नंदिनी स्वयंपाकघरात भांडी घासत असल्याचं बाहेरून दिसलं. स्वयंपाकघराजवळ रॉबिनने नंदिनीला सांगितलं कि मी आता निघतोय. नंदिनीने परत एकदा चहा घेण्याविषयी सुचवलं पण त्या आग्रहाला नम्रपणे नकार देऊन रॉबिन वाड्याबाहेर आला. आपल्या दुचाकीजवळ जात तो विचार करू लागला.

देशमुखांशी सकाळी बोलल्याप्रमाणे वाड्याच्या परिसरात खुनाच हत्यार पुरून ठेवल्याच्या खुणा दिसल्या न्हवत्या. पण काही गोष्टी नक्कीच लक्षात घेण्याजोग्या होत्या.

वाड्याच्या डावीकडचा भाग जिथे आबांच्या आणि मालतीताईंच्या खोलीबाहेरील खिडकी होती. तिथे त्या खिडकीमार्गे कोणीही हळूच आतमध्ये जाऊ शकत होतं कारण खिडकीला गज न्हवतेच. न जाणो खुन्याने त्याचं मार्गाने आत जाऊन मालतीबाईवर हल्ला केला असेल. पण तसं असेल तर मालतीताईंनी आरडाओरडा का नाही केला? खून करणारी व्यक्ती मालतीताईंच्या जवळची ओळखीची होती का? मालतीताईंशी बोलताबोलता खिडकीतून त्या व्यक्तीने काहीतरी टोचवलं असेल आणि मागच्या मागे पलायन करून मुख्यदरवाजातून हळूच कोणाला चाहूल न लागता निसटली असेल. वाड्याच दार असंही रात्र होइपर्यंत उघडंच असायचं. तिथूनच एकमेव रस्ता आहे जिथून पलायन करता येईल. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी नक्की त्या व्यक्तीला गुपचुप पळून जाताना पाहिलं असेल. तसं असल्यास आजूबाजूला काही अंतरावर असणाऱ्या घरामध्ये चौकशी करण गरजेचं आहे न जाणो काहीतरी धागा मिळेल आणि खुन्याच्या जवळ जाण्यास उपयुक्त माहिती मिळेल.

अजून एक गोष्ट रॉबिनला खात होती ती आशुतोषच्या खोलीत त्याच्या कपाटाच्या खालच्या भागात कपड्यांमध्ये ठेवलेला दोरखंड ज्याला मधेच गाठी मारलेल्या होत्या. कशाकरिता तो दोरखंड त्याने कपाटात ठेवलेला असेल आणि तो लपवण्याची कोणतीही तसदी त्याने घेतलेली न्हवती. पण तूर्तास त्या दोरखंडाचा विचार बाजूला ठेवून रॉबिनने आसपासच्या घरांमध्ये चौकशी करण्याचं ठरवलं ज्यामुळे खुन्याविषयी काही धागादोरा हाती लागेल.

रॉबिनने दुचाकी चालू केली देसाई वाड्याच्या बाजूला काही अंतरावर जे कोणी लोकं राहत होते तिथे जाऊन लोकांकडे जाऊन त्यांनी खून झालेल्या दिवशी काही पाहिलं का याची चौकशी चालू केली. आसपास राहणारे लोक आपल्या कामाशी काम ठेवणारे होते काही घरे हि वयोवृद्ध जोडप्यांची होती ज्यांची दृष्टी वयोमानानुसार अंधुक झालेली होती त्यामुळे खून झाला त्या दिवशी आसपास कोणाला संशयास्पद हालचाली जाणवल्या नाहीत कि कोणी व्यक्ती दिसली नाही. आपल्या म्हातारपणाचे दिवस घालवत ती लोकं आरामात राहत होती. तिथल्या आसपासच्या सगळ्या भागातल्या घरांमध्ये जाऊन त्याने चौकशी केली या सगळ्यात संध्याकाळ उलटून गेली आणि रात्र पडू लागली. आसपासच्या सगळ्या लोकांकडे चौकशी करून झाल्यामुळे आणी हाती काहीही न लागल्याने रॉबिनने परतीचा रस्ता धरला. दुचाकीवरून परतत असताना काही ठिकाणी थांबून त्याने आसपासच्या दुकानांमध्ये सुद्धा विचारपूस केली पण कोणाला काहीच सांगता आले नाही. आता चांगलाच अंधार पडला होता. रस्त्यावर जास्त वर्दळ न्हवती.

दुचाकीवरून पुढे आल्यावर अचानक रॉबिनला आठवलं कि इथेच जवळ डॉक्टर पाटील याचं घर आहे. एकदा घरी जाऊन त्यांच्याशी बोलावं असं त्याला वाटलं. त्यामुळे थोडं पुढे जाऊन रॉबिनने डॉक्टर पाटलांच्या घराजवळ आपली दुचाकी थांबवली. आसपास अंधार पसरला होता आणि रस्त्यावरचे दिवे खराब असल्यामुळे लागलेले न्हवते. डॉक्टर पाटलांच घर हे एक बैठे घर होतं. त्या बैठ्या घराला चीटकुनच बाजूला पाटील डॉक्टरांचा दवाखाना होता. रॉबिन दुचाकीवरून खाली उतरला. पाटलांच्या घरातले दिवे बंद होते फक्त मागच्या खोलीत एक दिवा लागलेला दिसत होता. रॉबिन चालत चालत पाटलांच्या मुख्य दरवाजाजवळ आला.

रॉबिनने दारावर टकटक केली. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. रॉबिन थोडावेळ शांत उभा राहिला आणि आतमधला कानोसा घेऊ लागला पण त्याला कसलाही आवाज ऐकू आला नाही. आजूबाजूला चांगलाच अंधार पडलेला होता रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. रॉबिनने परत एकदा जोरात दारावर टकटक केलं. थोड्या वेळाने.. कोण आहे...? असा डॉक्टरांचा कातर आवाज आला.

डॉक्टर, मी गुप्तहेर रॉबिन.. दरवाजा उघडारॉबिनने उत्तरं दिलं. त्यावर आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. रॉबिनला जरा आश्चर्य वाटलं कि डॉक्टर पाटील दरवाजा उघडायला वेळ का लावत आहेत. रॉबिन तसाच उभा राहिला. काही वेळाने आतून डॉक्टर पाटलांनी दरवाजा अर्धवट उघडत बाहेर डोकावून पाहिलं. त्यांच्या कपाळावर घामाचे बिंदु जमा झालेले होते.

अ..गुप्तहेर..र..रॉबिन.. एवढ्या रात्री इथे एवढचं कसबस ते बोलले.

त्यांचाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत रॉबिन म्हणालाहो गुप्तहेर आहे म्हणूनच एवढ्या रात्री आलोयत्याच्या या वाक्यावर डॉक्टर पाटलांनी काहीही न बोलता आवंढा गिळला.

आता मला आतमध्ये येऊ देणार आहात कि इथे उभ राहूनच बोलणार आहातरॉबिन शक्य तितकं शांत आवाज ठेवून म्हणाला.

अ..क..काय.. डॉक्टर पाटील रॉबिनच म्हणण काहीच न समजल्यासारख बोलले. पाटलांच्या अशा वागण्यावर मात्र रॉबिन संतापला आणि त्याने हातानेच दरवाजावर जोर देऊन पाटलांना बऱ्यापैकी ढकलतच दरवाजा उघडला आणी घरात प्रवेश केला.

अहो.. अहो.. क..काय करताय असं का आतमध्ये घुसतायपाटील डॉक्टर पडता पडता स्वतःला सावरत म्हणाले आणि दरवाजापासून जरा दूर फेकले गेले. पण त्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत रॉबिनने आतमध्ये प्रवेश मिळवला आणि घराच्या आतल्या भागाचं निरीक्षण करू लागला. हॉलमध्ये रॉबिन उभा होता. तिथे बसायला सोफा, टेबल, खुर्च्या असं सगळं साहित्य होतं. डाव्या भिंतीजवळ एक छोटंसं शेल्फ होतं ज्याला काचेचं दार होतं. त्यामध्ये वर्तमानपत्र आणि काही वैद्यकीय क्षेत्रातील मासिकं होती. डॉक्टर पाटलांच्या घराकडे पाहून ते एक सधन व्यक्ती असल्याचं जाणवत होतं आणि तसंही डॉक्टर असल्याकारणाने तेवढी सुबत्ता असणं साहजिकच होतं.

दार उघडायला एवढा उशीर का केलात डॉक्टर” आजूबाजूला निरीक्षण करणारी आपली नजर न हटवता रॉबिनने पाटलांना प्रश्न केला.

ते...मी.. झोपलो होतो....पाटील थोडंस चाचरत म्हणाले. त्यांची मान खाली होती आणी रॉबिनकडे पाहण्याचं धाडस देखील त्यांना होतं न्हवत.

