मध्यंतरी माझा वाचनात आलेली एक खूपच मार्मिक कथा इथे देत आहे,
हि एक कथा दर्शविते की आपण केवळ अमर्याद करुणेच्या बोधिचित्त दृष्टिकोनातून आपले कार्मिक ओझे हलके आणी स्वच्छ करू शकता. आत्मकेंद्रिततेकडे आपल्या कर्माच्या आणि सवयीच्या प्रवृत्तीला जे काही बदलते ते आपल्या नजरेतून अस्पष्टता काढून टाकते. सवयी बदलण्यासाठी, नवीन मार्ग तयार करण्यासाठी आणि जुने विरघळण्यासाठी खूप पुनरावृत्ती करावी लागते. बोधिचित्ताचे प्रशिक्षण आपल्याला वास्तव पाहण्यास आणि आपल्या सभोवतालच्या लोकांशी अधिक जोडलेल्या आणि दयाळू स्थितीत जगण्यास मदत करते.
फार पूर्वी, प्राचीन भारतात, असांगा नावाच्या एका साधकाचे एक ध्येय होते कि भविष्यातील होणारे बुद्ध जे कि मैत्रेय बुद्ध होते त्यांना पाहणे, त्यांच्याकडून साधनेतील सूचना मिळवण्याचे नियोजन करणे. त्यानुसार कुक्कुटापाडावरील एका गुहेत असांगाने मैत्रेय बुद्धांच्या ध्यान पद्धतींचा सराव सुरू केला, त्या डोंगर भागातील परिसरात असांगाने आपले सर्व जागरण तास, प्रत्येक दिवस, मैत्रेयच्या मंत्राचे पठण करण्यात, त्याचे दर्शन करण्यात, त्याला अर्पण करण्यात घालवले.
असे जवळपास सहा वर्षे त्याने साधना केली. तरीसुद्धा असांगाला साध स्वप्नातही मैत्रेय बुद्धांचं दर्शन झालं नाही. किंवा कोणत्याही प्रकारचे चिन्ह अथवा संकेत दिसला नाही. अगदी काहीही नाही हे पाहून तो निराश झाला आणि त्याने हार मानली आणी डोंगर उतरून परत आपल्या घराकडे जाण्यास निघाला. त्याने त्याच्या माघारीसाठी समारोपाचे विधी पूर्ण केल्यानंतर, आपल्या वस्तू बांधल्या आणि निराशेने रस्त्यावरून परतीच्या रस्त्यावरचालू लागला. रस्तोत्यातच असांगला एक माणूस दिसला, जो एका मोठ्या लोखंडी खांबाला मऊ कापडाने घासत होता.
"तू काय करतोयस मित्रा?" असांगाने विचारलं.
त्या माणसाने चमकून वर पाहिलं आणी असांगाकडे पाहत म्हणाला. "मला सुईची गरज आहे, म्हणून मी या खांबाला सुई बनवण्यासाठी घासत आहे."
“हम्म्म,” असं म्हणून असांगा विचारात पडला.
फक्त एका मऊ कापडाने लोखंडाचा खांब घासून त्यापासून सुई बनवणे शक्य आहे काय? आणी जर शक्यच असल्यास या खांबापासून सुई बनायला शेकडो वर्षे लागतील. त्या माणसाच्या अट्टाहासावर कीव करत असांगा पुढे जाणार इतक्यात त्याच्या मनात विचार आला. या माणसाला हे काम करण्यासाठी शतक लागेल. तरीही तो धीर धरतो आहे आणी इथे मी जो एक चांगला अभ्यासक आहे. ज्याने फक्त सहा वर्षांनी हार पत्करून माझे मैत्उरेय बुद्धांना पाहण्त्तयाचे उदात्त ध्येय सोडले आहे. खचितच माझे ध्येय सुईपेक्षा जास्त महत्त्वाचे आणि फायदेशीर आहे. असांगला स्वतःच्याच कृत्याची लाज वाटली की त्याला चिकाटीचा अर्थ माहित नाही. तो परत मागे वळला आणी डोंगराकडे गुहेत साधना करण्यास चालू लागला.
आणखी तीन वर्षे असांगा मैत्रेयांची अखंड साधना करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. तरीसुद्धा मैत्रेयांचे काहीहि चिन्ह दिसले नाही.पण यावेळी मात्र तो सकारात्मक होता की कोणत्याही परिस्थितीत बुद्ध मैत्रेयांची साधना पूर्ण करायची. दुर्दैवाने काही दिवस सरल्यानंतर मात्र असांगाचा धीर सुटला. त्याला वाटू लागले कि तो आपले आयुष्य वाया घालवत आहे, आपल्याने काहीही साध्य होत नाही. पुन्हा त्याने माघार घेतली. आपलं सामान बांधलं. ली आणि परतीच्या वाटेवर चालू लागला.