अच्छा.. घरात तुम्ही एकटेच राहता वाटतरॉबिन जवळच्या शेल्फ जवळ जात म्हणाला.

अ..हो.. मी एकटाच राहतोपाटील उत्तरले. अजूनही त्यांच्या आवाजात म्हणावा तसा जोर न्हवता.

लग्न केलं नाहीये तुम्ही... म्हणजे वय पाहता तुम्हाला एव्हाना मुलं असायला हवी होतीअसं विचारत रॉबिनने काचेच शेल्फच दार हळूच सरकवल आणि आतील मासिक बाहेर काढून एका पाठोपाठ एक मासिक चाळू लागला.

नाही.. लग्नासाठी कधी वेळच नाही मिळाला आणि तसही मला एकट राहायला आवडतपाटील रॉबिन काय पाहतोय तिकडे पाहत म्हणाले. रॉबिन त्याच्या हातातली एक एक मासिक चाळत होता. त्यातील एक मासिक त्याने व्यवस्थित आतमध्ये उघडून पहिले. नामांकित डॉक्टर लोकांचे विविध विषयावरचे लेख आणि प्रबंध त्यामध्ये होते. त्यातले काही प्रबंध आणि लेखांवर रॉबिनने सहज नजर फिरवली.

अरे वाह.. खूपच छान माहिती आहे हिरॉबिनने मुद्दाम वातावरण हलक करण्याचा प्रयत्न केला.

हो.. माझ्या कामासाठी महत्वाचे आहे ते... पण मला एक सांगा एवढ्या रात्री तुम्ही मला भेटायला कशासाठी आलातअसं म्हणत पाटील रॉबिनच्या चेहऱ्याकडे उतावळ्या नजरेने पाहू लागले.

असंच.. सहज वाटलं तुम्हला भेटावं.. तुमचं घर पाहिलं नाही न कधीहातातली मासिकं बाजूला ठेवत रॉबिन पाटलांकडे रोखत म्हणाला. रॉबिनच्या नजरेला नजर देण्याचं धाडस पाटलांमध्ये न्हवत.

बाजूला वळत सोफ्याजवळ जात डॉक्टर पाटील म्हणाले म्हणजे काही विशेष कारण आहे का.. खुन्यासंदर्भात काही धागादोरा हाती लागलाय का तुमच्या?”

तूर्तास तरी काही नाही. काही कळत नाहीये हो डॉक्टर... कसं शोधावं आणि कुठे शोधावं. तो वाडा एकतर एवढ्या लांब. आसपास कोणी काही पाहिलं असल्याचं सांगत नाही कि कसला सुगावा नाही” मुद्दाम त्रागा करत रॉबिन वैताग आल्यासारखी अक्टिंग करत म्हणाला.

ओह्ह..एवढ बोलून पाटील जमिनीकडे पाहत म्हणाले.

मला पाणी द्याल का?” रॉबिनने डॉक्टर पाटील यांना विचारलं.

अ..हो.. आत्ता आणतो” असं म्हणत डॉक्टर पाटील आतमध्ये स्वयंपाक घरात वळले.

रॉबिन सोफ्याजवळच्या टेबलाजवळ असणाऱ्या खुर्चीत येऊन बसला. जरा मागे टेकून बसणार तेवढ्यात त्याला टेबलाच्या पृष्ठभागावर पाण्याचं एक वर्तुळ दिसलं. जणू काही कोणीतरी ग्लास ठेवला असावा. ते पाण्याचं वर्तुळ एकदम ताज असल्यासारखं होतं. त्या पाण्याच्या वर्तुळाला बोटाने स्पर्श करत रॉबिनने ते नक्कीच पाणी आहे कि आणखी कोणता द्रव पदार्थ हे पाहण्यासाठी त्याचा नाकाने वास घेतला. पण ते पाणीच होतं. कोणासाठी पाणी ठेवलं असेल इथे. कि स्वतःच पाटील डॉक्टरांनी पाणी पिऊन ग्लास इथे ठेवला असेल. पण पाटील तर म्हणाले कि मी झोपलो होतो म्हणून म्हणजे मग ते मागे बेडरूममध्ये असतील. मग इथे पाण्यचा ग्लास कोणी ठेवला असेल? रॉबिन विचार करतच होता तेवढ्यात पाटील हातात काचेचा पाण्याचा ग्लास घेऊन आले. त्यांच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन रॉबिनने थोडसं पाणी पिलं आणि टेबलावर तो ग्लास ठेवून दिला. पाटील समोर हात बांधून उभे होते.

तुमचं घर तसं बरंच मोठं आहे पाटीलरॉबिन म्हणाला.

हो, खूप आधी बांधलं होतं आणि माझं क्लिनिक सुद्धा बाजूला असल्याने जवळच घर असलेलं बऱ पडते.पाटील हातांचा चाळा करत उत्तरले.

क्लिनिक घराला लागुनच आहे का तुमचं? तिथे जाण्यासाठी दरवाजा घरातूनच आहे का? रॉबिनने विचारलं.

नाही.. क्लिनिकमध्ये येण्यासाठी पेशंट लोकांसाठी दुसरा दरवाजा आहे बाहेरचा... एक दरवाजा घरात आहे जो क्लिनिकमध्ये जातो. तो मी वापरतोपाटलांनी माहिती दिली आणि खाली पाहू लागले.

आपण घरात आल्यापासून पाटील डॉक्टर असं विचित्र वर्तन करत असल्याचं पाहून रॉबिनचा त्यांच्यावरचा संशय नक्कीच बळावला होता. पण आपल्या चेहऱ्यावर तसं न दाखवता रॉबिन शांतपणे बसून होता. टेबलावर त्याने मगाशी अर्धा पिऊन ठेवलेला ग्लास परत उचलला आणि राहिलेलं पाणी पिऊन टाकलं. टेबलावर त्याच्या ग्लास ठेवण्यामुळे टेबलावर अगदी तसचं ठळक पाण्याचं वर्तुळ तयार झालेलं होतं. जसं त्याने थोड्या वेळापूर्वी टेबलावर दुसऱ्या बाजूला पाहिलं होतं. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकंच स्मित झळकलं.

खरतरं तुमचं सगळं घर पाहण्याचा विचार आहे.रॉबिन खुर्चीवर उठत म्हणाला.

आत्ता.. एवढ्या रात्री... सकाळी या न.. सकाळी पहा....कपाळावरचा घाम पुसत पाटील अजीजीने म्हणाले.

आत्ता काय अडचण आहे” रॉबिनला माहित होतंच कि पाटील नकार देणार तरी नकली आश्चर्य व्यक्त करत त्याने विचारलं.

आत्ता मला झोपं लागलीय आणि उद्या मला लवकर उठायचय. पेशंट येणारेत उद्या बरेचपाटील आळस देण्याचं नाटक करत म्हणाले.

त्यांची हि नाटकं पाहता पाहता रॉबिनच्या एक गोष्ट मात्र लक्षात आलेली होती. डॉक्टर पाटील नक्कीच काहीतरी लपवत आहेत. पाटलांना नक्कीच कोणीतरी भेटायला येणार आहे असं दिसतंय किंवा कोणीतरी पाटील डॉक्टर यांना नुकतंच भेटून गेलंय. त्यामुळेच पाटलांनी त्या व्यक्तीला पाण्याचा ग्लास देऊ केला असेल त्या व्यक्तीने पाणी पिऊन ग्लास टेबलावर ठेवल्याने पाण्याचा ग्लासच्या खुणा उमटल्या होत्या. रॉबिनने शांतपणे आपल्या हनुवटीवर बोट ठेवून काहीतरी विचार केला आणि थोड्या वेळात तो म्हणाला ठीक आहे डॉक्टर आता उशीर झालाय नंतर कधीतरी येईन भेटायलाअसं म्हणून तो झटकन दरवाजाजवळ जाऊ लागला. पाटील लगोलग त्याचा पाठोपाठ आले. बाहेर पडून रॉबिनने पाटलांना निरोप दिला तेव्हा पाटील दरवाजातच उभे होते आणि रॉबिन कधी एकदा जातोय याची वाट पाहत दरवाजा लावण्याचा तयारीत होते.

रॉबिन आपल्या दुचाकीजवळ जात मिश्कील हसत होता. बाहेर खूपच अंधार पडलेला होता. रातकिड्यांची किरकिर पण खूप वाढलेली होती. रॉबिनने दुचाकी चालू केली आणि पाटलांच्या घराकडे नजर टाकली. तेव्हा पाटलांनी नुकतंच दार लावून घेतलेलं त्याला दिसलं. गाडी चालू करून रॉबिनने थोडी पुढे आणली आणि एका गल्लीच्या पुढे आडोशाला उभी केली. रॉबिनला दाट संशय होता कि डॉक्टर पाटील हे काहीतरी लपवतायत त्यामुळे घरातून बाहेर पडून थोडं पुढे येऊन रॉबिनने दुचाकी आडोशाला लावली होती आणि परत पायी डॉक्टर पाटलांच्या घराकडे पाळत ठेवायला चालला होता. पाटील यांना भेटायला नक्कीच कोणीतरी आलेले असावे असं त्याला वाटून गेलं. त्यामुळेच त्यांच्या घरावर पाळत ठेवावी असं त्याला वाटून गेलं. थोड्या वेळातच पाटील डॉक्टरांच्या घरासमोर एका बंद दुकानाच्या बाजूंला असलेल्या झाडींमध्ये रॉबिन उभा राहिला. इथून डॉक्टर पाटलांच घर आणि बाजूचं क्लिनिक स्पष्ट दिसतं होतं. डॉक्टर पाटलांच्या घरात त्याने सहजच भेट दिलेली होती तेव्हा त्याला माहित न्हवत कि कोणीतरी आधीच डॉक्टर पाटलांना भेटायला आलेलं आहे. त्यामुळेच डॉक्टर पाटलांनी लवकर दरवाजा उघडला नाही कारण जी कोणी व्यक्ती आत आलेली होती त्या व्यक्तीला आतमध्ये लपवायला त्यांना वेळ लागला.

डॉक्टर पाटलांचा घाबरा झालेला चेहरा आणि रॉबिन आल्यामुळे उडालेली त्यांची तारांबळ, टेबलावरच्या पाण्याच्या ग्लासच्या ताजा खुणा. जे पाणी पाटलांनी भेटायला आलेल्या व्यक्तीला दिलं असेल त्यामुळे रॉबिनचा डॉक्टर पाटलांवर संशय जास्तच दृढ झाला. आपला संशय खरा आहे कि नाही हे बघण्यासाठीच झाडीमध्ये आपल्याला व्यवस्थित लपवून रॉबिन डोळे उघडे ठेवून पाटलांच्या घराकडे नजर देऊन उभा होता.

रॉबिन पाटलांच्या घरातून निघून जाताच काही वेळाने ती व्यक्ती बाहेर पडेल कारण लगेचच बाहेर जाण्याचा धोका ती व्यक्ती घेणार नाही थोडी जास्त काळोखी रात्र होण्याची वाट पाहिलं असा रॉबिनचा कयास होता. हाताची घडी घालून रॉबिन पाटलांच्या घराकडे पापणी सुद्धा न लवता पाहत होता. कारण ती व्यक्ती कोण आहे हे कळणे खूप गरजेचे होते. अशा प्रकारे गुपचूप येऊन पाटलांना भेटायचे कारण काय असावे? मुख्य म्हणजे मालतीताईंच्या खुनाशी त्या व्यक्तीचा काही संबंध असावा का? या सारख्या प्रश्नाची उत्तरं देखील त्याला मिळणार होती. रात्र अजूनच गडद झालेली होती. रस्त्यावर चिटपाखरूदेखील न्हवत. रातकिड्यांची किरकिर जास्तच वाढलेली होती. दूरवर काही कुत्री जोरजोरात भुंकत होती. डॉक्टर पाटलांच्या घराजवळ अंधार असल्याने जास्त स्पष्ट दिसत न्हवते त्यामुळे घराजवळ जाऊन तिथे उभं राहिल्याने स्पष्ट दिसणार होतं. पण पाटलांच्या घराजवळ लपून पाहता येईल अशी आडोशाची जागा अथवा झाडी न्हवती. तसही लांबून पाटलांचं घर आणि क्लिनिक यांची दोन्ही प्रवेशद्वार इथून दिसतं होती. त्यामुळे इथूनच पाहण्याचा निर्णय रॉबिनने घेतला होता. वाट पाहता पाहता जवळपास अर्ध्या तासाचा काळ लोटला. अजूनही त्या व्यक्तीचा काही पत्ता न्हवता. खरंच ती व्यक्ती आत असेल ना? कि आपला तर्क चुकला आहे असे विचार रॉबिनच्या मनात घोळू लागले. हातावर हात चोळत रॉबिन उभा होता.

एवढ्यात.. त्याची नजर समोर डॉक्टर पाटलांच्या क्लिनिकच्या दरवाजावर गेली. दरवाजातून एक व्यक्ती हळूच बाहेर पडलेली रॉबिनने पहिली. तसं रॉबिन जरासा खाली वाकला म्हणजे आपला तर्क बरोबर होता तर. इतका वेळ ती व्यक्ती पाटलांच्या घरातच क्लिनिकमध्ये लपून बसलेली असावी. रॉबिन झाडीमध्ये लपून श्वास रोखून पाहू लागला. क्लिनिकचा दरवाजा बंद झाला. त्या व्यक्तीने आपल्या अंगाभोवती भोवती मोठी चादर किंवा शाल लपेटलेली होती त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसतं न्हवता आणि लांबून ती व्यक्ती कोण असावी याबाबत अंदाज देखील येत न्हवता. क्लिनिकचा दरवाजा बंद झाल्याक्षणी झटक्यात त्या व्यक्तीने क्लिनिकच्या बाजूने वळून पाटलांच्या घराला वळसा घातला आणि घरच्या मागच्या बाजूला गेली जिथे काळोख होता. ती व्यक्ती तिकडे वळल्याक्षणी रॉबिन चपळाईने पण सावधगिरीने झाडीतून बाहेर आला आणि आडमार्गाने त्या व्यक्तीच्या मागे झपाट्याने जाऊ लागला. इकडे तिकडे पाहत झपाझप पावले टाकत ती व्यक्ती पाटलांच्या घरामागे जाऊन मागच्या रस्त्याने अंधाऱ्या गल्लीतून जाऊ लागली. रॉबिन देखील हळूहळू त्या व्यक्तीचा माग घेत पाठलाग करत पुढे जाऊ लागला. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. पुढे जाऊन एका मोक्याच्या क्षणी झडप घालून त्या व्यक्तीला पकडायचा डाव रॉबिनने आखला.

गल्ली संपून आडमार्गाने जाणाऱ्या रस्त्यावर ती व्यक्ती आली. तो रस्ता त्या व्यक्तीचा सवयीचा असल्याप्रमाणे ती व्यक्ती झपाझप पावले टाकत पुढे जात होती. रॉबिन मात्र दगडधोंड्यांवर आदळत आडमार्गावरील काटेरी झुडूपांमध्ये अडकत कसाबसा वेग राखून चालला होता. पटकन धावत पुढे जाऊन त्या व्यक्तीला जमिनीवर आडवे पडायचा विचार रॉबिनने केला आणि त्या नादातच घात झाला. वेगात पाठलाग करण्याचा नादात एका काटेरी झाडीमध्ये रॉबिनची पँट अडकली. काटेरी झाडांनी त्याची पँट ओढली गेली आणि त्याचा तोल गेला. तोल जाऊन रॉबिन बाजूला एका दगडांच्या राशीवर जाऊन पडणारच होता पण तरी सावध असल्याने दगड चुकवत दोन्ही हात दगडांच्या राशीवर टेकवत हुलकावणी देऊन बाजूला रस्त्याच्या एका उतरंडीला जाऊन पाठीवर आडवा पडला. दगडांवर आपटून होणारा कपाळमोक्ष रॉबिनने चुकवला होता पण त्या नादात दगडांची राशी कलंडली आणी त्यावरचे २ गोलाकार दगड रस्त्याच्या उताराकडे गडगडत गेले. त्याचा आवाज झाला आणि पुढे जाणाऱ्या त्या गूढ व्यक्तीला तो आवाज आला. त्या व्यक्तीने मागे वळून पहिले तर दोन दगड रस्त्यावर गडगडत चाललेले दिसले. रॉबिन रस्त्याच्या बाजूला उताराला जिथे थोडीफार झाडी होती तिथे आडवा पडल्याने आणि अंधार असल्यामुळे त्या व्यक्तीचा नजरेस रॉबिन काही दिसला नाही. पण कोणीतरी आजूबाजूला असणार या भीतीने त्या गूढ व्यक्तीने पळत जाण्यास सुरुवात केली. रॉबिनची पाठ चांगलीच शेकली होती. त्याला पटकन उठता येईना. थोड्यावेळाने कसबस उठत कपडे झटकत त्याने आजूबाजूला पहिले. ती व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेली होती.

शीट.. हातचं सावज असं निसटून गेल्याने त्याला प्रचंड राग आला होता.हाताने पाठ चोळत सामोर पहिले. पुढे दूरवर २-३ लुकलुकते दिवे घरे असलेली त्याला दिसली. त्या भागाकडेच ती व्यक्ती गेल्याचं त्याच्या ध्यानात आलं. लुकलुकणारे ते दिवे हे देसाई वाडा आणि त्याच्या पुढची काही घरे इथले दिसत होते. आता परत पाठलाग करण्यात किंवा पुढे जाण्यात काही अर्थच उरलेला न्हवता. त्यामुळे आपली दुखरी पाठ चोळतच रॉबिन आपल्या दुचाकी लावलेल्या जागेकडे जाण्यासाठी वळला.