परतीच्या मार्गावर असताना असांगाला एक व्यक्ती दिसला. जो एका उंच खडकाच्या पायथ्याशी उभा होता.जवळ जाऊन पाहिलं तर दिसलं कि तो माणूस पाण्यात एक पक्षाचा पंख पाण्यात बुडवून खडकावर घासत होता.
"तुम्ही इथे काय करण्याचा प्रयत्न करत आहात?" असांगाने जरा गोंधळूनच विचारलं.
"हा खडक माझ्या घरासमोर आहे आणी त्यामुळे माझा घरात सूर्याचा प्रकाश येत नाहीये. त्यामुळे मी माझ्या हातातील पंखाने हा खडक घासून कमी करत आहे" त्या माणसाने स्पष्ट केले
असांगाच्या मनात लगेचच तीन वर्षांपूर्वीच्या विचारांचा विचार झाला. आपण किती लवकर हार मानतो असं त्याला वाटून गेलं आणि तो पुन्हा नव्या जोमाने सराव करण्यासाठी डोंगराकडे निघाला.
परत असांगाने तीन वर्ष साधना केली. तीन वर्षे झाली परत एकदा त्याच्या हाती निराशा आली, कोणताही आशेचा किरण दिसला नाही किंवा काहीही वेगळे घडले नाही.
"परत तेच घडत आहे!" असांगा हताश होऊन उद्गगरला.
"मी काहीही करत असलो तरी, मला असं दिसतंय कि मी जरी हे दहा लाख वर्षे साधना केली तरीही मला काही मैत्रेयांच दर्शन होणार नाही" निराशेच्या सागरात बुडून त्याने सामान बांधले आणि तो डोंगर उतरून घराकडे जाण्यास निघून गेला. यावेळी मार्तोगात घडणाऱ्या कोणत्याही विचित्र गोष्टी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींकडे लक्ष न देता मान खाली घालून असांगा चालत राहिला.
अचानक असांगाला रस्त्यामध्ये एक कुत्रा दिसला ज्याचे मागचे दोन्हीही पायअपंग होते, आणी अत्यंत वेदनादायक मार्गाने तो कुत्रा पुढच्या दोन पायांनी स्वतःच शरीर कसबस ओढत रस्त्यावरून पलीकडे जात बाजूला पडलेली एक भाकरी खाण्यासाठी धडपडत चालला होता.असांगाला त्या कुत्राची दया आली, त्या कुत्र्याला मदत करण्यासाठी असांग त्या रस्त्याच्या पलीकडे पडलेल्या भाकरीकडे जाऊ लागला. तो कुत्रा सुद्धा त्याचं अंग खरडत वेदनेने विव्हळत भाकारीजवळ कसाबसा पोचला. भाकारीजवळ उभ्या असलेल्या असांगला पाहून कुत्र्याला वाटलं कि असांग त्याची भाकरी घेतोय. त्यामुळे घाईगडबडीत तो कुत्रा असांगाजवळ जात त्याला चावण्यासाठी त्याचा हात पकडू लागला पण भुकेने जर्जर झालेल्या त्या कुत्राच्या शरीरात असांगाला चावण्यासाठी सुद्धा त्राण न्हवते.तो कुत्रा फक्त डोळ्यांत असावे आणून लाचारपणे त्याच्या आणी भाकरीच्या मध्ये आलेल्या असांगकडे पाहत होता.
असांगाने समोरील भाकरी त्या कुत्र्यापुढे ठेवली जी पूर्णपणे विटून गेली होती. असांगाने भाकरी ठेवताच तो कुत्रा चटकन भाकरीजवळ जात ती शिळी विटकी भाकरी खाऊ लागला. असांग करुणेने आणी मायेने त्या कुत्र्याकडे पाहू लागला, अचानक असांगाचं लक्ष त्या कुत्राच्या मागच्या दोन अपंग पायांकडे गेलं. त्या कुत्राच्या मागच्या दोन्ही पायाला जखमा झाल्या होत्या आणी त्यात अळ्या झालेल्या होत्या.आणी त्या अळ्यामुळे त्या कुत्र्याच्या पायावरच्या जखमांच्या आजूबाजूचं मांस खावून कुरतड गेलं होतं म्हणून त्या कुत्र्याचे पाय अपंग झाले होता. ते पाहून असांगाच्या मनात दुःखाचा डोंब उसळला आणी त्याचं मन वेदनेने पिळवटून निघालं. नकळतपणे त्याच्या डोळ्यातून दोन अश्रुबिंदू ओघळले. त्या कुत्र्याचे शरीर कुरतडनाऱ्या त्या अळ्या बाजूला काढण्याचा त्याने विचार केला पण नंतर त्याच्या लक्षात आलं कि मांसाला चिकलेल्या त्या अळ्या हाताने वा इतर कशाने बाजूला केल्या तर त्या आजूबाजूच्या मांसाचे तुकडे त्या सोबत निघतील ज्याने त्या कुत्र्याला अजूनच असह्य वेदना होतील. फक्त एकच गोष्ट वापरण्याचा तो विचार करू शकत होता, ती म्हणजे त्याची जीभ. कुत्र्याला वेदना न होता आपल्या जिभेने तो त्या अळ्या बाजूला करू शकत होता. त्याने त्या कुत्र्याच्या जखमांकडे पाहिलं तर ते चाटणे त्याला सहन होत नव्हते. म्हणून डोळे मिटून जखमांवरील अळ्या दूर करण्यासाठी त्याने आपली मान खाली केली आणी जीभ बाहेर काढून खाली वाकला.