क्रमशः



२१ एप्रिल, २०२४

गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - झडती


झडती

दुपारचे बारा वाजत आले होते. इन्स्पेक्टर देशमुख तणतणच रॉबिनच्या घराजवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर ताण आणि राग दोन्ही गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. देसाई खून प्रकरण लवकरात लवकर सोडवावं असं त्यांना वाटत होतं. तसे त्यांना वरिष्ठांकडून स्पष्ट आदेशसुद्धा होते. पण त्यांच्या हाती काही लागतं न्हवत. खुनाच हत्यार पण अजून त्यांच्या हाती लागलेलं न्हवत. तपासाची पुढची दिशा निश्चित होत न्हवती त्यामुळे एका वेगळ्याच तणावाखाली ते होते आणि अशाच अविर्भावात ते रॉबिनच्या घराच्या दरवाजाजवळ येऊन जोरजोराने दरवाजा ठोठावू लागले. दरवाजा उघडायला काही वेळ लागला पण नंतर आतून रॉबिनने दरवाजा उघडला.

अरे काय रॉबिन.. किती वेळ लावलास दरवाजा उघडायलादेशमुख त्रासिक सुरात बोलले. रॉबिनच्या उत्तराची वाटही न पाहता समोरच्या टेबलावर आपली डोक्यावरची पोलिसी टोपी आपटली आणि शेजारच्या खुर्चीत स्वतःला झोकून दिलं. देशमुखांचं हे वर्तन पाहता देशमुख वैतागलेल्या अवस्थेत आहेत हे कळायला रॉबिनला गुप्त्हेरीतल्या कौशल्याची गरज न्हवती.

थोडी झोप घेत होतो देशमुखसाहेब, त्यामुळे दरवाजा उघडायला उशीर झाला.” देशमुखांच्या समोरील रिकाम्या खुर्चीत विसावत रॉबिनने टेबलावरचा लायटर घेतला आणि जवळील सिगारेट काढून शिलगावली.

अरे, हि काय वेळ आहे झोपायची. १२ वाजत आलेत. आपण सध्या किती गुंतागुंतीच प्रकरण सोडवत आहोत त्यावर काम करायचं सोडून तुला झोप कशी लागून शकतेमनगटावरील घड्याळाकडे पाहत अजूनच त्रासिक सुरात देशमुख बोलेल.

काल रात्री कमलाबाईकडे जाण झालं. तिथून माघारी आलो तेव्हा विचार करता करता झोप लागली नाही. मनामध्ये काही दुवे जुळवता जुळवता झोप उशिरा आली म्हणूनच उशिरा जाग आली. पण तुम्ही आज एवढे वैतागलेल का आहातशांतपणे सिगारेटच्या धुराची वलये हवेत सोडत रॉबिन म्हणाला.

रॉबिन एवढे दिवस झाले मालतीताईंच्या खून प्रकरणाला, आपल्या हाती अजून काहीच कसं लागत नाहीये. ना कोणी संशयित ना खुनाच हत्यारदेशमुख त्रासिक सुरात म्हणाले.

काही प्रकरणात धीराने काम करावं लागतं देशमुखसाहेब हे कोणत्याही मुरलेल्या गुन्हेगाराचे काम नाहीये. ज्याची गुन्हेगारी पद्धत गुन्हेगारी विश्वातील लोकांशी मिळतीजुळती असेल. इथे आपली गाठ एका हुशार व्यक्तीशी आहे जिने धीर धरून बरोबर संधी साधून मालतीताईंचा काटा काढलाय. त्यामुळे गुन्हेगाराचा हाच शिरस्ता अवलंबून आपल्याला धीराने काम घ्यावं लागेल. सरतेशेवटी तो आपल्या हाती लागेलच हे नक्की.रॉबिनने सिगरेटची राख टेबलावरील रिकम्या डब्यात झटकत सांगितलं.

बऱ, मला सांग काही नवीन माहिती हाती लागली तुला कमलाबाईच्या घरीदेशमुख शांत होत म्हणाले.

हम्म.. काहीशी नवीन माहिती हाती लागली म्हणू शकता, पण ठोस काही नाही.” रॉबिन हवेत एक झुरका सोडत म्हणाला.

म्हणजे नक्की काय? आणि तुला कोणावर संशय आहे का? कमलाबाईंनी विशेष काय सांगितलं? देशमुख एका मागोमाग एक प्रश्न विचारत गेले.

देशमुख तुम्हाला तुमच्या चौकशीत हे समजलं का कि मालतीताई या आबांच्या दुसऱ्या पत्नी होत्या आणि अविनाश हा आबांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा होता? तो लहान असताना त्याचं संगोपन नीट व्हावं म्हणून आबांनी दुसरं लग्न मालतीताईंशी केलं आणि नंतर मालतीताईंपासुन त्यांना आशुतोष हा दुसरा मुलगा झालारॉबिन शांतपणे म्हणाला.

काय सांगतोस काय आम्हाला हि माहिती न्हवती. चौकशीत कुठे असे प्रश्न विचारलेच गेले नाहीत.देशमुख अतिशय आश्चर्यचकित होऊन म्हणाले.

या माहितीचा आपल्याला कितपत उपयोग होईल माहित नाही पण पोलिसांनी कमलाबाईंची योग्य चौकशी करण आवश्यक होतं. घरात खून घडला असेल तर अशा प्रकरणात घरातल्या नोकरांना घरातल्या माणसांची आणि त्यांच्या स्वभावाची इत्यंभूत माहिती असते. म्हणूनच ती माहिती वेगळ्या पद्धतीने घेणे गरजेचे असते हे तुम्हाला माहिती असेलचरॉबिन सिगारेटची राख झटकत म्हणाला.

हम्म.. कमलाबाईंना आम्ही वाड्यातच प्रश्न विचारले होते. तेव्हा तिने घटनेसंदर्भात माहिती दिली कि ती त्या दिवशी वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीवर नंदिनिसोबत कपडे धुवत बसली होती. कळशी विहिरीत पडली म्हणून कमलाबाई वाड्याच्या आतमध्ये आल्या. तेव्हा मालतीताई जमिनीवर कोसळलेल्या दिसल्या अशी माहिती त्यांनी दिली त्याची खातरजमा पण करून घेतली, कारण इतर सगळ्यांच्या स्टेटमेंटमध्ये एकवाक्यता वाटत होती. मला वाटलं तेवढं पुरेसं आहेदेशमुख हनुवटी खाजवत बोलले.

तेवढ पुरेसं होतंच, पण वाड्यात तुम्ही कमलाबाईंना वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जरी असते तरी तिला उत्तर द्यायला प्रशस्त वाटलं नसतं. म्हणूनच प्रत्यक्ष तिच्या घरी जाऊन भेट घेऊन चौकशी करणे भाग होतं आणि त्यासाठीच मी तिच्या घरी जाऊन आलोएवढं बोलून रॉबिनने सिगरेटचा शेवटचा झुरका घेऊन सिगरेट विझवून डोकं वर करून खुर्चीत बसला.

अच्छा... आम्ही सध्या बाहेर चौकशी करत आहोत, कि मालतीताईंना कोणी राजकीय शत्रू वगैरे होते का जे असे कृत्य करू शकतात.देशमुख सांगू लागले.

पण त्यांना पुढे काही बोलू न देताच रॉबिन डोकं वर करत मधेच म्हणाला

“काही वेळा शत्रू फक्त बाहेरचेच असतात असं नाही ते घराच्या आतमध्ये देखील असू शकतात.

रॉबिनच्या या वक्तव्यावर देशमुख विचारात पडले कि रॉबिन नक्की कोणाबद्दल बोलत असावा.

देशमुखसाहेब मालतीताईंचा सख्खा मुलगा आशुतोषबद्दल काय माहिती काढलीत तुम्हीरॉबिन आता खुर्चीवर ताठ बसत म्हणाला.

आशुतोष हा परदेशात शिक्षणाला जाण्याची तयार करत होता. मालतीताईंचीच तशी इच्छा होती म्हणून मागील वर्षीच त्याने त्यासाठीची तयारी करण्यासाठी शहरातल्या मुख्य भागात क्लास देखील लावला आहे. मालतीताईंचा मृत्यू झाला तेव्हा तेव्हा तो क्लासमध्येच होता. त्याची खातरजमा पण केली.देशमुखांनी माहिती पुरवली.

ओह्ह.. अस्सं आहे तर... परदेशी शिक्षण म्हणजे पैसे पण जास्तच लागत असतील अर्थात देसाई कुटुंबियांना पैशाची चणचण तशी नाहीये पण तरीही एक गोष्ट विशेष आहे. अविनाशच शिक्षण पदवीपर्यंत देखील झालेलं नाहीये पण धाकट्या मुलाला आशुतोष मात्र परदेशात जायला मुभा मिळालीय. इथे एक प्रकारचा भेदभावच झालेला दिसून येत नाही का तुम्हाला.रॉबिनने प्रश्नार्थक मुद्रा करत देशमुखांना विचारलं.

कदाचित अविनाशला शिक्षणात रस नसेल आणि तसंही त्याची फळझाडांची नर्सरी आहे. त्यामुळे धंद्यामध्ये त्याला रस असेल म्हणून त्याने शिक्षण पूर्ण केलं नसेल.देशमुखांनी आपलं मत मांडले.

कि मुद्दाम अविनाशला छोटा मोठा उद्योग काढून दिला आहे आणि धाकट्या मुलाला आशुतोषला उच्चशिक्षण घ्यायला लावलंय. कदाचित कोणतातरी वेगळाच बेत असेल त्यामागे. कदाचित अविनाशला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल पण मालतीताईंनी त्याला ते करू दिलं नाही उलट नर्सरी काढून दिली. त्यामुळे अविनाशला आपल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागल्याचा राग असेलरॉबिनने आपला संशय व्यक्त केला.

तुला नक्की काय म्हणायचंय रॉबिन?” देशमुख गंभीर होत म्हणाले.

दोन्ही भावांना घरात समान वागणूक मिळत होती कि नाही? दोघांमधले संबंध कसे होतेआपल्याला सगळ्या शक्यतांचा विचार करावा लागेलरॉबिन आपले दोन्ही हात डोक्यामागे ठेवत म्हणाला.

तसं बघायला गेलं तर कमलाबाईवर तरी किती विश्वास ठेवायला हवा. कारण मालतीताईंना पहिल्यांदा जमिनीवर पडलेलं त्यांनीच पाहिलं होतं कदाचित कळशी न्यायला वाड्यात आल्यावर त्यांचीच कसल्या तरी हत्याराने मालतीबाई यांचा काटा काढला असेलदेशमुखांनी आपली शंका व्यक्त केली.

कमलाबाई सुद्धा संशयाच्या बाहेर नाहीयेत. पण तुम्ही दिलेल्या या तर्कानुसार डॉक्टर पाटील सुद्धा हि गोष्ट करू शकतात. मालतीताईं यांच्यावरचा त्यांचा राग त्यांनी बागेत जेव्हा त्यांची मी म्हाताऱ्याच्या रुपात भेट घेतली तेव्हाच व्यक्त केला होता. वाड्याच दार हे नेहमीच उघड असतं. संध्याकाळी आबांची तब्बेत तपासण्याच्या बहाण्याने ते आंत आले असतील आणि वाड्यात कोणी नाही हे पाहून मालतीताईंच्या खोलीबाहेर आले. नुकत्याच अंघोळ करून आलेल्या मालतीताई पाटलांना दिसल्या असतील. मग संधीचा फायदा घेऊन बेसावध मालतीताईंना मागून इंजेक्शनला वेगळीच कोणतीतरी विषारी सुई लावून टोचली असेल मग लपून छपून आपल्या क्लिनिकमध्ये पळून गेले असतील. डॉक्टरी पेशात असल्याने विष आणि विश्सदृश पदार्थांबद्दल त्यांना नक्कीच ज्ञान असावे. नंतर लोकांनी बोलावल्यावर तपासण्याच्या बहाण्याने साळसुदपणे वाड्यात आले असतील.रॉबिन आपला तर्क मांडला.

हम्म.. हा तर्क पण चपखल बसतोय. विषसदृश पदार्थ मिळवणे डॉक्टरांना सहज शक्य आहेदेशमुखांनी पुस्ती जोडली.

या तर्कात नक्की कोण बसतंय हे पाहण्याआधी आपल्याला खुनात कोणतं हत्यार वापरलं गेलंय त्या हत्यारबद्दल माहिती मिळणं आवश्यक आहे. उगाचच कोणावरही संशय घेऊन त्या बाजूने तपास करण्यापेक्षा एकदा का खुनाच हत्यार मिळालं कि ते कोण वापरू शकत याचा शोध घेऊन त्या दिशेने तपास करता येईल.रॉबिनने विश्वासाने सांगितलं.

पण हत्यार मिळणार कसे. घटनास्थळी असं कोणतही हत्यार किंवा काही संशयास्पद आढळलं नाही. पोलिसांनी वाड्यातील सगळ्यांच्या खोल्या तपासल्या तरीसुद्धा काहीही सापडलं नाही.देशमुख हताश होत म्हणाले.

सगळीकडे शोधलं असं मला वाटत नाही देशमुखरॉबिन देशमुखांकडे घारीसारखी नजर रोखून म्हणाला.

म्हणजे तुला म्हणायचं काय रॉबिन? पोलिसांनी कुठे शोधायचं राहिलंय आतादेशमुखांनी साशंकतेन विचारलं.

पोलिसांनी वाड्याच्या आसपास पाहिलं का? वाड्याचं कंपाऊंड जिथं आहे तिथून आतपर्यंत ३-४ मीटर रिकामी जागा वाड्याच्या सगळ्या बाजूंनी आहे. कदाचित तिथे आसपास कुठेतरी ते हत्यार पुरून ठेवलेलं असू शकत. जमिनीवर खणलेल्या तशा प्रकारच्या खुणा असू शकतीलरॉबिन बारीक डोळे करत म्हणाला.

ओह्ह्ह... तू म्हणतोस त्या जागा खरंतर तितक्या व्यवस्थितपणे पहिल्या गेल्या नाहीयेत. अगदीच वरवरची पाहणी झाली.देशमुख विचार करत म्हणाले.

तसं असेल तर आजचं वाड्यात जाऊन मी पाहून येतो, बघू हाती काही लागतंय. कारण तिथे आसपास काहीतरी मिळेल असं मला वाटतंयरॉबिन खुर्चीवरून उठत म्हणाला. अंगावरचे कपडे झाडत तो आरशात स्वतःला निरखू लागला.

ठीक आहे रॉबिन, तु तुझ्या पद्धतीने बघ काही मिळतंय का? काही मदत लागली तर सांगदेशमुखसुद्धा खुर्चीवरून उठत म्हणाले.

तुम्ही एक काम कराल का?” भिंतीवरच्या आरशांत हातानेच केसांचा भांग पाडत रॉबिन देशमुखांना म्हणला.

जरूर.. सांग काय हवंय तेदेशमुख म्हणाले.

तुमचा एक खास माणूस आशुतोषच्या मागावर ठेवा. आशुतोषचा क्लास कुठे आहे? क्लास व्यतिरिक्त तो कुठे जातो? त्याचे मित्र कोण आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवारॉबिन म्हणला.

खरंतर आशुतोषच्या मागावर माणूस का ठेवायचा. रॉबिनला त्याच्यावर एवढा संशय का वाटतोय याचा उलगडा देशमुखांना होईना.

जरूर..पण असं करण्यामागे काही विशेष कारण” देशमुखांनी अखेर विचारलेच.

तरुण मुलांचा खरा स्वभाव हा घरातल्या माणसांपेक्षा घरातल्या बाहेरच्यांना जास्त माहित असतो. तेव्हा त्याचाबद्दलची खरी माहिती आपणाला बाहेरूनच मिळू शकतेरॉबिन वळून देशमुखांकडे पाहत म्हणाला.

ते कारण देशमुखांना पटलं. त्यांनी मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं तशी देशमुखांना ड्यूटीवर जाण्याची आठवण झाली. रॉबिन लगेचच आवरून देसाई वाड्यावर जाणार होता. त्यामुळे देशमुखांनी रॉबिनची रजा घेतली आणि काही महत्वाचं कळल्यास तातडीने फोन करण्यास सांगून देशमुख रॉबिनच्या घरातून पोलीस स्टेशनला निघून गेले. देशमुख गेल्यावर रॉबिन अंघोळ वगैरे करून तयार झाला आणि आपल्या दुचाकीवर बसून देसाई वाड्याकडे जाण्यास निघाला.