पण त्याच्या जिभेचा स्पर्श जमिनीला झाला. त्याने डोळे उघडले. समोर कुत्रा न्हवता. त्याने वर पाहिले.
तिथे विशाल, चंदेरी आणी रुपेरी प्रकाशात चमकणारा बोधिसत्व मैत्रेय बुद्ध उभा होता.असांगा अवाक होऊन हे दृश्य पाहत होता. असांगाला मैत्रेयांची शक्तीची वलये आणि प्रेम सर्व दिशांनी वाहत आजूबाजूला त्याचा प्रवाह पसरत असल्याचे जाणवले.
असांगाला काय बोलावे ते कळेना पण नंतर त्याला म्हणावे वाटले कि, “मैत्रेय! एवढी वर्षे कुठे होतास! मी साधना केली. तुझी प्रार्थना केली, तुझा इतके वर्ष मंत्र म्हणत आहे, आणि तू त्या काळात कधीही प्रकट झाला नाहीस ”
यावर मैत्रेय फक्त हसला आणी म्हणाला "असांगा, मी प्रत्येक मिनिटाला तुझ्याबरोबर होतो, जेव्हा तू हार मानलीस आणी माघारी जाऊ लागलास, तेव्हा मी तुला वेगवेगळ्या रुपात दर्शन देऊन प्रोत्साहन दिलं. इतके वर्ष साधना केल्यामुळे तू तुझा भूतकाळातील नकारात्मक कर्माचा आणी मलीनतेचा ऱ्हास केला होतास आणी तुझी शरीर शुद्धी होत होती. म्हणूनच तुला मी वेगवेगळ्या रुपात दिसलो होतो. नंतर पुनपुन्हा साधना करून तू जवळपास एवढी शुद्धी प्राप्त करून घेतलीस कि तू त्या कुत्र्याला पाहू शकलास. त्या कुत्र्याच्या अवस्थेमुळे तुला वाटलेली सहानभूती आणी अनुकंपा, तुझी करुणा करणारी कृती तुझी पूर्णपणे शुद्धी करण्यास पुरेशी ठरली आणी तुझा नजरेतील अस्पष्टता दूर झाली.
" हे कसं काय शक्य आहे. तुम्ही एका सूर्याप्रमाणे लक्ख आणी तेजस्वी दिसत आहात. मला जसे दिसत आहात तसेच इतर कोणाला सुद्धा दिसाल. असांगा प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाला.
"तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर, चला शहरात जाऊ आणि कोणी मला पाहू शकेल का ते शोधू." मैत्रेय शांत स्वरात म्हणाले.
असांगाला विश्वास बसला नाही म्हणून ते जवळच्या गावात गेले.
असांगाने मैत्रेयाला आपल्या उजव्या खांद्यावर उचलून धरले. गावातील बाजारात पोचताच असांगने बाजारातील प्रत्येकाला माझ्या खांद्यावर काय आहे ते विचारले. त्यांच्यापैकी प्रत्येकाने असांगकडे थोडे विचित्रपणे पाहिले आणि सांगितले की तुझा खांद्यावर काहीही नाहीये. त्यांना काहीही दिसले नाही. शेवटी ते शहराच्या टोकावर एका छोट्याश्या घरात राहत असलेल्या एका वृद्ध महिलेकडे आले, जिची नजरेतील अंधुकता आणी नकारात्मकता गावकऱ्यांपेक्षा तुलनेने अधिक दूर झाली होती.
असांगाने तिला माझ्या खांद्यावर काय आहे हे विचारल्यावर ती म्हणाली, “ कुत्र्याचे सडलेल प्रेत."
अशा प्रकारे असांगाला मैत्रेय बुद्धांच्या बोलण्यावर विश्वास बसला.
त्यानंतर, मैत्रेयांनी असांगाला एका शुद्ध क्षेत्रात नेले आणि त्याला खूप उच्च प्रतीची शिकवण दिली. ज्यासाठी त्याने खूप मनापासून प्रार्थना केली होती. असांगा हे प्राचीन भारतातील महान बौद्ध गुरु बनले. ते आजही प्रसिद्ध आहे. त्यांच्या कार्यांचा अजूनही अभ्यास केला जातो आणि ते अजूनही हजारो लोकांना प्रेरणा देतात.
========================================================================