देसाई वाड्यावर पोहोचल्यावर त्याने आपली दुचाकी वाड्याच्या बाहेरचं एका झाडाखाली लावली. वाड्याच दार उघडच होतं त्यामुळे रॉबिन आतमध्ये आला. वाड्यात शुकशुकाट जाणवत होता. आतमध्ये तुळशी वृन्दावनाजवळ येऊन रॉबिन सगळीकडे नजर फिरवत असतानाच त्याला जिन्याच्या बाजूला पाठमोरी ऊभी असलेली नंदिनी दिसली. नुकतंच विहिरीवर धुणं धुवून ती आली होती आणि बादलीतले कपडे पिळत व्हरंड्यातल्या दोरीवर कपडे सुकायला टाकत होती. तिला पाहताच रॉबिन जागीच उभा राहिला. नंदिनीला मागे रॉबिन आल्याचं कळाल नाही. ती आपल्याच कामात गर्क होती. रॉबिनला आपल्या उपस्थितीची कल्पना तिला कशी द्यावी कळेना. नंदिनीची पाठमोरी मूर्ती न्याहाळत रॉबिन तसाच उभा होता. नंदिनीने आपला पदर कमरेला खोचला होता त्यामुळे तिचा कमनीय देह दिसून येत होता. ओले कपडे झटकताना शरीराच्या हालचालींमुळे तिच्या केसांच्या बटा अलगदपणे तिच्या गालावर रेंगाळत होत्या त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. रॉबिन तसं तिला मागून नुस्त पाहत बसणं प्रशस्त वाटेना त्यामुळे तो जरासा खाकरला.

त्यासरशी नंदिनीची मान झटकन मागे वळली. रॉबिनकडे पाहताच ती कावरीबावरी झाली. कारण रॉबिन मागे उभा होता याची तिला कल्पनाच न्हवती. हातातली कपड्याची वळकटी तिने खाली ठेवली आणि कमरेचा पदर सोडून तिने तो डोक्यावर कसाबसा धरला. चेहऱ्यावरच्या बटा हाताने कानामागे खोचल्या. नंदिनीने कपळावर लावलेली एक नाजुकशी टिकली तिच्या सौंदर्यात जास्तच भर टाकत होती.

क..कधी आलात तुम्ही.. माफ करा मला समजलंच नाही तुम्ही आलेलं” नजर खाली करत कावऱ्याबावऱ्या अवस्थेत नंदिनी बोलली. तिचा आवाज खूपच नाजूक आणि गोड होता.

मी आत्ताच आलो...वाड्याच दार उघड होतं म्हणून सरळ आत आलो...माफ करा माझ्या अचानक येण्याने तुम्ही दचकलातरॉबिन सुद्धा मधाळ आवाजात बोलला.

नाही माझंच लक्ष न्हवत आणि वाड्याच दार पण उघडच असत. त्यामुळे आवाज दिल्याशिवाय कोण आलंय हे कळत नाहीनजर जमिनीकडे ठेवूनच नंदिनी म्हणाली.

काही नाही त्या दिवशी मी रात्री अवेळी वाड्यात आलो होतो त्यामुळे वाडा नीट पाहता आला नाही. त्यामुळे म्हटलं दिवसाउजेडी वाडा नीट पाहावाइकडे तिकडे नजर फिरवत रॉबिन म्हणाला.

अच्छा..थांबा मी पाणी आणते आणि चहा टाकते तुमचासाठीलगबगीने स्वयंपाकघराकडे वळत नंदिनी म्हणाली.

नाही नाही.. त्याची काहीही आवश्यकता नाहीये.. मी फक्त वाडा पाहायला आलोय तुम्ही उगाच तसदी घेऊ नका. तुम्ही तुमची कामं करा माझ्यामुळे व्यत्यय नको त्यातपुढे जाणाऱ्या नंदिनीला रोखत रॉबिन म्हणाला.

अहो व्यत्यय कसला.. घरात आलेल्यांना चहा पाणी करण या घराची पद्धतच आहेनंदिनी म्हणाली.

नाही नको... अशा औपचारिकतेची गरज नाहीये आणि तसही माझं चहापाणी झालंय. त्यामुळे खरंच तसदी घेऊ नकारॉबिन अतिशय सौम्य शब्दात म्हणाला. रॉबिनचा ठाम नकार ऐकून मग नंदिनीने जास्त आग्रह केला नाही.

बंर वाड्यात कोणकोण आहे आत्तारॉबिनने विचारलं.

मी आणि आशुतोष भावोजी आहेत. बाकी कोणी नाहीनंदिनीने माहिती पुरवली.

ओके, अविनाश आणि आबा कुठे आहेत. कमलाबाई आलेल्या नाहीत का आज कामालारॉबिनने प्रश्न केला.

आबांना घेऊन आमचे हे नर्सरीवर गेले आहेत्त. तिथे कामं पण आहेत आणि आबांना पण सहज बदल म्हणून नेलंय. कमलाबाई जरा उशिरा येतीलनंदिनी म्हणाली.

आबांची तुम्ही दोघं खूप काळजी घेता खरोखरंच असा मुलगा आणि सून मिळाल्याने ते स्वतःला भाग्यवानच समजत असतीलरॉबिन स्मित करत म्हणाला.

अहो ते तर कर्तव्यच आहे आमचं. आमच्या ह्यांचे वडील ते माझेच वडील असं मानून त्यांची काळजी आम्ही नेहमीच आनंदाने घेतो. आबांची स्मृती जाण्याआधी आबा आमच्या दोघांनाहि खूप जीव लावायचे. खूप मजा मस्ती करायचे आम्हा दोघांसोबत. मला कधीही ते माझे सासरे आहेत असं वाटलं नाही. मला तर पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळायचे. त्यांना वाचनाची आणि भटकंतीची खूप आवड होती बऱ्याच ठिकाणी ते फिरून आले होते. वाचनाची आवड मला त्यांच्यामुळेच लागली. पण जसा त्यांचा अपघात झाला तसं ते सगळ्या गोष्टी विसरले. आम्हाला देखील ओळखेनासे झालेनंदिनीचे डोळे पाणावले आणि निराश होतं जमिनीकडे पाहून अश्रू ढाळू लागली.

नंदिनीला निराश झालेलं पाहून तिला जास्त काही विचारायला नको असं रॉबिनला वाटलं.

ठीक आहे मी जरा वाड्यातील खोल्या पाहतो तुमच्या कामात अजून व्यत्यय आणत नाही” असं म्हणत रॉबिनने विषय बदलला.

नंदिनी देखील काही लागल्यास ती स्वयंपाकघरात आहे असं साश्रुनयनांनी सांगून निघून गेली. नंदिनी निघून गेल्यावर रॉबिनने एकवार खालच्या सगळ्या खोल्यांकडे नजर फिरवली आणि त्याची नजर मालतीताईंच्या खोलीकडे गेली. मागच्या वेळी ती खोली पहिल्याने रॉबिनला आता परत तिथे जाण्याची जास्त आवश्यकता वाटली नाही. त्यामुळे त्याच्या शेजारील आबांच्या खोलीकडे त्याने मोर्चा वळवला. पुढे जात दरवाजा उघडून रॉबिनने आबांच्या खोलीत प्रवेश केला. आबांचा बेड व्यवस्थित लावलेला होता. आजूबाजूला जास्त समान न्हवत. समोरच्या भिंतीवर एक खिडकी होती. ती रॉबिनने जवळ जाऊन उघडली. खिडकीला गज न्हवतेच. बाहेर चांगलंच कडक ऊन पडलेलं होतं.

रॉबिनने खिडकीच्या बाहेरच्या बाजूला जमिनीवर नजर फिरवली. आसपास खुरटी गवत आणि सदाफुलीची झाडं उगवलेली होती. जमिनीवर जास्त माती दिसत न्हवती. उलट जमीन जास्तच टणक दिसत होती. जरावेळ आसपास नजर फिरवून रॉबिनने खिडकी लावून टाकली. आबांच्या खाटेच्या बाजूला एक कपाट होतं ते जवळ जाऊन रॉबिनने उघडलं. आतमध्ये आबांचे ३-४ सदरे, पायजमे आणि काही चादरी सोडल्यास इतर काहीही गोष्टी न्हवत्या म्हणून रॉबिनने कपाट लावून टाकलं. बेडच्या खाली पाहावं म्हणून रॉबिन जमिनीवर ओणवा झाला आणि बेडच्या खाली पाहू लागला बेडच्या आतमध्ये त्याला आबांच्या बुटाचा एक राखीव जोड दिसला. तो बूट त्याने बाहेर काढला. बूट तसा जुनाट वाटत होता आणि पुढच्या भागात चौड्याकडे तो जरासा घासला गेला होता. नेहमीच्या वापरात असावा अशी चिन्हं त्यावर होती. बूट परत तसाच ठेवून रॉबिन मागे असलेल्या टेबलाकडे वळला.

खिडकीच्या बाजूला असलेल्या टेबलावर आबांच्या गोळ्या आणि औषधं होती. मागच्या वेळी आलो तेव्हा इथे पुस्तकं ठेवलेली होती असं त्याला आठवलं. त्या टेबलाच्या खाली एक बंद कप्पा होता. रॉबिनने तो कप्पा उघडला तिथे आतमध्ये १०-१२ पुस्तकांचा ढीग रचलेला होता. आबांना पुस्तकं वाचायची आवड होती त्यामुळे एवढी पुस्तकं त्यांच्या खोलीत असणं साहजिक होतं. पुस्तके बाहेर काढून त्यांच्या शीर्षकावरून तो नजर फिरवू लागला. काही कथा कादंबऱ्या होत्या तर काही पुस्तकं हि प्रवासवर्णनांवर आधारित होती. डोंगर दऱ्यामधील भटकंती आणि जंगल प्रवासातील सुरस अनुभव यावर आधारलेली ती पुस्तकं होती. त्यातली काही पुस्तकं रॉबिनने आपल्या हातात घेतली आणि ती घेऊन जाण्याचा विचार त्याने केला. पुस्तके कशी न्यावी असा विचार करत असतानाच त्याला टेबलाजवळ काही कापडी पिशव्या पडलेल्या दिसल्या. त्यातल्याच एका रिकाम्या पिशवीत त्याने ती पुस्तके टाकली आणि तो खोलीबाहेर आला. नंदिनी स्वयंपाक घरातच होती. तिच्या नजरेत न येता रॉबिन हळूच वाड्याच्या दरवाजाजवळ आला आणि ती पुस्तकांची पिशवी गाडीच्या हँडलला लावली. ही पुस्तके त्याला गुपचूप न्यायची होती. पिशवी अडकवून तो परत वाड्याच्या आतमध्ये आला.

पण वाड्याच्या दरवाजातून आतमध्ये न जाता त्याने आता दरवाजाच्या डाव्या बाजूने आतुन कंपाउंडजवळून चालायला सुरुवात केली. डावीकडे कंपाऊंडची भिंत आणि उजवीकडे वाड्याच्या खोल्यांचा भिंती यांच्या मधल्या भागातून तो हळुवार चालत होता. जमीनीच व्यवस्थित निरीक्षण करत कुठे काही सुगावा लागतोय का हे पाहतच तो चालला होता. पुढचा स्वयंपाकघरच्या बाहेरचा भाग ओलांडून तो वाड्याच्या डाव्या भागाकडे आला. हा भाग आबांच्या आणि मालतीताईंच्या खोलीबाहेरचा होता. चालत चालत तो मगाशी आबांच्या खोलीची खिडकी उघडी होती त्या खिडकी खाली आला. बारकाईने तो तिथल्या अजुबाजुच्या परिसराच निरीक्षण करून लागला.

खिडकी रॉबिनच्या हाताला लागेल एवढ्याच उंचीवर होती. खिडकीच्या खाली भिंतीवर जरा व्यवस्थित पाहिल्यावर दिसलं कि तिथला भिंतीवरचा रंग काहीतरी घासल्यामुळे उडालेला होता. खिडकीच्या खाली जमिनीवर खाली उगवलेल्या खुरट्या गवतांच तो बारकाईने निरीक्षण करू लागला. तिथली जमीन हि टणक स्वरुपाची होती त्यामुळे तिथे कसल्याही खणल्याचा किंवा इतर खुणा न्हव्त्या. पण जमिनीपासून एका फुटावर भिंतीवर मातीचे डाग पडलेले होते ते पाहून रॉबिन थोडासा विचारात पडला, नंतर आजूबाजूला ३-४ सदाफुलीच्या झाडांच्या गर्दीमध्ये त्याने हात टाकून तिथली जमीन पण व्यवस्थित तपासली. न जाणो तिथे काहीतरी असेल म्हणून, पण काहीच संशयास्पद आढळलं नाही. ओठावर ओठ दाबून तो काहीतरी विचार करत तो पुढे चालू लागला. आता रॉबिन मालतीताईंच्या खोलीबाहेरील खिडकीजवळ आला तिथे आसपास जास्त झाडी न्हवती. नाही म्हणायला वाळलेली खुरटी गवत होती. हि खिडकी सुद्धा हाताला येईल एवढ्या उंचीवर होती. पण खिडकीखालचा भिंतीवरचा रंग मात्र जसा आहे तसाच होता. तिथे कसल्याही खाणाखुणा न्हव्त्या. खालची जमीन सुद्धा टणक होती आणि कसल्याही खुणा न्हवत्या. रॉबिनने खिशातून आपली डायरी बाहेर काढली आणि सगळ्या गोष्टींच्या पटापट नोंदी घेऊ लागला. तिथून पुढे चालत रॉबिन आता वाड्याच्या मागील बाजूस आला.

वाड्याच्या मागील भागात २ मोठी प्राजक्ताची झाडे होती आणि एका कोपऱ्यात रहाट असलेली विहीर. वाड्याच्या मागून विहिरीपासून जवळच वाड्याच्या आतल्या भागात जाण्यासाठी एक चिंचोळा रस्ता होता त्याचं मार्गाने कमलाबाई त्या दिवशी विहिरीत रहाटाला लावलेली कळशी पडल्यावर दुसरी कळशी आणायला आत गेली होती. प्राजक्ताच्या झाडाखाली प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. तिथे जाऊन रॉबिनने पायानेच जमीन चापचून पहिली. आजूबाजूला झाडाचा पालापाचोळा सुद्धा बराच पडलेला होता. जवळ जाऊन पाने बाजूला करत त्याने तिथला भाग न्याहाळला. जमीन थोडीशी नरम आणि ओलसर होती. कदाचित वाड्यातील मंडळी पाण्याने इथे प्राजक्ताच्या झाडाच्या आसपास सडा मारत असावेत. मग तिथून तो पुढे समोरच्या विहिरीजवळ आला. विहिरीत त्याने डोकावून पाहिलं तर विहिरीला चांगलंच पाणी होतं तसच पाणी इतकं स्वच्छ दिसतं होतं कि विहिरीचा तळसुद्धा स्पष्ट दिसतं होता. रॉबिनने विहिरीत डोकावून पहिले आणि जरा डोळे बारीक करून निरीक्षण केल्यावर तळाशी एक पितळेची कळशी दिसली. कमलाबाई आणि नंदिनी कपडे धुत असताना ती कळशी पडलेली हे कमलाबाईने सांगितल्याच रॉबिनला आठवलं. मालतीताईंच्या मृत्यू प्रकरणानंतर ती कळशी बाहेर काढायचं कोणाच्या लक्षात आलं नसेल. विहीर पाहून झाल्यानंतर रॉबिन आता वाड्याच्या उजवीकडच्या भागात आला जिथे अडगळीच सामन ठेवायच्या खोल्या होत्या. पुढे आल्यावर गेस्टरूमची बाहेरची खिडकी होती. या भागात बरीच छोटी छोटी झुडुपे होती. रॉबिन तिथल्या भिंतीच्या जवळची जमीन चापचू लागला.

तेवढ्यात.. गेस्ट रुमच्या खिडकीखालील जमीन न्याहाळताना त्याला एक छोट्या गवताच्या झुडुपात अडकलेलं सिगारेटच थोटूक दिसलं. रॉबिनने ते थोटूक हातात घेतलं आणि नाकाने जळालेल्या भागाचा वास घेतला. जळलेल्या त्या थोटकाच्या वासावरून एक गोष्ट त्याला समजली कि हि सिगारेट १-२ दिवस जुनी आहे कारण आतील तंबाखुचा दर्प तितका कडक वाटत न्हवता आणि थोटूक सुद्धा कमी सादाळलेलं होतं. कदाचित गेस्टरूममध्ये कोणीतरी आलेलं असावं ज्याने सिगारेट पिऊन थोटूक बाहेर फेकलं असेल असं वाटून त्याने त्याने थोटूक बाजूला फेकून दिलं. तिथून पुढची आसपासची जागा व्यवस्थित पाहत रॉबिन वाड्याच्या पुढच्या भागाकडे आला. त्याने संपूर्ण वाड्याला प्रदक्षिणा मारली होती या उद्देशाने कि वाड्याच्या आसपास काहीतरी पुरावा आढळेल, कुठेतरी काहीतरी लपवलं असेल.

पण तसं काहीच आढळलं नाही. वाड्याच्या मुख्यदाराजवळ येऊन त्याने तिथली जमीन सुद्धा नीट पहिली पण संशयास्पद असं काहीच आढळलं नाही. काहीच हाताशी आला न्हवत त्यामुळे रॉबिन तिथेच विचारात उभा होता. नंतर त्याच्या लक्षात आलं कि नंदिनीने मगाशी सांगितलं होतं कि आशुतोष वाड्यातच आहे आणि आता वाड्यात आलोच आहोत तर त्याचीपण भेट घ्यावी असं त्याला वाटलं. रॉबिन खालच्या जिन्यावरून वरच्या मजल्यावर आला जिथे आशुतोषची खोली होती.

जिन्याच्या विरुद्ध बाजूला अविनाशच्या नर्सरीच्या सामान ठेवण्याच्या आणि अडगळीच्या खोल्या होत्या. ज्या त्याने आधीच पाहिलेल्या होत्या. जिन्याच्या पुढे अविनाश आणि नंदिनीची झोपायची खोली होती. तिथे एक धावता कटाक्ष टाकून मग पुढे असलेल्या आशुतोषच्या खोलीकडे जावं असा विचार करत त्याने अविनाश आणि नंदिनीच्या झोपायच्या खोलीची कडी उघडून आत प्रवेश केला. या दाम्पत्याची खोली छान सजवल्यासारखी दिसत होती. भिंतीवर विविध प्रकारची निसर्गचित्रांच्या पेंटीग्स, टेबलावर छानसा टेबलक्लॉथ आणि त्यावर फ्लावरपॉट. मध्यभागी मोठा बेड आणि त्याच्या बाजूला एक मोठं कपाट. रॉबिनने कपाट आणि खोलीचे कोपरे व्यवस्थित चेक केले. काही विशेष सापडलं नाही. सगळं काही नॉर्मल दिसतं होतं. त्यामुळे रॉबिन त्या खोलीतून बाहेर पडला आणि दरवाजाला कडी लावून पुढे आला. अडगळीच समान ठेवलेली खोली ओलांडून तो आशुतोषच्या खोलीजवळ आला. दरवाजापुढे उभं राहून थोडं थांबून त्याने दारावर टकटक केली.

वहिनी मला भूक नाहीये तुम्ही जेवून घ्याआतून आशुतोषचा आवाज आला. नंदिनी जेवायला बोलवत असेल असं वाटून त्याने आतून आवाज दिला होता म्हणून थोडंसं थांबून रॉबिन बोलला

आशुतोष मी रॉबिन.. दरवाजा उघडशील का..? तुझाशी थोडं बोलायचं होतं

रॉबिनने आवाज दिल्यावर आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. थोड्या वेळाने रॉबिनने परत हाक मारली.

आशुतोष दरवाजा उघडशील का?

काही क्षण शांततेत गेले आणि थोड्या वेळाने दरवाजा अर्धवट उघडला गेला. आतून चष्मा घातलेल आणि कपाळावर आठ्यांच जाळ असलेलं आशुतोषच डोकं दिसलं.

काय हवंय तुम्हालाआशुतोषने आतूनच तसाच अर्धवट दरवाजा ठेवून विचारलं.

मला आत येऊ देशील का? तुझ्या आईच्या खुनासंदर्भातच तपास करायला मी आलोय. तेव्हा दरवाजा उघड आणि मला आत येऊ देतरॉबिन जरा कडक आवाजात म्हणाला. रॉबिनचा तसा कडक स्वर ऐकून आशुतोष थोडासा टरकला आणि त्याने दरवाजा उघडून रॉबिनला आतमध्ये घेतलं. आत आल्यासरशी रॉबिनची नजर घारीसारखी सगळ्या रूमभर फिरू लागली. आशुतोषच्या खोलीत सामान बरेच होते आणि खोली अजगळासारखी अस्तव्यस्त होती.

कपड्याचे जोड जमिनीवर पडलेले, कॉलेजची सॅक कोपऱ्यात अर्धवट उघडी पडलेली, भिंतीवर कोणत्यातरी म्युसिकल बँडचे पोस्टर, एका कोपऱ्यात कागदांची रद्दी आणि त्यांना बांधायचा सुतळ्याजवळच अभ्यासाला लागतात तसे प्रश्नसंचाचे गठ्ठे पडलेले होते. चहूकडे पाहत हाताची घडी मागे बांधून रॉबिन पाहत होता.

अरेरे.. काय रे तुझ्या खोलीची अवस्था कमलाबाई तुझी खोली झाडत नाही कि काय? आजूबाजूला पाहत रॉबिन समोरच्या खिडकीजवळ आला.

नाही.. तसं नाही काही.. मीच माझ्या रुममध्ये कोणाला येऊ देत नाहीआशुतोष मान खाली घालून खालच्या सुरात म्हनाला.

ओह्ह... असं काय दडवुन ठेवलयस तू इथे कि कोणाला आतमध्ये येऊ देत नाहीसरॉबिन इकडे तिकडे पाहत बोलला.

त..तसं काही नाही..मला एकट राहायला आवडत. फक्त कधी मधी मी दादा आणि वहिनींसोबत गप्पा मारत असतो ते पण खाली जाऊनआशुतोष शांत स्वरात म्हणाला.

दादा आणि वहिनींसोबत जास्त जमत वाटत तुझं.. असो सध्या काय करत असतोस तु.. म्हणजे काय शिकतोस? रॉबिनने विचारलं.

मी सध्या परदेशात शिकायला जाण्याची तयारी करतोयआशुतोषने सावकाशपणे उत्तरं दिलं.

हम्म...काय वाटत तुला आशुतोष. तुझ्या आईची अशी हत्या कोणी केली असेलमुद्दाम त्याला राग येईल अशा भाषेत रॉबिन म्हणाला.

म..मला नाही माहितखाली मान घालून बाजूच्या खुर्चीवर बसत कोऱ्या चेहऱ्याने आशुतोष म्हणाला.

आशुतोषच्या खोलीला एकच खिडकी होती. गज नसलेली ती खिडकी रॉबिनने उघड्ली आणि तिथेच उभा राहिला.

अच्छा.. तुझा दादा सोबत कशी वागायची तुझी आई. कारण अविनाश तुझा सावत्र भाऊ आहे नाखिडकीच्या चौकटीवर हात ठेवून अगदीच स्पष्ट बोलत आणि नजरेच्या कोपऱ्यातून आशुतोषचे हावभाव पारखत रॉबिन म्हणाला.

या वाक्यावर आशुतोषने जरा चळवळ केली. काहीही न बोलता हाताची बोट एकमेकांवर घासत तो जमिनीकडे पाहू लागला.

त्रास द्यायची का तुझी आई अविनाशलारॉबिन अजूनच स्पष्ट बोलला.

माझी आई खूप कडक स्वभावाची होती. सगळ्यांशीच ती कडकपणे वागायची.आशुतोषने सांगितलं.

तुझ्यासोबत पण असंच कडकपणे वागायची का तुझी आईरॉबिन थोडंसं पुढे झुकत म्हणाला.

नाही.. तितकं नाही आशुतोष चाचरत म्हणाला आणि त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली.

यापुढे रॉबिनने आशुतोषला काही प्रश्न विचारले नाही. खोलीमधल्या कपाटाजवळ जात रॉबिनने कपाटाचा दरवाजा उघडला. आतमधले कपडे खोलीमधल्या कपड्यासारखेच असत्याव्यस्त पडलेले होते. २-३ कप्पे होते आणि काही बॉक्सेस होते ज्यात औषधं आणि बँडेज होतं. कपाटाच्या तळातल्या कप्प्यात रॉबिनला एक दोरखंड दिसला. त्याला मधेच गाठीगाठी बांधलेल्या होत्या. रॉबिनने काहीही न बोलता उभा राहुनच तो दोरखंड न्याहाळला. दोरखंड थोडासा जाड असून लांब होता. आतील कपडे इकडे तिकडे करत रॉबिनने तो दोरखंड नीट न्याहाळला पण आशुतोषला याबद्दल काही विचारलं नाही. आशुतोष रॉबिनच्या हालचाली बघत तसाच खुर्चीवर कपाळावर आठ्या पाडून बसला होता. रॉबिनने आपल्या डायरीत काही नोंदी घेतल्या आणि कपाटाच दार लावून खोलीच्या खिडकीजवळ आला. त्याने खिडकीच्या बाहेर वरून खाली पाहिलं. या खिडकीपासून खालची जमीन बऱ्यापैकी उंचावर होती. खिडकीच्या चौकटीला पाहत रॉबिनने थोडंस बाहेरच्या बाजूला झुकत बाहेरच्या भिंतींवर नजर टाकली. खिडकीच्या बाहेरच्या बाजूला भिंतीच्या एका भागावर काळसर डाग पडलेले त्याला दिसले.

रॉबिनने आपलं डोकं अजून थोडसं बाहेर काढलं आणि ते डाग बघण्याचा प्रयत्न करू लागला अर्थात हे आशुतोषच्या लक्षात न येता. कशाचे काळसर डाग असावेत ते असं वाटून रॉबिनने पुढे झुकत जरा बारकाईने पाहिल्यावर अचानक रॉबिनची ट्यूब पेटली.

ओहो.. असं आहे तर... ते काळसर डाग कशाचे असावेत याचा अंदाज रॉबिनला आला होता.

क्रमशः


"द हार्टफुलनेस वे"

"द हार्टफुलनेस वे" या सुरेख पुस्तकाचा लाभ सगळ्यांनी करावा एवढं सुंदर पुस्तकं आहे ते, कमलेश डी. पटेल (दाजी) हे या पुस्तकाचे लेखक आध...